नकारात्मकता ते सकारात्मकतेकडे प्रवास कसा करावा? | Negativity to Positivity in Marathi
Negativity to Positivity in Marathi जर आपले जीवन आपल्याला पुढे जाण्याची संधी देत असेल, तर नकारात्मकते बरोबर सकारात्मकताही बदलायला हवी. या लेखाचे उद्दिष्ट नकारात्मकतेचा प्रभाव दूर करणे आणि त्यास सकारात्मकते सोबत अदलाबदल कसे करावे हे आहे.
जेणेकरुन आपल्या विचारांची नाविन्यता, मनोबल आणि उत्पादकते मध्ये आवश्यक असा बदल घडेल. यशासाठी आणि उत्तम, उत्कृष्ट कामगिरीसाठी सकारात्मक होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता का मजबूत आहे? why is negativity stronger than positivity?
आपल्यासोबत वावरणाऱ्या बहुतेक लोकांना जीवनातील नकारात्मक प्रभावांची पुरेश्या प्रमाणात माहिती नसते. आपल्यावर विविध माध्यमांद्वारे नकारात्मकतेचे संदेश आणि आपल्या बाजूला असलेले लोक नकारात्मकतेचे सूर बिंबवून ठेवतात.
तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टींची जागा सकारात्मक गोष्टींनी घेण्याची पहिली पायरी म्हणजे नकारात्मक संदेश आणि त्या सारख्या इतर गोष्टी सकारात्मकतेने बदलण्याचे Uनिर्णय घेणे. केवळ सकारात्मक गोष्टींनी भरून ठेवलेल्या संदेशांवर अथवा माध्यमांवर लक्ष केंद्रित करणे.
सामाजिक नेटवर्कमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता! Positivity and Negativity in social networks! or Positivity and Negativity of Internet
ह्याची सुरुवात कुठून तर? सर्वप्रथम आपण बघत असलेल्या बातम्यांचे NEWS प्रमाण कमी केले पाहिजे. खूप सारे लोक त्यांच्या दिवसांची सुरुवात बातम्यांने करतात मग तेच कुठे आग, कुठे पूर! कुठे रहदारी, कुठे हवामान बदल हे दिवसाची सुरूवातचं नकारात्मकतेने घडवतात.
म्हणून तुम्ही जेव्हा कॉफी पिऊन संपवता, तोवर तुमच्याकडे आठवड्यासाठी पुरेल इतक्या नकारात्मक बातम्यांचा साठा झालेला असतो.
अशावेळी एकंच काम आपण करायला हवे, दरवाजा उघडा आणि या सर्व नकारात्मक बाबींना बाहेरचा रस्ता दाखवा. त्याचं दरवाजातून सकारात्मक गोष्टी वा मानसिकता घेऊन घरात या. नकारात्मकतेमुळे नकारात्मकता वाढते. negativity breeds negativity
खूप महत्वाचे म्हणजे दिवस संपण्याच्या मार्गाविषयी काय? झोपायला जाण्यापूर्वी आपल्यातील बरेच लोक बातम्या पाहतात आणि नकारात्मक माहितीचा एक मोठा डोस घेऊन झोपी जातात. हेचं कारण आहे लोकांना झोपी जाण्यात किंवा झोपेतही त्रास होतो.
आपण झोपायला जाण्यापूर्वी ज्या मनस्थितीत असतो त्याचं मनस्तिथीने दुसर्या दिवसाची सकाळी होते, म्हणूनच आपण दुसर्या दिवसालाही वाईट मूडमध्ये सुरुवात करू पाहतो. आपण बातम्यांमधून घेत असलेल्या सर्व नकारात्मक माहितीची आपल्याला गरज नाही आणि त्याशिवायही आपण अगदी चांगले कार्य कराल.
सकारात्मकतेने नकारात्मकता कशी बदलायची? How to replace negativity with positivity ? नकारात्मकता दूर करण्यासाठी काय केले पाहिजे ?
आपण बघत असलेल्या बातम्यांना, मोटिवेशनल टेप्स Motivational Speeches आणि मनाला शांत करणाऱ्या संगीतासारख्या चांगल्या किंवा सकारात्मक बातम्यांनी बदला. सशक्तीकरण करणारी पुस्तके वाचणे देखील मोठ्या प्रमाणात मदत करतात.
आपल्या जीवनाला चालना देण्यासाठी पुस्तके एक विलक्षण मार्ग असू शकतात. यशस्वी कथा, यशस्वी लोकांचे चरित्र इ. शोधा आणि आपल्यासाठी काय योग्य व ठीक असेन. तुम्हाला त्याचंवेळी बरे वाटेल.
आपली पुढची पायरी, Television पाहण्याला मर्यादा ठेवणे. एका अलीकडील अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की टीव्ही पाहणारे ७८% लोक कोणत्याही वेळी पाहत असलेल्या कार्यक्रमात रस घेत नाहीत.
म्हणून टीव्ही पाहणे कदाचित आपणास कंटाळवाणा बनवित आहे आणि जे अधिक मजेदार आहे त्यापासून दूर खेचले जाते. एक महत्वाची वेळ असते, त्यावेळी लोक TV पाहण्याला प्राधान्य देतात. आपण त्यावेळी महत्वाच्या कामांकडे लक्ष दिले पाहिजे.
पुढील पायरी आपण नकारात्मक लोकांसोबत असलेला आपला संपर्क कमी करणे आवश्यक आहे. नकारात्मक लोक किती पाण्यात असतात हे त्यांना ठाऊक नसते परंतु ते आपली ऊर्जा, इच्छाशक्ती खाऊन टाकतात.
नकारात्मक लोक आपल्याला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करतात. आपणही प्रयत्न केले पाहिजे पण त्यांना आपल्यापासून दूर ढकलण्याचे! ऑफिसच्या पार्टीमध्ये किंवा तक्रारीच्या सत्रांमध्ये कधीही सामील होऊ नका.
आपल्याला समर्थन देणारे, साथ दर्शवणारी लोक त्यांच्या सभोवताली असल्याने आपल्याला बरे वाटते अशा लोकांना आपल्या आयुष्यात नकारात्मक लोकांसोबत पुनर्स्थित करा.
नकारात्मकतेचा सर्वात हानिकारक स्त्रोत आपण स्वतः आहोत. आपल्यापैकी बरेच लोक नकारात्मक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करून घेतात हेचं खरं आहे असं आपल्या मनाने स्वीकारले आहे.याचा परिणाम बऱ्याप्रकारे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो.
आपण आपल्या उणिवा, समस्या आणि स्वतःसाठी वाईट बातम्या ठरवण्यात वेळ घालवतो. बरेच भय आणि चिंता निर्माण करतो, नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न झुगारून लावतो.
आपल्या सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात करा. आपली अद्वितीय सामर्थ्य कोणती आहेत ? आपण काय साध्य केले आहे? आपण इतर लोकांपेक्षा कसे वेगळे आहोत? नकारात्मक गोष्टी पुनर्स्थित करण्यासाठी आपण ह्या गोष्टींचे अध्ययन केले पाहिजे. positivity and negativity assessment in marathi
आपण केलेल्या योग्य गोष्टींसाठी स्वतःला पुरते क्रेडीट द्या Give credit to yourself, याने स्वतःबद्दलचं आपल्याला एक चांगली बातमी मिळेल. तसेच आपल्याकडे असलेल्या महत्वाच्या वा बहुमूल्य गोष्टींच्या विचारासाठी दररोज तीन मिनिटे बाजूला राखून ठेवा.
या चांगल्या गोष्टींचा विचार करण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्याला स्वतःप्रती चांगल्या भावना निर्माण होतील आणि दिवस ढळण्यापर्यंत साथ देतील.
आपल्या शरीराची काळजी घ्यायला विसरू नका. निरोगी खाणे Fresh Diet, वाईट सवयी काढून टाकणे आणि तुमची शक्ती वाढविताना तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी नियमित व्यायाम करा, जेणेकरून आपण आणखी काही करण्याचा विचार करू शकाल.
इतरांना मदत केल्याने आपणास स्वतःबद्दल चांगले वाटते. संस्थांशी जोडले जा, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना वेळोवेळी भेट द्या. आपल्या कार्याचे इतरांकडून कौतुक होईल असा चांगला अभिप्राय आपल्या मनाच्या संदुकात कैद करा.
तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा सकारात्मकते मध्ये बदल करून आपण स्वतःला आणि बहुदा जगाला चांगले स्थान बनवाल. आपल्याला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तसेच आपल्याला पाहिजे असलेल्या बर्याच गोष्टी साध्य करू शकाल.Negativity to Positivity in Marathi
कृतीविना काहीही शक्य नाही, साध्यही होतं नाही. त्यामुळे आताच सुरुवात करा!
नकारात्मकता ते सकारात्मकतेकडे प्रवास कसा करावा? Negativity to Positivity in Marathi
लेख -: अनिकेत कुंदे
खूपच सोप्या भाषेत मांडलेल आहे...👌👌👌👆
ReplyDeleteआपले मार्गदर्शन खुप उत्साहवर्धक आहे वाचून आनंद झाला
ReplyDelete