आपल्या यशामध्ये शहराचा आणि गावाचा वाटा किती प्रमाणात असतो?| Role played by Village Life and City Life in your Success
शहरांतील लोकांची अज्ञातपणे उडणारी तारांबळ आपण सर्वांस काही नवीन नाही. त्याचं एक तरुणाच्या मनातुन हातांद्वारे लेखनातून परखडपणे मत मांडण्याचा प्रयत्न! अद्भुत, भव्य, अविस्मरणीय अशा काही विशेषणांनी शहराची पहिल्या भेटीमध्ये ओळख होते. या लेखाचं प्राधान्य हेच असेल की खरंच 'शहरे - निवांत आहेत की जिवंत सुद्धा!
शहर जीवन आणि ग्रामीण जीवन यात काय फरक आहे? What is the difference between city life and village life?
माझी अतिशय कमी शब्दांत ओळख करून द्यायची झाली तर मी गावाकडून नोकरीसाठी शहरात आलो. जेमतेम दोन वर्षे झाली असतील. ते माझं सुंदर गाव सोडून इथं शहरात गेली दोन वर्ष राहतोय आणि तेही नोकरीसाठी त्यास माझा अनुभव काही शब्दांतुन! city and village life difference
जीवनप्रवासचं जेव्हा दैनंदिन जीवनातून मापायला लागतो ना तेव्हा समजुन घ्यायचं की मन कामात रमत नसावं. अर्थात जरा विसावा घ्यावासा वाटतोय मनाला. सकाळी पाच वाजता उठणे नि आवरून तयार होणे सात आठ च्या दरम्यान नाश्ता करून घरातून निघणे, दिवसभर कामात झोकून देणे.
पुन्हा पाच ते सहा च्या दरम्यान सुट्टी होणे खुपच झाले तर सात, आठ वाजता! 9 am to 5 pm Job हे असे दैनंदिन जीवन सोमवार ते शुक्रवार तसे बऱ्याचश्या लोकांना हे अनुभवायला शनिवार पण असतो.
मग जेव्हा कधी शुक्रवारची संध्याकाळ होते, अखंड भूतलावर सर्वात सुखी मनुष्य आपणच आहोत की काय असा भास होतो. शनिवार, रविवार दोन्ही दिवस बऱ्याचदा झोपण्यातच जातात, हा जर झटापटीत योजना केली तर म्हणजे ( so called 'plan')तर कुठे बाहेर निघणे होते. अस शहरातील जीवनाचं नोकरदारांच्या शब्दांतुन वर्णन !
शहरांच्या बाबतीत सर्वचं गोष्टी वाईट अस मुळीच नाही. पण राहणीमान सर्व काही अद्ययावत( जसं की clothing, food, malls, मनोरंजनासाठी Entertainment सिनेमागृह Cinema Theaters आणि काही इतर साधने, शैक्षणिक गरजा पूर्ण करणारे विद्यालये, महाविद्यालये High Schools, Colleges इ.)अशा विविध गोष्टींची आपल्याला लागण होत जाते शहरात असताना.
ह्या गोष्टींमध्ये खटकणारी बाब काही नाही, नको असणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ मात्र व्यर्थ जातो. खुप अशा बातम्यांमध्ये प्रदुषण आणि शहरे यांचे नाते जवळीक असल्याचे सांगितले आहेच. वाहने , बदलती जीवनपद्धती निरनिराळे कारणे आहेतचं, प्रदूषणात वाढ व्ह्यायला.
अशा अनेक गोष्टी मला शहरात त्रस्त करतात, गावाची ओढ निर्माण करतात. आमचा गाव डोंगराच्या साथीने वसलेला, नजरेस पुरून उरेल अशी दूरपर्यंत पसरलेली नदी, सूर्याचा उदय देखील त्या नदीच्या पाण्याच्या तरंगाच्या चकाकीवरून होतो. ती सकाळची मदमस्त करणारी हवा जेव्हा शरीराच्या आत जाते, नजरेला हवेहवेसे वाटणारे ते दृश्य, असं माझं गावं. village diaries in marathi
गावी असतानाही पहाटे पाचला उठणे असायचे, शेतीपलीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांसोबत शर्यत लागायची आणि हे चतुर बुद्धीचे पायात पाय अडकवुन पाडायला कधी चुकले नाही. कडुलिंबाच्या काडीने दात घासण्याची कल्पना, थंडी भरली असले शेकोटी याहून अधिक उपाय असायचे.
परतत असतांना सुर्याचे चेहऱ्यावर पडलेले किरणे नयनांना मोती प्रमाणे भासे. त्याला टेकडीपलीकडून नदीकिनारी बसुन बघण्याची मजा काही औरच होती.
नदीच्या बाजुलाच क्रिकेट खेळायला स्वयंरचित मैदान पण होते. शनिवार आणि रविवार असे पूर्ण दोन दिवस तिथेच खर्च व्हायचे. बऱ्याचदा पकडापकडी, लपाछपी संपूर्ण गल्लीला आपल्या सोबत खेळण्यास भाग पाडायचो. ते म्हणतात ना ' गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ' !
माझ्या गावाचे सौन्दर्य अजुनही तसेच अबाधित आहे. पण तिथे ते खेळणारे, बागडणारे चेहरे आता वयाने, बौद्धिक रित्या वाढलेत. पण अजुनही वयाने कमी असणाऱ्या मुलांच्या हातातील Cricket Bat ची जागा मोबाईल ने घेतलीय.
विविध गोष्टी शिकायला मिळतात याबद्दल दुमत नाही पण त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत यात पालकांचे अपयश दिसून येते. माझे गाव आता शहराचा चेहरा, परिस्थिती आत्मसात करण्याच्या वळणावर आहे. फरक करणे ही कठीण होत जातेय की गाव कोणते आणि शहर कोणते जर नैसर्गिक सौन्दर्याची बाब वगळता!
पण मात्र मी माझ्या गावाचं चित्र मनात आणि हृदयात तसंच रेखाटून ठेवलंय कायम! कोणास ठाऊक असं अनुभवणारी आपली कदाचित शेवटची पिढी असेल. आपण सक्षम व्हावे हे जर गावची माती शिकवत असेल, तर सक्षमतेने कार्य पूर्ण व्हावे हे त्या शहराची गरज शिकवते.
वयाने पंचविशी उलटावी की चाळीशी पण गावाकडे कधी परतताना त्याचं समाधान आठवणींच्या रूपाने याचं चेहऱ्यावर लखाखते. Role played by Village Life and City Life in your Success!!आपल्या यशामध्ये शहराचा आणि गावाचा वाटा किती प्रमाणात असतो?
लेख -: अनिकेत कुंदे
👌👌
ReplyDelete👏👏👏
ReplyDeleteमस्त 👏
ReplyDelete