Unani-Medicines |
नमस्कार मित्रांनो,
BUMS Course Information in Marathi | युनानी औषधे आणि शस्त्रक्रिया मध्ये पदवीधर भारतामध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आयुर्वेदिक उपचार पद्धत तर आपल्या सर्वांना माहिती असेल. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला त्यानंतर भारतावर अनेक परकीय सत्तांनी आक्रमण केले त्याच बरोबर त्यांची संस्कृती व इतर अनेक गोष्टी आपल्यावर लादल्या गेल्या, यामध्ये त्यांची औषधोपचार पद्धती देखील सामील आहे. इंग्रज आल्यानंतर ऍलोपॅथिक, होमिओपॅथीक औषधे जास्त खाऊ जाऊ लागली. आणि भारतामध्ये आज देखील सर्वात जास्त ऍलोपॅथिक औषध उपचार चालतात.
पण भारतामध्ये एक अशी औषधोपचार पद्धत देखील अस्तित्वात आहे जी बऱ्याच प्रमाणात आपल्या देशात व इतर देशात देखील वापरली जाते. व त्यासाठी तुम्हाला त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन कोर्स करावा लागतो. ज्या कोर्सचे नाव आहे BUMS, युनानी medicines हे नाव देखील तुम्ही नक्की ऐकले असेल. Bums हा कोर्स देखील याच्या संबंधित आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याचं म्हणजेच BUMS या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
युनानी औषध उपचार पद्धतीचा उगम
या युनानी औषध उपचार
पद्धतीचा उगम प्राचीन ग्रीक देशांमध्ये झाला होता. साऊथ एशिया मध्ये या औषध उपचार
पद्धतीचा वापर करून Health Maintenance आणि Healing केली जात असे.
मिडल इस्ट मध्ये या पद्धतीवर development झाल्यामुळे या औषध उपचार पद्धती ला
अरेबियन औषधोपचार पद्धती किंवा इस्लामिक औषध उपचार पद्धत देखील म्हणतात.
bums full form
Naturopathy, homeopathy इत्यादी सारखीच BUMS देखील एक alternative उपचार पद्धत आहे. BUMS याचा फुल फॉर्म आहे Bachelor in Unani medicines and surgery. युनानी औषधे आणि शस्त्रक्रिया मध्ये पदवीधर (bums full form in marathi). त्याचबरोबर या डिग्री कोर्सला उर्दूमध्ये Kamil-e-tib-o-Jarahat देखील संबोधले जाते. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेपाच वर्षांचा कालावधी लागतो ज्यामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप सामील असते.
आमच्या ब्लॉगवर अधिक वाचा : दहावी नंतर काय? | १० वी नंतर पुढे काय करावे? What After 10th? : वाचा सविस्तर !!
तुम्हाला देखील जर हा कोर्स करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमची निदान बारावी पूर्ण करावी लागते. त्याचबरोबर बारावी मध्ये इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, उर्दू, हे विषय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बारावीला तुम्हाला कमीत कमी 50 टक्के मिळणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन मिळेल. काही इन्स्टिट्यूशन मध्ये आठवीपर्यंत तुम्हाला हिंदी हा विषय असणे देखील बघितले जाते.
खूप सार्या शैक्षणिक संस्था BUMS या कोर्सचे ऍडमिशन नॅशनल आणि स्टेट लेवलच्या Entrance Exam घेऊन देतात. KEAM, CPAT, CPMEE, NEET या काही entrance exam आहेत. ज्या या कोर्सच्या ॲडमिशन आधी घेतल्या जातात.
BUMS या कोर्सची जर आपण स्पेशलिटी बघितली तर , bums course
- munefe-ul-Aza ( physiology ),
- IImuladvia ( pharmacology ),
- tashreen-ul-badan (Anatomy ),
- IImussaidala ( pharmacy ),
- IImulAmraz ( pathology ),
- Moalijat ( medicine ),
- IImulJarahat ( surgery ),
या सर्व या कोर्सच्या Speciality
आहेत.
आता जर तुम्हाला हा कोर्स करायचं असेल तर भारतातल्या या कोर्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध महाविद्यालयांची यादी आम्ही खाली देत आहे :-
bums colleges in india
1) Luqman Unani Medical College and Hospital, Bijapur.
2) National Institution of Medical Science, New Delhi.
3) Glocal University, Saharanpur.
4) Eram Unani Medical College and Hospital, Lucknow.
5) Aligarh Muslim University, Aligarh.
6) University of Delhi, Delhi.
7) Government Unani medical college, New Delhi.
8) Government Ayurveda College, Thiruvananthapuram.
9) Government autonomous Unani Medical College and Hospital,
Bhopal.
तर मित्रांनो BUMS कोर्ससाठी भारतातली ही सर्वोत्तम कॉलेज आहेत.
आमच्या ब्लॉगवर अधिक वाचा : पोलीस उपनिरीक्षक | PSI information in Marathi | PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते ?
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या field मध्ये काम करू शकता हे आता आपण पाहुयात.
युनानी औषधे आणि शस्त्रक्रिया करिअर संधी | Bums career opportunities
1) Consultant
2) Therapist
3) Scientist
4) Public Health Specialist
5) Private Practice
6) Lecturer
7) Pharmacist
8) Medical Assistant
9) Spa Director
BUMS हा कोर्स केल्यावर तुम्हाला फक्त भारतातच रोजगाराच्या संधी उपलब्ध
नाहीत तर तुम्ही इतर देशात जाऊन देखील रोजगार मिळवू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय
देखील चालू करू शकता. भारताबाहेरील काही देशातील अनेक संस्था, रिसर्च विद्यापीठे
यांना हा बॅचलर कोर्स पूर्ण झालेल्या मुलांची गरज भासते.
BUMS हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला “हकीम" म्हणजेच डॉक्टर संबोधण्यात येते. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस देखील चालू करू शकता. त्याचबरोबर सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून देखील तुम्ही काम करू शकता.
BUMSची degree ज्यांच्याकडे आहे, त्यांना Job देणाऱ्या
संस्थांची देखील कमी नाही. चला तर आता अशा काही recruiters ची यादी पाहू.
1) Unani Medical Colleges
2) Unani Clinic
3) Unani Charitable Trust
4) Unani Medicine Store
5) Unani and Ayurvedic Research Institutions
6) Unani Medical System Education and Institutions
7) Life Science Industries
8) Clinical Trial Laboratories
9) Unani Consultancies
10) Unani Dispensaries
11) Unani Pharmaceutical Industries like Hamdard
12) Drug Control Center ( State and Central Government )
13) Unani Government Hospitals
14) Unani Private Hospitals
Bums Salary in India
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये कामाला लागलात, तर तुम्हाला किमान 15 हजार रुपये starting salary मिळेल. तुमची दोन वर्षाची प्रॅक्टिस अवलंबून झाल्यानंतर हा पगार 25000 देखील होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचा पगार हा तुमच्या अनुभवानुसार वाढत जाईल. बऱ्याच वेळा हा पगार तुम्ही कोणत्या संस्थेत काम करत आहात यावर देखील अवलंबून असतो.
तर मित्रांनो जर तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी फार मौल्यवान ठरू शकतो. या कोर्स बद्दल ची माहिती आपल्या प्रियजनांबरोबर मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. त्याचबरोबर हा लेख आपल्याला किती माहितीपूर्ण वाटला हे कॉमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद 'BUMS Course Information in Marathi | युनानी औषधे आणि शस्त्रक्रिया मध्ये पदवीधर' वाचल्याबद्दल !!