सर्वधर्म समभावाची प्रेरणा | विठू माऊली | Vitthal | देवावरची श्रद्धा
****** जय हरी माऊली *********
सर्वधर्म समभावाची प्रेरणा | विठू माऊली | Vitthal | Vithu Mauli | देवावरची श्रद्धा| देव शोधायचा, देव निवडायचा प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे. कोणी त्याला दगडांत शोधतं तर कोणी माणसांमध्ये!
एक वेळी दगडांत देव शोधला जाईल पण माणसांत कठीण आहे पण मिळतो हे मात्र तितकंच खरं! चर्चा, तर्क, वितर्क, जात, धर्म, पंथ, उच-निच, अहं याचं गुंत्यात माणूस अडकुन पडलाय. यागोष्टींमध्ये जेव्हा कधी बाहेर निघेल, तेव्हा कुठं त्याच्या देवपणाचा प्रत्यय येईल.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!!!!
टाळ मृदुंग आभाळाला टाहो फोडतो, एकच जयघोष लाखोंच्या आवाजात घुमू लागतो. मी प्रविण, प्राविण्याच्या शोधात आणि माऊलीच्या भजनात, अभंगात लीन असतो. माझा एक मित्र सलीम, नावाने तर मुस्लिम भासतो. हल्ली नाव आणि आडनावं पुरेसे आहे कोणाचीही कुंडली सांगायला.
माऊली जात, धर्म, वर्ण, प्रांत काही नसते हो! जगणं हे विठ्ठल, जगण्याचा मार्ग हा विठ्ठल! आम्ही प्रत्येक आषाढीला सोबतीने वारी करतो, तो नेहमी हेच सांगतो की,"आमच्यासाठी अल्लाह तो विठ्ठल, विठ्ठल तो अल्लाह! कुराणात धर्मप्रसार लिहलाय पण मुस्लिम लोकांनी अवलंबलेला मार्ग धर्म प्रसारासाठी नेहमीचं चिंताजनक असतो.
भगवद्गीता मुखात वसते माझ्या, ज्ञानेश्वरी मध्ये हर एक श्लोकांची संत ज्ञानेश्वरांनी केलेली उकल नेहमी ध्यानी असते."
सलीलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पणजोबांना एक दिवस दृष्टांत झाला, खुद्द माऊली त्यांना भेटले होते. तसपासून विठू माऊलीची पूजा हा त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या भाग झाला होता."
मग त्याच्या आजोबांपासून वारीची प्रथा सुरू झाली. त्यांच्या वर्णनात त्यांनी एकदा सुचवले होते. "वारीसं सुरवात केली तेव्हा डोक्यावर गोल टोपी बघुन देखील वीणा माझ्याकडे सुपूर्त केला गेला होता काही वेळ!
प्रश्न अचानक हाच माझ्या मुखावर होता की मी मुस्लिम असुन देखील माझ्या कडे दुर्लक्ष केलं नाही? त्यावेळी त्या महाराजांनी दिलेलं उत्तर अजुनही ज्ञात आहे मला, की माउलीला शरण आलेलेल्या धर्म आणि जात नसते हो! इथं आम्ही एकमेकाला माऊली म्हणुन उच्चारतो हेच एक कारण असावं त्याचं, एकमेकांचे पाय देखील धरतो, वयाचे नाही की कोणत्याही प्रकारचे बंधन असते शरण येण्यास."
धर्मानुसार जर देवाने त्याच्या भक्तांची, लेकरांची गणना केली असते तर माऊली आम्हाला कधी भेटलेच नसते. तो कधी भेदभाव करत नाही तर आपण का? हेंच नेहमी त्याचं विचारणे असते.
यावेळी मात्र अस काहीसं घडलं, की त्याची आजी देखील माऊलीची भक्त, त्याची पूजा करण्यात कोणतीही कसर तिने सोडली नव्हती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला.
मी आणि सलील वारीला आलेलो होतो. आजी तसंच झुंज देत होती आणि आम्हाला प्रचंड प्रमाणात फोन झाले होते त्याच्या घरून! त्याला मी सतत सांगत होतो की तु जा घरी गरज आहे तुझी सध्या, पण वारी मध्येच सोडुन जाणे त्याला योग्य वाटतं नव्हते. माऊली कुठला चमत्कार नाही करत तर त्याच्या भक्तांच्या वेदना सहन करतो.
माऊली ! माऊली ! माऊली ! ह्या आषाढीला प्रचंड जनसागर लोटला गेला होता. आम्ही वारकरी अस मानतो माऊली हर श्वासामध्ये आहे, अन्नाच्या घासामध्ये, इथं तिथं सर्वत्र आहे. समोर असलेल्या माणसात दिसतो, एकमेकाला माऊली उच्चारतो!
तेच झाले मग अखेर आम्ही पंढरपुरात त्याच्या पायी माथा टेकवला आणि फोन आला की आजीला आज डिस्चार्ग देणार आहे.
विठ्ठलाची सावली आणि चंद्रभागेच्या आश्रयाने जीवनाचं सार्थक होते.
जाणीला रंग कोणी तो, वर्ण, जात ना जाणिली कोणी ।
आश्रयापरी देह जाणतो, सावलीपरी माऊली तो ।।
जाणतो हा आत्मा माया, तोचि माझा विठुराया।
वसलो ठायी, तुझे रूप पाही,
दिसलो जगी, तुझे नाम गायी।
वाहतो आनंद तुझ्या स्मरणात,
राहतो तल्लीन तुझ्या भजनात.
जाहतो एक विनंती क्षेम, लाभो तुझ्या प्रति अनंत प्रेम ।।
- अनिकेत
सर्वधर्म समभावाची प्रेरणा देणारा हा लेख! सर्वधर्म समभाव in marathi | लेख - अनिकेत कुंदे
छान लेख !
ReplyDeleteMast, avadla lekh.
ReplyDelete