मागील वर्षात काय घडले? | २०२२ साठी संकल्प | 2021 year rewind
मागील वर्षात काय घडले? | २०२२ साठी संकल्प | 2021 year rewind नवीन वर्ष ? हे येणार आणि हेही जाणार!
मागील वर्ष in Marathi | मागील वर्षभरात म्हणजेच २०२१ मध्ये घडलेल्या घटनांचा मागोवा!
नवीन वर्षात, काय असेल विशेष! संकल्पाविना मागील वर्ष सारणे जणू अशक्यचं! सरत्या वर्षात काही गोष्टी वाईट तश्या चांगल्याही घडल्या. सिनेमा क्षेत्रातील तसंच क्रीडा क्षेत्रात अनेकांच्या घरी नवीन पाहुणे आले काहींनी कोरोनामुळे पालक गमावले. काही सेलेब्रिटींच्या लग्नांच्या बातमीने २०२१ च सुरुवात व सांगता झाली. सर्वसामान्य लोकांनी देखील जवळचे माणसे गमावलेत. ह्या गोष्टींनी २०२१ हे वर्ष वाईट केले खरे, पण काही गोष्टी आनंददायी घडल्या ते ही तितकंच खरं.
मी २०२१ वर्ष कुठे चांगले आणि वाईट गणतो. वाईटाचं कारण कोरोना अप्रत्यक्ष वार करणारा निर्दयी राक्षस. २०२० पासून त्याचा सुरू असणारा हाहाकार २१ मध्ये देखील उफाळून आला. लॉकडाउन हा शब्द २०२० पर्यंतचं मर्यादित असेल हा गैरसमज सखोल चुकीचा ठरला.
Lockdown-2021 |
फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान हे थैमान अनेकांच्या घरांतदेखील पोहोचले. मार्चच्या २०२० मध्ये सुट्टी घेऊन घरी आलो होतो आणि तोच लॉकडाउन यंदाही १.०, २.० म्हणत मोजला जात होता. Work from home अतिशय विलक्षण संकल्पना संपूर्ण जगाला इथवर तर माहीत झाली होती, भलेही ती कामाच्या बाबतीत वा शिक्षणाच्या बाबतीत असो.
लॉकडाउनच्या कारणाने लग्न कार्य, सिनेमा थिएटर इत्यादी गोष्टींसाठी बंधने घालण्यात आली होती. तरीही लोकांनी ऐकले म्हणजे झालं?
Movie-Theatre |
हळूहळू वातावरण थोडे सामान्य व्हायला सुरुवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट सिरीज अनेक कारणांनी रंगली, आणि त्यात भारत जिंकला याने २०२१ ची रंगत अजून वाढवली. अनेक वर्षांपासूनची भारताची प्रलंबित इच्छा २०२१ मध्ये पुर्ण झाली.
फेब्रुवारी दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या टेस्ट सिरीज मध्ये देखील भारताने मानाचा तुरा रोवला. ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये नवीन खेळाडूंची कामगिरी चमकली.
अनेक दिवसांपासून सिनेमा आणि सिरीयल शूटिंग प्रलंबित होती. २०२१ मध्येचं ह्या गोष्टीला सुरुवात झाली. लोक ताज्या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज होतेच. सिनेमांनी सिने रसिकापर्यंत पोहोचण्याचा OTT हा मार्ग अवलंबला.
अनेक उत्तम सिनेमांची मेजवानी OTT तसेच उशिरा पण थिएटरद्वारे प्रेक्षकांना रुचकर वाटली. त्यामध्ये जय भीम, मिमी, शेरशाह, सरदार उद्धम, पांडू, गोदावरी, अंतिम, बेल बॉटम, पुष्पा, सुर्यवंशी इत्यादी. तर फॅमिली मॅन सारख्या सिरीज मनोरंजनास पात्र ठरल्या.
Olympic-2020 |
टोकियो ऑलम्पिक २०२०, २०२१ च्या ऑलम्पिकमध्ये भारतीयांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यात नीरज चोप्रा यांनी भालाफेक ह्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. रवी कुमार दहिया यांनी कुस्तीच्या ५७ किलो वजन गटात रजत पदक पटकावले. मीराबाई चानू यांनी वजन उचलण्याच्या ४९ किलो वजन गटात रजत पदक कमावले. पी. व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटन च्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदक तर लवलीना बोरगोहेन यांनी वेल्टरवेट बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. बजरंग पुनिया यांनी कुस्तीच्या ६५ किलो वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली तर भारतीय हॉकी टीमने देखील कांस्यपदक जिंकले. ह्या सर्व गोष्टी भारतीयांसाठी खूप आनंददायी ठरल्या.
सण जसे की गणपती, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमस २०२० तुलनेत अतिशय जोमात साजरे झाले किंवा होतायेत.
वर्षात काही वाईट गोष्टींचीही साद होतीचं. वाझे प्रकरण, आर्यन खान प्रकरण इ.
ह्यात वाईट एक गोष्ट अजून जोडविशी वाटते ती म्हणजे नुकतेच कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर काळी शाई पुसण्यात आली. इथे राज्यांच्या किंवा भाषिकांच्या वादामध्ये महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना केली गेली. निर्बुद्ध लोकांची कमी नाही हेच ह्यामागचं कारण असावे.
अनेक आंदोलने झाली, शेतकरी बिल्स च्या विरोधात, आता हल्लीचं ST कामगार संप, आरक्षणासाठीची आंदोलने! स्वतःची हक्क मिळवण्यासाठी केलेल्या आंदोलनांची गणना मी वाईट गोष्टींमध्ये मुळीच करत नाही. वर्षाअखेर का होईना पण केंद्र सरकारने शेतकरी बिल्स मागे घेतली.
आयपीएल चा रणसंग्राम आपल्या देशाने अनुभवला त्यानंतर झालेला टी20 वर्ल्ड कप भारताच्या पारड्यात नसला तरी भारत प्रयत्नशील होता.
हा झाला आलेख माझ्या २०२१ च्या अनुभवांबद्दल, आता
आपण २०२२ च्या संकल्पांबद्दल विचार करायचं झालं, तर मी अनेक गोष्टी ठरवल्या आहेत. 2022 Resolution
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा |
पहिली म्हणजे शक्य तितक्या गड किल्ल्यांना भेट द्यायची, अर्थात हा विषय फक्त फिरतीचा नाही. किल्ल्यांना भेट देऊन तो इतिहास आत्मसात करायचा. निरखून खाणाखुणा बघून इतिहासात सामील असलेल्या हर एक नावाला साष्टांग दंडवत करायचा. इतका ज्वलंत आणि जाज्वल्य इतिहास लाभणे हे महाराष्ट्राचं आहोभाग्य आहे.
अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम वेळ मिळेल तसं भेट देणे. शक्य असल्यास आर्थिक मदत करणे. पहिली गोष्ट म्हणजे हल्ली अनाथाश्रमाचे काही व्यवस्थापन मंडळे देखील विविध समस्यांना तोंड देत आहेत जसे की आर्थिक, इतर दबाव. आपली एक भेट त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू आणते ना खरंच अनमोल आहे !
विविध धर्मग्रंथाचं वाचन, अर्धे ज्ञान, ज्ञान नसण्यापेक्षा खुप हानिकारक असते. सध्यपरिस्तिथी पाहता अज्ञानी लोकांना ग्रंथांचे धडे गिरवन्याची सक्त गरज आहे.
आई बाबांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते तसेंच कायम ठेवण्याच्या प्रयत्नांत नेहमीच तत्पर असणे.
कोणतेही संकल्प दुसऱ्यांकडून पूर्ण होतील याची अपेक्षा करू नका. अवलंबून राहणे म्हणजे त्या गोष्टीला उशीर होणारचं.
असे अनेक प्रकारचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न ह्याचं वर्षी आहे. २०२० - २०२१ हुन हे वर्ष सुंदर करणे हेही आपल्याचं हातात आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022!!
धन्यवाद!! 'मागील वर्षात काय घडले? | २०२२ साठी संकल्प | 2021 year rewind' वाचल्याबद्दल !!
लेखन -: अनिकेत कुंदे