Smriti Mandhana information in Marathi | स्मृती मंधाना मराठी माहिती
Smriti mandhana information in Marathi | स्मृती मंधाना मराठी माहिती | मित्रांनो आपल्या भारत देशातील बहुतांश जनता यांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे आणि आपल्या देशाने क्रिकेट खेळामध्ये स्वतःचे महत्वाचे स्थान बनविले आहे. भारतातील क्रिकेट खेळामध्ये पुरुष संघाच्या बरोबरीने महिला संघ हा सुद्धा उच्च अशी कामगिरी करत आहे. स्मृती श्रीनिवास मंधाना यादेखील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एक क्रिकेटपटू आहेत. आज आपण याच क्रिकेट खेळाडूची माहिती पाहणार आहोत. या तर मग पाहुया, स्मृती मंधाना यांची मराठी माहिती!
Smriti Mandhana information in Marathi | स्मृती मंधना मराठी माहिती | Smriti Mandhana Biography in Marathi
क्रिकेट खेळामध्ये यशस्वी असलेल्या एक महिला भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतात. क्रिकेटमधील फलंदाजी कामगिरीसाठी स्मृती श्रीनिवास मंधाना यांचे नाव सुप्रसिद्ध आहे. स्मृती मंधाना इन्फॉर्मेशन इन मराठी
![]() |
smriti mandhana pic |
स्मृती मंधाना या डाव्या हाताच्या खेळाडू आहेत. 2013 मध्ये बांग्लादेश विरोधात खेळत असताना स्मृती मंधाना यांनी आपली उत्कृष्ट अशी कामगिरी करून सर्व रुपाने भारताचे नेतृत्व केले. 19 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंका विरुद्ध खेळलेला एक दिवसीय सामना हा त्यांचा शेवटचा सामना ठरला. स्मृती मंधाना यांनी 13 ऑगस्ट 2014 रोजी इंग्लंड च्या विरोधात आपला पहिला कसोटी सामना खेळला.
स्मृती मंधाना यांचे बालपण -:
स्मृती मंधाना यांचा जन्म 18 जुलै 1996 (smriti mandhana birthday date) रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आणि आईचे नाव स्मिता असे आहे. त्यांचे वडील श्रीनिवास मंधाना हे माजी जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. स्मृती मंधाना केवळ दोन वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या कुटुंबाने सांगली येथे स्थलांतर केले. सांगली येथे स्मृती मंधाना यांनी प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले.
क्रिकेट खेळामध्ये खेळण्याचा रस आणि आवड व प्रेरणा त्यांना त्यांच्या भावाकडून मिळाली. स्मृती मंधाना अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचे महाराष्ट्र अंडर 15 या टीम मध्ये सिलेक्शन झाले. त्यानंतर स्मृती मंधना अकरा वर्षाच्या असताना त्यांचे महाराष्ट्र अंडर 19 या टीममध्ये सिलेक्शन झाले.
स्मृती मंधाना यांचे क्रिकेटमध्ये पदार्पण -:
त्यांना त्यांच्या जीवनातील क्रिकेट कारकिर्दीतील पहिले यश 2013 मध्ये मिळाले. 2013मध्ये स्मृती मंधना यांनी एक दिवसीय सामना मध्ये डबल शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
गुजरात च्या विरोधात महाराष्ट्रातून खेळत असताना त्यांनी वडोदरा मध्ये अल्मबिक क्रिकेट ग्राउंड वर वेस्ट जोन अंडर 19 टूर्नामेंट मध्ये 150 बॉल वर नाबाद 224 रन बनविले smriti mandhana double century. त्यानंतर पुढे 2016 मध्ये महिला चॅलेंजर ट्रॉफी मध्ये स्मृती मंधाना यांनी भारतासाठी अर्धशतक करून मदत केली. आणि आपली टीम भारताला भारत ब्ल्यूच्या विरुद्ध फायनल मध्ये 82 बॉल वर नाबाद 62 रन बनवून भारताला विजेता टीम बनवण्यामध्ये मदत केली.
स्मृती मंधाना आंतरराष्ट्रीय करियर:
स्मृती मंधाना यांनी आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 2014 रोजी सुरुवात केली. 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध वॉर्मस्के पार्क येथे कसोटी पदार्पण केले. स्मृती मंधना यांनी त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावांमध्ये अनुक्रमे 22 आणि 51 धावा करून आपल्या संघाला सामना जिंकण्यास मदत केली.
त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौर्यात येथे Bellerive ओव्हल मध्ये होबार्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक केले. स्मृती मंधाना ही एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू होत्या ज्यांना आयसीसी महिला संघ 2016 मध्ये स्थान देण्यात आले.
याच वर्षी जानेवारी मध्ये डब्ल्यू बी बी एल मध्ये झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांना 2017 च्या विश्वचषका मध्ये स्थान मिळाले.
त्यांनी त्यांच्या क्रिकेट मधील वर्ल्ड कप ची सुरुवात इंग्लंड विरुद्ध केली होती. यावेळी त्यांनी आपल्या संघाला जिंकवण्यासाठी 35 धावांचे मदत केली त्यामुळे त्यावेळी त्यांना "सामनावीर" म्हणून गौरविण्यात आले. यानंतर वेस्टइंडीज च्या विरोधामध्ये स्मृती मंधाना यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्वतःचे दुसरे शतक झळकावले.
![]() |
smriti mandhana double century |
त्यानंतर स्मृती मंधाना यांना ऑक्टोबर 2018 मध्ये वेस्ट इंडीज मध्ये महिला विश्व ट्वेंटी-20 स्पर्धेसाठी भारताच्या संघामध्ये स्थान देण्यात आले. स्पर्धेच्या अगोदर त्यांना "भारताची स्टार" India's Star Player असे नाव देण्यात आले.
फेब्रुवारी 2019 मध्ये स्मृती मंधाना यांनी तीन सामन्यांमध्ये भारताच्या महिला t-20 संघाच्या कर्णधार म्हणून काम केले. तेव्हा तिने गुवाहाटी येथे टी -ट्वेंटी मध्ये इंग्लंड विरुद्ध महिला संघाचे नेतृत्व केले होते तेव्हा ती भारतातील सर्वात तरुण टी-ट्वेंटी कर्णधार बनली.
जानेवारी 2020 मध्ये स्मृती मंधाना यांना ऑस्ट्रेलियात 2020 आयसीसी महिला t-20 विश्वचषकासाठी भारताच्या संघांमध्ये स्थान देण्यात आले.
मे 2021 मध्ये स्मृती मंधाना यांना इंग्लंड विरुद्ध एकमेव सामन्यासाठी भारताच्या कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.
अधिक वाचा : ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi - माहिती !!
स्मृति मंधाना यांना मिळालेले पुरस्कार :
![]() |
Smriti Mandhana Awards |
स्मृति मंधाना यांना मे 2019 मध्ये CEAT आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय 'महिला क्रिकेटर ऑफ द इयर' चा पुरस्कार देण्यात आला.
अधिक वाचा: गौतम गंभीर मराठी माहिती Gautam Gambhir information in marathi
क्रिकेट फॅन्सची नॅशनल क्रश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचे चाहते त्यांना नॅशनल क्रश असे म्हणतात. स्मृती मंधना यांनी त्यांच्या उत्कृष्ट अशा क्रिकेटचा खेळामुळे संपूर्ण देशाला वेड लावून सोडले आहे. साधारणता संपूर्ण देशभरामध्ये त्यांना सलाम वीर म्हणून या नावाने ओळखले जाते तर त्यांचे चाहते हे त्यांना नॅशनल क्रश असे म्हणतात.
![]() |
Smriti Mandhana - The Indian Woman Cricketer |
अशाप्रकारे स्मृति मंधाना यांनी क्रिकेट खेळामध्ये आपली उत्कृष्ट अशी कामगिरी केली व अनेक वेळा भारताला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देखील दिले.
महत्वाची माहिती थोडक्यात:
धन्यवाद 'Smriti mandhana information In Marathi | स्मृती मंधाना मराठी माहिती' वाचल्याबद्दल!!
लेख -: Remedies to Success