राष्ट्रीय युवा दिवस - स्वामी विवेकानंद जयंती | National Youth Day
नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिवस - स्वामी विवेकानंद जयंती | National Youth Day 2024
भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? | स्वामी विवेकानंद माहिती मराठी
When is national youth day celebrated in india?
आज 12 जानेवारी 2024 म्हणजे राष्ट्रीय युवा दिवस ( National Youth Day 2024), हा सर्व भारतामध्ये साजरा केला जातो. पण 12 जानेवारीलाच राष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? 12 जानेवारी 1863 रोजी एक महान व्यक्तिमत्व, थोर समाजसेवक आणि क्रांतिकारी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. 1985 सालापासून भारतामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने (Swami Vivekanand Jayanti ) हा दिवस साजरा केला जात आहे.
|
Swami Vivekanand |
पण स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतला भारत खरंच आज साकार झाला आहे का ? 100 वर्षे उलटून गेली तरी सुद्धा आजचा तरुण वर्ग स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहे का? अरे मुलींमागे गुलाबाचं फुल घेऊन मागे लागलेला तरुण कुठे आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी फाशीची दोरी हसत-हसत गळ्यात लटकणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कुठे..!!
राष्ट्रीय युवा दिन
आपल्या तरुण वयात देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे स्वामी विवेकानंद कुठे आणि चौकात उभं राहून सिगारेट फुकत आपल्याचं आयुष्याचा धूर मजेत हवेत उडवणारे तरुण कुठे...! काय करतो आहे आजचा युवा वर्ग ? बॉलिवूडमधल्या टुकार चित्रपटांमध्ये सुमार अभिनय करणारे नटी आणि नट्यांना रोल मॉडेल म्हणत आहे, आयुष्यात थोडासा संघर्ष आला,अपयश आलं की आत्महत्या करतो आहे, सुशिक्षित असूनही आपल्याच देशात घाण पसरवतो आहे, मोठमोठ्या नेत्यांच्या पार्टीचा कार्यकर्ता होऊन प्रचार करण्यात आयुष्याची धन्यता मानत आहे.
national youth day is celebrated on 12th January
अवघ्या 39 वर्षांचं आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभलं होतं, आणि एवढ्याश्या वयात फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांनी नावलौकिक मिळवला होता. स्वतः इंग्रज अधिकारी सुद्धा ज्यांना घाबरायचे, असं एक धगधगतं नेतृत्व स्वामी विवेकानंद यांचं होतं. पण आज दुःख एका अशा गोष्टीचं वाटतं, की आजचा तरुण स्वतःला चा इतिहास विसरला आहे, त्याचं देशप्रेम फक्त वर्षातल्या 2 दिवसांसाठी हातात झेंडा घेऊन मिरवण्यापुरतं आणि फेसबुक व्हॉट्सॲप, इन्स्टा च्या स्टोरी ला टाकण्या पुरतं उरलेलं आहे का असा प्रश्न पडतो.
देशाचं उज्वल भविष्य हे देशातील तरूण ठरवत असतात, पण आज प्रत्येकामध्ये देशाभिमानाची कमी भासत आहे, फक्त राजनीती मुळे देश सफल संपूर्ण होत नसतो, तर त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागते आणि तरुण वय हे सर्वात महत्त्वाचं यासाठी आहे. आणि हे जर तरुण वय तुम्ही वाया घालवलं, तर काय करणार तुम्ही स्वतःसाठी आणि स्वतःच्या येणार्या पुढच्या पिढ्यांसाठी.
राष्ट्रीय युवा दिवस निबंध
|
National Youth Day 2022 |
आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्रज आणि इतर परकीय सत्ता येण्यापूर्वी भारताला “सोन्याची चिडिया" संबोधलं जायचं, विश्वगुरू म्हणून संपूर्ण विश्वात भारताची ओळख होती, पण आज ही गोष्ट इतिहासजमा झालेली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, अनेक अडचणींना सामोरे जाऊन बॅरिस्टर बनणारे आणि भारताचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी स्वातंत्र्यवीर सावरकर, या आणि अशा कित्येक जणांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या सशक्तीकरणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी पणाला लावलं.
जर तुम्हाला सुद्धा भारताची ओळख पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून जगाला दाखवून द्यायची असेल, तर प्रत्येक गोष्टींमधून देश प्रेम हे दिसायला हवं. आज जर तुम्ही बघितलं तर दिवसेंदिवस आपला रुपया डॉलर च्या मानाने कमी किमतीचा होतं चालला आहे. जर भारतामध्ये कोणी स्वतःचा उद्योग सुरू करत असेल तर, त्याला निश्चित तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात Colgate ब्रँड च्या टूथपेस्ट नें होते, आपण वेफर्स Lays चे खातो, आपली गाडी hyundai ची, आपण coca-cola चे कोल्डड्रिंक पितो, whatsapp, facebook, Google, Intagram हे सर्व विदेशीय अँप्लिकेशन वापरतो आणि मग विचार करतो की भारतीय रुपया दिवसेंदिवस का खाली चालला आहे? याचं उत्तर आपण स्वतः आहोत, जास्तीत जास्त आपल्या देशातं तयार होणाऱ्या भारतीय ब्रँडच्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत, अशाने रोजगार वाढून भारतीय रुपया अजून बळकट होईल.
Western Countries अनुकरण करून स्वतःची संस्कृती विसरणे हे देखील फार चुकीचे आहे. या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करावी जेणेकरून येणाऱ्या पिढ्या याचा आदर्श घेऊन देशाच्या सशक्तिकरणाकडे वाटचाल करतील आणि हीच खरी स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली असेल.
भारतातल्या फक्त वयानेच तरुण असलेल्यांनी नव्हे तर जे मनाने देखील तरुण आहेत,देशाला सर्व बाजूनी सशक्त करण्याची ज्याची प्रबळ इच्छा आहे, जातं-धर्म विसरून जे बंधुभावाने राहायला तयार आहेत, अशा सर्वांनी एकत्र येऊन ही मोहीम हातात घ्यायला हवी, आणि तेव्हा खरा रोज युवा दिवस साजरा होईल.
|
Swami Vivekanand Quote |
शेवटी मी एवढंच म्हणेल की...
जो भरा नही हैं भावो से,
बेहती जिसमे रसधार नही,
वह ह्रिदय नही, वह पत्थर है,
जिसमे स्वदेश का प्यार नही !!
तुम्हा सर्वांना आमच्याकडून राष्ट्रीय युवा दिवसाच्या ( National Youth day ) भरभरून शुभेच्छा.
धन्यवाद 'राष्ट्रीय युवा दिवस - स्वामी विवेकानंद जयंती | National Youth Day 2024' वाचल्याबद्दल!!
जय हिंद,जय महाराष्ट्र.