रक्षाबंधन विशेष लघुकथा | raksha bandhan 2023 | रक्षा बंधन मराठी
रक्षाबंधन विशेष लघुकथा | raksha bandhan 2023 | रक्षा बंधन मराठी प्रेम ? सर्वात तिखट नाते असेल ना तर ते बहिण भावाचं, तिखटातं गोडवा अनुभवणे म्हणजे भाऊ-बहिणीचं प्रेम, लहानाचे मोठे सोबत होतात पण कधी एक दुसऱ्याचं कौतुक करत नाही, विविध कडवट शब्दांनी गोडवे गातात. happy raksha bandhan
रक्षा बंधन 2023| raksha bandhan in marathi
इंजिनिअरिंगचे चार वर्षे पुण्याला, त्यात पहिल्या वर्षी नाही जाऊ शकलो, दुसऱ्या वर्षी बोलतच नव्हतो, तिसऱ्या वर्षी ट्रिप ला गेलेलो, या रक्षाबंधनाला मात्र सक्त ताकीद देण्यात आली होती मला, यायचं म्हणजे यायचं, आता जर नसलो तर महायुद्ध नक्की रंगणार घरी आमच्या हे निश्चित होते.
raksha bandhan date 30th August 2023(रक्षा बंधन कधी आहे? | रक्षा बंधन किती तारखेला आहे?)
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा |
मी सर्वेश आणि माझी बहिणाबाई तेजश्री, मी १२वी पर्यंत घरीच असायचो आणि ती तेव्हा सातवीच्या वर्गात! तो पर्यंत घरात नेहमी भांडणं आलेच, पण लहानपणापासून आई वडिलांच्या घराबाहेर जा वजा धमक्या मात्र खूप सहन केल्या होत्या मी! की बोर्डिंग ला टाकू ह्याला, बोर्डिंग ला टाकू ह्याला!
जे की कधी खरं झाले नाही, अशात मात्र छुपा हसता चेहरा नेहमी त्रासदायक होता माझ्यासाठी. घरात दोन बाजुंनी मोठ्याने आवाज ऐकू येऊ लागला, तर फटके मीचं खायचो, घरात आजी न आई चं जरी काही झाले, तर सर्वेश ये इकडे, बाबांचे नेहमी ठरलेलं असायचे. मी माझी व्यथा मांडतोय असं काहीसं मात्र नाही बर का ?
मुद्दाम रडायचं सोंग घेऊन तेजुने फार आनंद लुटला होता, वडिल मला ओरडले, त्यांनी मला मारले तिला मात्र फार आनंद व्हायचा, मात्र वडील जर घरी नसले की घरातल्या वातावरणात बदल्याचे स्वरूप यायचे, Revenge!!!!
तरी पण संध्याकाळी जेवताना जर दिवसभर काय केलं ह्याचा उल्लेख झाला तर आईच्या बोलण्याला सुरुवात व्हायची " काही नाही नेहमी सारखाच ह्यांचं असं तर त्यांचं तसं, म्हणुन बाहेर बसलेली तर मध्येच तेजु रडायला लागली "वातावरणात बदल जाणवायला लागला होता, जरा दाटुन आल्यासारखे वाटतं होते, ताटाकडे असलेली वडिलांची नजर वर उठायला लागली होती, नि मी लगेच "आई बस्स! माझे झाले " उठलो आणि निघालो.
ताटात त्या वेळी भेंडीची भाजी होती हो? त्याग ह्यालाच म्हणतात का? असो, ज्या घरात भाऊ आणि बहिण असतात, त्या घरात भावाचीच अलका कुबल का ? असा प्रश्न नाही माझा, मुळीच नाही.
"माझ्या मैत्रिणी येणार आहे घरी, लवकर काढता पाय घे" तेजु नेहमी सांगायची नाही तर जणु धमकीचं, एकदा असेच आरश्यात बघत भांग पाडत होतो पुन्हा तेजुचा हाच आदेश आला, मी साफ शब्दांत नकार सुनावला " नाही निघणार जा घर तुझ्या .. " पुढचं बोलणार तितक्यात आरश्यात एका चेहऱ्याची भर पडली होती, वयाने आणि माझ्या पाकिटात असलेल्या फोटोनुसार ते माझ्या वडिलांसारखे काहीसे भासत होते. मागे वळणार तितक्यात माझा चेहरा आरशाचे चुंबन घेत होता, आणि पाठीवर जरा दुखायला लागले होते, लवकर बाहेर निघण्याशिवाय पर्याय नव्हता.
आता जरासे वयाने वाढलो होतो, पण भांडणं बंद होतील शक्यता कोणीही वर्तवू शकत नाही. तुझ्या लग्नाला रडणारच नाही ही धमकी नावाजलेली भावांतर्फे, पण भाऊ कधी सांगत नाही, ती जेव्हा लग्नानंतर जाते त्यावेळी होणारे दुःख!
घरून फोन आला होता मग निघालो होतो, तितक्यात कॉलेजमध्ये बोलवण्यात आले होते काही क्षणांसाठी का होईना, पण उशीर झाला होता तशीच बॅग उचलली बस स्टँड वर आलो. मोठं प्रश्नचिन्ह होते मग आठवले की आज बातमी बघितली त्यानुसार, आज बसचा संप होता.
घरी आई ला तशी कल्पना दिली मागुन वादळी वातावरणाची संभावना दिसत होती म्हणून लवकर ठेवला.
संध्याकाळी मात्र तिचा राग शांत झाल्यावर तिनेच कॉल केला, असुदे जाऊदे म्हणुन तिच्या शब्दांत साफ रुसवा दिसत होता, तिची नाराजी दूर करण्यासाठी मीच तिला काही दिवसांनंतर जाईल पण गिफ्ट घेऊन जाईन अस ठरवले होते.
अतोनात प्रेम लपवुन राग दाखवण्याचा प्रयत्न भाऊ बहीण करतात, त्यांच्या ह्या प्रेमाबद्दल एक लघुकथा मांडण्याचा प्रयत्न!!
वारंवार विचार मात्र त्या सैनिकांचा देखील ठेवा, त्यांनीही खुप कुटुंबाविना सण साजरी केलेत. त्यांच्याही बहिणी रक्षाबंधनाच्या वेळी वाट बघत असतात. तो पुन्हा येईल की नाही हा जीवाला घोर लागुन असतो.
Happy Raksha Bandhan 2023 |
एक मात्र ह्यात जोडावसं वाटते ते म्हणजे, आपल्या बहिणीची आपण काळजी करतो, तिची कोणीही छेड काढली तर आपल्याला सहन होतं नाही, लढायचं, मारायचं. पण आपलीही वृत्ती ज्याने मार खाल्ला तशीच आहे, स्वतःच्या बहिणीचा आदर करता मग दुसऱ्यांच्या बहिणीचा का नाही? ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी हेचं म्हणणे.
धन्यवाद !! 'रक्षाबंधन विशेष लघुकथा | raksha bandhan 2023 | रक्षा बंधन मराठी ' वाचल्याबद्दल...