व्यवसायाला संकेतस्थळाची गरज असते का? Does every business need a website?
व्यवसायाला संकेतस्थळाची गरज असते का? Does every business need a website? | मला वाटतं, तुमच्या व्यवसायावर अवलंबून आहे. जर तुमचा व्यवसाय काही सुविधा अथवा उत्पादन प्रदान करण्याचा असेल तर नक्कीचं संकेतस्थळ असणे गरजेचे आहे. त्या सुविधा म्हणजे physical किंवा प्रत्यक्ष स्वरूपात असाव्यात. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी ते खूप गरजेचं आहे कारण तुम्ही ती एक गोष्ट ग्राहकापर्यंत पोहचवणार आहात.
मग तुमचे प्रॉडक्ट कसे आहे, ते तुमची सुविधा कशी होती? इथवर ग्राहकाला बांधून ठेवण्यासाठी संकेतस्थळाचा उपयोग होतो. ह्या सर्व गोष्टींचा फीडबॅक त्याचं संकेतस्थळावरून घेऊ शकता. अनेक गोष्टी ह्यामार्फत साधल्या जाऊ शकता.
जर तुमचा व्यवसाय अप्रत्यक्ष स्वरूपात आहे म्हणजे समजा लेखनाच्या निगडित तर काही वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला गेला असता तर संकेतस्थळाची आवश्यकता नव्हती. परंतु आता प्रत्येक गोष्टीला संकेतस्थळांची आवश्यकता आहे असं म्हणायला हरकत नसावी. किंवा तुमचा व्यवसाय हॉटेल/कॅफेच्या निगडित असेल तर सविस्तरपणे बघूया.
सर्वात पहिले म्हणजे hotel/restaurant/ cafe हे एक लोकल स्टोअर व्यवसाय म्हणून बघितले जाते. थोडक्यात म्हणजे एका जागी स्थित! ग्राहकाला आपल्या हॉटेल पर्यंत आणायचे खूप विपणनाचे मार्ग आहेत.
लोकल स्टोअर / फिजीकल स्टोअर मार्केटींग -:
Google my business वर रेजिस्टर कसे करणार?
२. मग पहिली जी दुवा किंवा लिंक मिळेल त्यावर क्लिक करा.
३. "Manage now" वर क्लिक करा.
४. "Find and manage your business" मध्ये तुमच्या हॉटेल किंवा restaurant किंवा कॅफे चं नाव प्रविष्ट करा.
५. "What’s your business name" येईल तिथे "next" वर क्लिक करा.
६. "Choose the category that fits your business best“ यातून तुमच्या व्यवसायाशी निगडित कॅटेगरी category निवडावी लागेल. तिथे restaurant किंवा hotel किंवा café एंटर करू शकता. त्यानंतर "next" वर क्लिक करा.
७. "Do you want to add a location customers can visit, like a store or office?" हे खूप महत्वाचं आणि आवश्यक आहे.
इथे "yes" करून तुमच्या व्यवसायाचा सविस्तर पत्ता प्रविष्ट( Enter) करा आणि "next" करा.
Street Address रस्ताचा पत्ता, City शहर, Pincode पिनकोड, State राज्य वगैरे माहिती प्रविष्ट करा.
८. मग google तुमच्या लोकेशन ( स्थान) वरून recommend ( शिफारस ) करेल की, “Is this your business?" ( हा तुमचा व्यवसाय आहे का? ) तुम्हाला एक लिस्ट/ यादी दाखवली जाईल. आणि त्यातून तुमचा कोणता व्यवसाय असेल तर त्यातून निवडावा किंवा "none of these" ( यापैकी कोणीही नाही) वर क्लिक करा आणि "next" करा.
९. "Where are you located?" म्हणून विचारले जाईल तर google map ची Pin तुमच्या अचूक स्थानावर place करा.
१०. "Do you also serve customers outside this location?" / तुम्ही या location/स्थाना च्या बाहेरही तुमच्या सुविधा देता का? तिथे "Yes" करा.
११. "Add the areas you serve?" / तुम्ही सर्व्ह करत असलेल्या भागांची नावे सामील करा.
पर्यायी आहे पण तुम्ही तुमच्या आसपासचा भाग १६ ते २५ चौ. किमी पर्यंत प्रविष्ट करू शकता.
१२. "What contact details do you want to show to customers?" / तुम्हाला तुमचे ग्राहक कसे संपर्क करू शकता? तिथे संपर्क समाविष्ट करू शकता आणि जर संकेतस्थळ असेल तर तेही प्रविष्ट करू शकता. आणि नसेल तर! "I don’t need a website" वर क्लिक करा. अथवा संकेतस्थळ हवे असल्यास "Get a Website based on your info" वर क्लिक करू शकता. तुम्ही दिलेल्या माहितीवरून google तुम्हाला संकेतस्थळ/ Website बनवून देईल.
Website / संकेतस्थळ केलेले कधीही उत्तम, कारण SEO - Search Engine Optimization चा पर्याय विचारात येऊ शकतो.
१३. "Finish and manage listing" चे पान येईल. "Next करा"
१४. "Verify Your Business" व्यवसाय verify करण्यासाठी
"Postcard by mail enter name" ने postcard द्वारे verify करू शकता.
"Verify later" म्हणून पण एक पर्याय असतो नंतर " Dashboard" मध्ये जाऊन verify करता येईल असे! पण सुरुवातीला verify केलेले कधीही उत्तम!
१५. "Add your services" / सुविधा सामील करा पर्याय ६ वरून तुम्हाला refer केले जाईल तर तिथे तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा / Services सामील करू शकता. अजून 'Custom' देखील करू शकता म्हणजे उदाहरणार्थ
Food Services, Food Delivery etc.
जर डिलिव्हरी सुविधा/ Delivery Service -: शक्य होईल तितक्या पण किमान दहा Sq. Km ( चौ. किमी ) पर्यंत असेल तर टाकू शकतो.
१६. "Add Business Hours" व्यवसायाचे Working Hours तुम्ही सामील करू शकता आणि तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. ग्राहकांना तुमचा व्यवसाय त्यांच्यासाठी कधी उपलब्ध असेल, हे माहीत करवून देणे गरजेचे आहे.
१७. "Add Business Description" तुमच्या व्यवसायाची थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे. ग्राहकांना ते समजणे किंवा तुमच्या व्यवसायाचे त्यांच्या भागात असलेले अस्तित्व त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचं आहे.
पुन्हा "Continue" करा. अशाप्रकारे Google My Business वर तुमच्या व्यवसायाची नोंदणी पूर्ण होईल. मग verify झाल्यावर google listing साठी तयार असेल.
• SEO - Search Engine Optimization
Famous café/hotel in Mumbai
Best cafe in Mumbai
Best Indian food near me
Famous Mumbai Food
Food cafe/restaurant near me
quality food near me
कीवर्ड वर दिले आहेत आपल्याला या सर्व कीवर्डसह फक्त एक परिच्छेद paragraph तयार करणे आवश्यक आहे म्हणजे आपण आपल्या वेबसाइटच्या/संकेतस्थळ मुख्य पृष्ठावरील मेटा टॅगमध्ये किंवा आपल्या खाद्यपदार्थ पृष्ठासारखे कोणतेही अन्य पृष्ठ page समाविष्ट कराल असे वर्णन!
"Google My Business" ची १७वी step मध्ये Description/ वर्णन टाकताना Keyword Research( किवर्ड रीसर्च) करून ते टाकावे. शक्यतो Long Tail Keywords / Keyword Phrase चा वापर करावा म्हणजे स्पर्धा/ Competition कमी होईल.
• SEM - Search Engine Optimization -: सीपीसी, बिड व्हॅल्यू
एकदा का तुमचा व्यवसाय google वर list झाला तर तुमच्या भागात/एरियामध्ये SEM च्या माध्यमातून Google च्या ads रन करू शकता. CPC ( Cost Per Click) आणि Bid Value ह्या संज्ञा यात वापरल्या जातात.
SEM मध्ये दोन गोष्टी बघितल्या जातात
१. Content ( Relevant Content) आणि
२. Cost Per Click!
जर तुमच्या कंटेंटला १० पैकी ८ गुण मिळत असतील आणि Cost Per Click ५० रुपये असेल तर ८ * ५० = ४०० रुपये bid value.
आणि दुसऱ्याच्या कंटेंटला १० पैकी ९ गुण मिळत असतील आणि Cost Per Click ४० रुपये असेल तर ९ * ४० = ३६० रुपये bid value.
तर पहिली कंटेंटची ऍड google वर दाखवली जाते.
• Content Marketing -: बॅकलिंक्स Backlinks
Quora सारख्या वेबसाइट्स / संकेतस्थळ कॅफेला किंवा हॉटेल किंवा रेस्टॉरंटला अप्रत्यक्षपणे ग्राहकांना गूगल सर्च करण्याची शिफारस करू शकतात उदा. अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यात आपण त्यांच्या संबंधित साइटवर पुरवित असलेल्या Food related queries बद्दल अभिप्राय किंवा पुनरावलोकने दिली जातात जेणेकरून मोठ्या प्रमाणात ग्राहक विभाग लक्ष्यित होईल.
एखाद्या फूड ब्लॉगर
food blogger ला संपर्क करु शकता. तुमच्या हॉटेल/रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या
dishes वर ते
food review च्या निगडित
blogs लिहून (
food review / feedback related blogs) तुमच्या
site/संकेतस्थळावर
backlinks देऊ शकतात. किंवा इतर
food review ब्लॉग पोस्टवर तुम्हाला
backlink देऊ शकता.
नियमित ग्राहकाचा डेटा गोळा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण त्या ग्राहकाला त्याच्या / तिच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ईमेलद्वारे काही खास ऑफरची माहिती देऊ शकतो.(त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही भेट प्रदान करू शकतो हा आणखी एक चांगला पर्याय ठरू शकतो).
विविध
offers तुम्ही
Email द्वारे ग्राहकांना कळवू शकता. त्यासाठी
Mailchimp किंवा
HubSpot चा वापर करणे सोयीस्कर असेल.
Mailchimp वर २००० पर्यंत संपर्काना एक महिन्यासाठी तुम्ही मोफत
Email करू शकता.
• सोशल मीडिया मार्केटींग / Social Media Marketing -:
Instagram / इंस्टाग्राम (इंस्टाग्राम प्रचारांऐवजी(promotions) इंस्टाग्राम Pages द्वारे)), फेसबुक (प्रथम इंस्टाग्रामाला प्राथमिकता देऊन, नंतर त्याच पोस्ट्स फेसबुक (फेसबुक pages), टेलीग्राम (आपले चॅनेल / पृष्ठ बनवा आणि त्यामध्ये विद्यमान सर्व ग्राहक जोडा)).
तुमच्या एरिया मध्ये ऍक्टिव्ह असलेले इंस्टाग्राम
pages promotions हुन अधिक फायदेशीर ठरू शकतात.
Food review करणाऱ्या इन्स्टाग्राम किंवा
facebook pages च्या admin ला तुम्ही आमंत्रित करू शकता. जेणेकरून
referral योग्यप्रकारे कार्य करतील.
या सर्व गोष्टी तेव्हाचं मॅटर करतात जेव्हा तुमची सुविधा, तुमचे प्रॉडक्ट ग्राहकाला भावतात.व्यवसायाला संकेतस्थळाची गरज असते का? Does every business need a website। लेख - अनिकेत कुंदे