दिवाळी सणाची माहिती | Happy Diwali 2022 | दिपावली विशेष
दिवाळी सणाची माहिती | Happy Diwali 2022 | दिपावली विशेष, नमस्कार मित्रांनो,
मी नाशिककर आणि आम्हा नाशिककरांना सण म्हंटलं की दोन गोष्टी खूप प्रिय! रंगपंचमीची रहाड आणि दिवाळी पहाट! वर्षाच्या दोन विविध सहामाहीत येणारे दोन विविध सण!
Diva |
आता दिवाळी म्हंटलं, तर सर्व परिसर उजळून निघतो. दिवा, पणत्या, घराला लख्ख रोषणाईने बांधले की प्रसन्न वाटते. मी लहान असताना, घरातल्या सर्वांना पहाटे उठणे बंधनकारक असायचं. आताही कदाचित असेलच बाहेर असल्या कारणाने माहीत नाही पण हे मात्र सुरू असेलचं. दिवाळी घराविना असली की सामान्य दिवस सरला या परि काहींच वाटतं नाही. लहानपणी दिवाळी अंक ह्यांची मात्र नितांत उत्सुकता असायची. त्यात विविध अनुभवांनी उतरवलेली दिलेली दिवाळी सणाची माहिती वाचुन आनंद व्हायचा.
दिवाळी विशेष : दिवाळी माहिती मराठीत / दिवाळी निबंध मराठी
पहाटे, आम्ही भावंड उठलेलो असतानाही मुद्दाम डोळे मिटून निपचित पडलेलो असायचो. आईच्या पाच सहा आरोळ्यांमध्ये उठलो मग मजा कसली. हा मात्र त्या वर ना आजी उठवायला यायची, हा संकेत असायचा की आई पुरेपूर त्रस्त झालेली आहे. यापुढे फक्त फटाके फुटण्याची शक्यता!
पटकन उठून अंघोळीला जायचं, उटण्याचा आणि थंडीच्या वेळी त्या गरम पाण्यासोबत जो काही मेल बसायचा. अंघोळ झाल्यावर पूजा करून घ्यायची. नाश्ता म्हणून गोड धोड खायला मिळायचे. या दिवाळी फराळात रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चकल्या (काटेरी शेव) , शेव, अनारसे इ. गोष्टींची निर्विवाद वर्णी असायची.
Diwali Faral |
वसुबारस माहिती / वसुबारस पूजा
दिवाळीची सुरुवात खरं तर पहिला दिवस म्हणजे वसुबारस! मराठी पंचांगाचा आश्विन महिन्याच्या या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी वासरासहित गोधनाची पूजा केली जाते. घर सौख्यासाठी पूजा करतात असेही म्हंटले जाते. या दिवसापासूनचं घरासमोर रांगोळी काढायला उधाण येते. वसुबारस शुभेच्छा !!
धनत्रयोदशी माहिती / धनत्रयोदशी पूजा
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीचा! आश्विन महिन्याचा तेरावा दिवस, या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवसाला धन्वंतरी पूजन देखील म्हणतात. व्यापारी आपल्या दुकानांत याचं दिवशी पूजा करतात. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नरक चतुर्दशी माहिती / narak chaturdashi
दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी, नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला म्हणून या दिवसाला ‘नरक चतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणापासून मानले जाते. narak nivaran chaturdashi 2022
लक्ष्मी पूजन माहिती
लक्ष्मी पूजन, या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका श्रीविष्णू ने केली आणि लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याचे स्मरण म्हणून या दिनाचे महत्व आहे. व्यापारी लोकांचे नववर्ष या दिवसागणिक सुरू होते असेही मानले जाते. या ही दिवसाची सुरुवात अभ्यंगस्नानाने होते. याचं दिवशी अनेक ग्रामीण भागांत, आमच्या घरी देखील झाडूचीही पूजा केली जाते. laxmi pooja
Aakash-Kandil |
बलिप्रतिपदा माहिती / बलिप्रतिपदा पाडवा
बलिप्रतिपदा म्हणजेच या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. राजा बळीला शेतकरी राजा म्हणूनही संबोधित करतात. 'इडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे' अशी म्हणही प्रचलित आहे. बलिप्रतिपदा दीपावली पाडवा शुभेच्छा !!
भाऊबीज माहिती/ भाऊबीज च्या शुभेच्छा
भाऊबीज म्हणजेच दिवाळीचा सहावा दिवस, या दिवशी सायंकाळी चंद्रकोर दिसल्यानंतर बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ ही ओवाळणी देऊन तिचा सत्कार करतो. बहिण भावाच्या माथ्याला टिळा लावते जो निस्वार्थी व प्रेमभावनेने प्रार्थनसह असतो की भाऊ चिरंजीव व्हावा. bhaubeej
अस काहीसं या दीपावलीच्या सर्व सहा दिवसांचं महत्व आहे. घर या दरम्यान घर दिव्यांनी अगदी उजळून निघते. आता इको फ्रेंडली फटाके बाजारात येत आहेत. पर्यावरणाचा विचार करणे तितकेच गरजेचं आहे. त्याला हानी पोहचवून साजरी केलेला तो सण कसला?
दिवाळी कविता मराठी
अगणिक रोषणाई ला विस्तृत पोहचवणारी दिवाळी।
दुःखांना सारून सुखाचे दिन दाखवणारी दिवाळी।।
दिपमाळांनी लख्ख करणारी दिवाळी।
फटाक्यांच्या टाहो ने थक्क करणारी दिवाळी।।
आधुनिक काळात संस्कृती जोपासणारी दिवाळी।
व्यस्त काळात कुटुंबाला सोबत जपणारी दिवाळी।।
आकाशातून बघितलं तर हसणारी दिवाळी।
तर सैनिकांची, आसवांची असणारी दिवाळी।। ( घराविना दिवाळी म्हणून आसवं)
शब्द सोडून कविता मांडणारी दिवाळी।
कवितेचे यमक शब्दांनी राखणारी दिवाळी।।
बालपणाशी नाळ जोडणारी दिवाळी।
वय बंधनाचा तांब सोडणारी दिवाळी।।
दारावर तोरण सांधणारी दिवाळी।
नात्यांची गाठ बांधणारी दिवाळी।।
दिव्यांच्या प्रकाशाने गर्त आसमंत खुलवणारी दिवाळी।
नजरेत सामावणारी, स्वतःला भुलवणारी दिवाळी।।
नववर्षाची वाट दाखवणारी दिवाळी।
आयुष्याची रहाट शोधणारी दिवाळी।।
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!