What does the soldier think? Marathi essay | सैनिक काय विचार करतो? | सैनिकाचे मनोगत मराठी निबंध
सैनिक काय विचार करतो? | सैनिकाचे मनोगत मराठी
काही जणांचा असा समझ असतो की, सैन्यात म्हणजे सरकारी भत्ता, सोय सुविधा आणि भरमसाठ पगार! यासाठी एकचं सांगावसं वाटतं सध्या थैमान घालत असलेलं कोरोनाचे उदाहरण! शहराकडे कामाला गेलेल्यांना संकट बघता गावाची ओढ खेचते. सैनिकांच्या बाबतीत असं मुळीच नाही. माघारी फिरणे ह्यांच्या देशभक्ती नावाच्या धर्मातचं नाही.
स्वतःला झोकून देऊन रक्षणाचा विडा उचलणे, हर किसी के बस की बात नहीं. योग्य ते शिक्षण घेऊन, जोमाने आर्मी च्या भरतीची तयारी करणे. सातत्य आणि संयम बाळगणे हे गुण जरूर आपण सैनिकांकडून शिकण्यासारखे आहे. कोरोना काळात जेव्हा सर्वजण घरात बसून त्यविरुद्ध अप्रत्यक्षपणे लढा देत होते, तेव्हा सैनिक रस्त्यांवर उतरून प्रत्यक्ष त्याला सामोरे जाऊन लढत होते.
सैनिक काय विचार करतो? १५ ऑगस्ट विशेष
असंच एक सैनिकाने व्यक्त केलेले मनोगत!
मी शाम, ६ वर्ष झाले मला भारतीय सैन्यात दाखल होऊन, नंतर लग्न आणि आता ३ वर्षांची मुलगी आहे. आपल्या आईवडिलांपासुन दूर असुन देखील त्यांची आणि देशाची एकाच वेळी सेवा कशी करता येईल, याचं प्रयत्नात मी नेहमीच असते.
६ ,७ महिन्यांनी तर कधी वर्ष होऊन जाते. घरी जाण्याचा योग जरी आला, तरी देश रक्षणासाठी आपण काही दिवस गैरहजर ही एक काळजी मात्र नेहमी काळीज पिळवटून टाकते.
माझ्या मुलीचं नाव राही! मी घरून निघतो पुन्हा रूजू व्हायला तेव्हा तिच्या समोर कधीच जात नाही, काय माहीत? पण तिच्या त्या आसवांकडे न बघावसं वाटतं. सैन्यात असणाऱ्या प्रत्येकाचं मन कठोर असतं म्हणे पण अशा वेळी ते हळवं होतंच.
असंच राहीच्या मनातुन आणि माझ्या पत्नीच्या लिहिन्यातून एक पत्र आले होते, म्हंटलं लेखात मांडावे,
नमस्कार बाबा ,
कसे आहात तुम्ही ? आम्ही सर्व जण ठीक आहोत. फक्त तुमची नेहमी आठवण काढत असतो. विशेषकरून आजोबांची तक्रार करायची होती तुमच्याकडे, वेळेवर औषध घेत नाहीत ते! सतत TV समोर बसुन एकटक बातम्या बघत असता. जर कोणी देशाखातिर शहीद!
कसे आहात तुम्ही ? आम्ही सर्व जण ठीक आहोत. फक्त तुमची नेहमी आठवण काढत असतो. विशेषकरून आजोबांची तक्रार करायची होती तुमच्याकडे, वेळेवर औषध घेत नाहीत ते! सतत TV समोर बसुन एकटक बातम्या बघत असता. जर कोणी देशाखातिर शहीद झाले की भावुक होतात आणि अशा बातम्यांमुळे जीव एकवटला जातो आमचा पण! आजी हल्ली म्हणत असते मी आता मोठी झाले, खरच का बाबा म्हणजे जर खरं असेल तर तुम्ही अगदी निश्चिंत रहा इथे सर्वांची काळजी घेईन मी! आजोबांना वेळेवर औषध देईन, आजीच्या टोमण्याला मात्र असंच काहीसं उत्तर देईन, आईला देखील मदत करेन, त्रास देणार नाही. पण ह्याला शाबासकीच्या तुमच्या हाताची कमतरता भासते. तुम्हाला आठवतं मागच्या दिवाळीला तुम्हाला अचानक फोन आला नि तडक बॅग भरून तुम्हाला निघावे लागले होते. कदाचित आम्ही प्रत्येक सण तुमच्याविना नेहमी असचं गृहीत धरून असतो. पत्र लिहिण्याचं कारण की आज गुढीपाडवा आईने तुमच्या आवडती पुरणपोळी केलेली आणि तुमची आठवण झाली.
पुढच्या पत्राची किंवा सणाची वाट नाही बघणार मी आता, त्याआधी एकदा तरी घरी या ना तुम्ही ? काळजी घ्या!
राहीचे शब्द नकळत आसवांचं कारण होतात. मी का इतका दूर आहे? कोणासाठी? हा प्रश्न पडतोचं नेहमी! पण आग्रह ,धाडस आणि जिद्द त्या देशाच्या संरक्षणापुढे मग मन रिते होतं, नतमस्तक होते.
घुसखोरी, चकमकी या गोष्टी आम्हाला काही नवीन नाही, याला भीत पण नाही आम्ही! जीव जेव्हा इथे येतो तेव्हाच तो देशासाठी ओवाळून टाकलेला असतो. भीती हा प्रकार आमच्या मनात ना ध्यानात !!
आई वडिलांचं आपण काही देणं लागतो, पण म्हणतात ना!
देश हीच माता ,देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता
-ग.दि.माडगूळकर(गदिमा)
काही गोष्टींची मात्र खंत वाटते, जेव्हा विविध जातींमध्ये, धर्मांमध्ये, राज्यांमध्ये दंगे, मोर्चे उठतात. खंत वाटण्याचं कारण हे नाही की आमचा यात सहभाग होतो, हस्तक्षेप करावा लागतो, दगडधोंडे पण झेलावे लागता. तर, सीमेवर कोणताही सैनिक जात, धर्म न बघता लढत असतो, वीरमरण येते ते देखील भारतीय, देशभक्त आणि देशप्रेमी म्हणूनच!!
सैनिक काय विचार करतो? | सैनिकाचे मनोगत मराठी | What does the soldier think? | सैनिकाचे मनोगत मराठी लेख -: अनिकेत कुंदे
छान लेख आहे.
ReplyDeleteखूप छान लेख आहे...👌👌
ReplyDelete