स्त्रीत्ववाद म्हणजे काय? हल्ली त्याचा प्रभाव किती आणि कसा दिसून येतो? जाणून घेऊया! What is Feminism in Marathi?
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात स्त्रियांच्या कोणत्याही हक्कांवर निर्बंध नाही. हवी असणारी प्रत्येक मोकळीक शहरी भागातील स्त्रियांच्या वाटेल आहे.
ग्रामीण भागही शहरीकरणाकडे वळत आहे. पण बराचसा भाग / समाज अजूनही स्त्रियांना 'चूल आणि मूल' ह्याचं विचारांवर वावरायला सांगणारा आहे. अश्या ठिकाणी feminism संकल्पना असणे गरजेचं आहे. इथे नाही लढले गेले तर मग कुठे लढावे?
जी चळवळ सध्या जेवढी आक्रमकरित्या पुढे जात आहे तितकीच जर शतकापूर्वी किंवा काही दशकांपूर्वी असती. तर आता feminism वा स्त्रीत्ववाद ह्या शब्दाचा भारताच्या भविष्यात वापर झाला नसता, अस माझं काहीसं मत आहे.
अशीच एक लघुकथा मांडलेली आहे. काही जण केवळ बोलत बसतात, जेव्हा काही जण कृती करतात. कृपया पुढे वाचा!

जगाच्या दृष्टीने म्हंटलं हे खेळ म्हणजे छंद जोपासणे, तात्पुरता उत्साहाचा मार्ग! निकृष्ट दर्जाच्या नोकरीची बरोबरी ज्यावेळी उत्कृष्ट खेळाडूला बांधते, त्यावेळेस अक्षरशः खंत वाटते.
मी राधिका, एकतर आधीचं या जगात मुलगी म्हणुन जन्म घेणं पाप अस समाजाला वाटतं. त्यात तिने जर करिअर घडवण्याचा प्रयत्न केला तर सतरा चौकश्या.
सर्वपरीने नेहमी तेच प्रयत्न राहिले माझे की अभ्यास आणि खेळ यांना पुरेपूर योग्य वेळ राखुन ठेवणे. हर कोणाची मन बांधणी करणे शक्य नसते. ते म्हणतात ना, 'Work hard in silence , Let success make the Noise' अगदी तसं काहीसं.
१२ वर्षांची असताना खो-खो चे क्रिडागुण आत्मसात करायचे ठरवले होते, तेव्हापासुन अभ्यासासोबत खेळ जोपासणे बंधनकारक! खेळामुळे जर अभ्यासात नुकसान झाले असते तर खेळण्यास तिथेच पूर्णविराम.
दिवसाची सुरुवात खो-खो च्या सरावाने, मध्य शाळेसाठी आणि दिवसाचा अखेर देखील सरावानेचं व्हायचा. दैनंदिन जीवनाचं वेळापत्रकच निश्चित करून घेतले होते, दररोज शाळेचा वेळ सरण्याची वाट बघत होते जरूर पण दुर्लक्ष मात्र होऊ दिले नाही.
१० वीचा अभ्यास की खो-खो चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी मात्र माझ्या जीवाला लागलेला घोर बघुन आई वडिलांनी दिलेले समर्थन माझ्या साठी एक पर्वणी होती आणि Midas Touch प्रमाणे ते सार्थकी लागले देखील. स्पर्धांमध्ये संघाला यश आणि १० वीच्या परीक्षेत टक्क्यांची नव्वदि पार करून उत्तीर्ण!
दोन वर्ष मात्र सरावाचा पुरता पडलेला खंड, जीवनाप्रमाणे शरीराचा अविभाज्य भाग दुर्लक्षित करणे होते. वेळ, वर्ष सरतात, दिवस अगदी कोऱ्या वहीवर त्या दिवसाची सांगता घेत लिहुन पालटले जातात. पण खो-खो वर दुर्लक्ष म्हणजे, तो खेळ आता काही छंद जोपासण्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता, आता मनात आणि हृदयात तो भिनला होता स्पंदनाप्रमाणे.
अवघं आयुष्य कधी 19मी × 30मी मध्ये सामावते, उमगत नाही. कधी या मैदानात झोकुन देतो ते देखील नाही कळत. क्रीडाप्रेमी म्हणजे हर एक स्पर्धा सणाप्रमाणे साजरी करतो आम्ही त्याचं उत्साहात. एक दुसरे घर म्हणुन हे अमाप मैदान नेहमीच माया देत आले आहे.
खुप कमी जण असतात ते बदलणाऱ्या जीवणासोबत खेळणे सुरू ठेवतात तर काहींचे वर्षानुवर्षे संदुकातील धुळीप्रमाणे केवळ आठवणींसोबत साठवले जातात.
मी मात्र एका मैत्रीच्या नात्याप्रमाणे हा अविस्मरणीय छंद जपत आलेले आहे आणि जपत राहीनही. अखेर एक कविता त्या मुलींसाठी ज्या केवळ कोणी काही म्हंटलं म्हणून माघार घेतात आणि त्यांच्यासाठी जे की माघार घ्यायला प्रवृत्त करतात.
इस कारवाँ को रुकने ना दो।
यह ख़ूब ज़िन्दगी से लढ़े भले ,
इस उड़ान को झुकने ना दो ।।
गिर के उठना वो जानती हो ,
पर हात क़भी छूटने ना दो।
हर मौके की अहमियत वो जानती हो
पर सपने इसके मिटने ना दो ।।
टकराती है रोज़ पत्थरोंसे
पर आंधियो से झुकने ना दो।
शेरनी सी दहाड़ है उसकी
कुत्तों के भोंकने से रुकने ना दो।।
खूब लड़ेगी दुनिया से वो
बस उसे दुनिया में आने तो दो।
बंद ज़िन्दगी से दुनिया तक
पंख खोल आसमां में उड़ जाने तो दो।।
एक ज्योत चिंगारी बन इस जमाने पर भड़की थी ।
तब जा के पाठशालाओ मैं बराबरी मैं लड़की थी ।।
- अनिकेत कुंदे
या लेख/ लघुकथेतून क्रीडा प्रेमाचा एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. क्रीडा विश्व पुरुष व स्त्री चा कोणताही भेदभाव करत नाही. पण लोक काय म्हणतील? या मुळे मुली माघार घेतात हे मात्र तितकंच खरं. महिला सक्षमीकरणासोबतंच सर्व जण आहोत पण ह्या लेखात मुलींच्या दृष्टीतुन क्रीडा प्रेम मांडण्याचा प्रयत्न !!!
स्त्रीत्ववाद म्हणजे काय? हल्ली त्याचा प्रभाव किती आणि कसा दिसून येतो? जाणून घेऊया । लेख - अनिकेत कुंदे