कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | power of attorney meaning in marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला “Power of attorney" म्हणजे काय ते सांगणार आहोत. त्याचबरोबर Power of attorney कसे तयार केले जाते? ते किती दिवस valid असते, Power of attorney चे फायदे आणि नुकसान इत्यादी विषयी माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
Power of attorney म्हणजे काय? power of attorney in marathi
Power of attorney ला मराठी भाषेमध्ये कुलमुखत्यारपत्र असे म्हटले जाते. Power of attorney म्हणजे सरकारी कामांसाठी केलेला दस्त. या दस्तामार्फत एखादा व्यक्ती स्वतःचे अधिकार दुसर्या व्यक्तीला देऊ शकतो. किंवा या सरकारी दस्तामार्फत एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून घोषित करतो. यास अधिकार पत्र म्हणून देखील संबोधले जाते, अगदी नावाप्रमाणेच एखादा व्यक्ती स्वतःचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला सोपवते. आणि यानूसारच अधिकार प्राप्त झालेली व्यक्ती, त्या विशिष्ट गोष्टीबाबत स्वतः निर्णय घेऊ शकते, बदल करू शकते, इत्यादी!!
अनेक दैनंदिन व्यवहारांमध्ये विशेषतः प्रॉपर्टीची खरेदी-विक्री, भाडेकरार, इतरही बर्याच व्यवहारांमध्ये कुलमुखत्यारपत्र म्हणजेच power of attorney चा वापर केला जातो.
जी व्यक्ती पॉवर ऑफ अटॉर्नी दुसऱ्या व्यक्तीला देते, तिला मालक किंवा मास्टर असे म्हणतात तर ज्या व्यक्तीस कुलमुखत्यारपत्र दिले जाते तिला एजंट किंवा कुलमुखत्यार धारक असे म्हटले जाते.
•कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक असते?
पूर्वीच्या काळी कुलमुखत्यारपत्र किंवा इतर वेगवेगळ्या करारांची कायदेशीर नोंदणी करण्यास लोक टाळाटाळ करत असत. परंतु सरकारी कायद्यानुसार इथून पुढील सर्व महत्वाचे करार नोंदणीकृत करणे अनिवार्य झाले आहे. जर कुलमुखत्यार पत्राची अधिकृत नोंदणी झाली नसेल तर अशा कुलमुखत्यारपत्राला कायदेशीर मान्यता नसते. आणि यामुळेच कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक असते.
अधिक वाचा : ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi - माहिती !!
•कुलमुखत्यार पत्राचे स्वरूप / power of attorney format in marathi
कुलमुखत्यार पत्र हे सामान्यतः दोन स्वरूपाचे असते. कुलमुखत्यार पत्र देताना ते मर्यादित अधिकार किंवा अमर्यादित अधिकार या स्वरूपाचे असते. जर कुलमुखत्यार धारकास मर्यादित अधिकार द्यायचे असतील तर मर्यादित कुलमुखत्यार पत्र किंवा कुलमुखत्यार धारकास सर्वच अधिकार द्यायचे असतील तर अमर्यादित स्वरूपाचे कुलमुखत्यारपत्र बनवले जाते.
हे पण वाचा -: माहिती अधिकार कायदा विषयी माहिती | Right to Information Act 2005 in Marathi
• कुलमुखत्यार पत्राचे प्रकार | Types of Power of Attorney
सामान्यतः कुलमुखत्यार पत्राचे दोन ते तीन प्रकार असतात.
1) जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी ( general power of attorney format in marathi ) :-
नावाप्रमाणेच या कुलमुखत्यार पत्रामध्ये सगळ्या जनरल terms असतात. या कुलमुखत्यारपत्रा द्वारे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अनेक कामे करण्याची परवानगी देत असतो. जसे की सरकारी कागदपत्रे जमा करणे, कागदपत्रे परत घेणे, सरकारी कामासाठी अर्ज करणे, त्याचबरोबर काही वेळा पैशांचे व्यवहार करणे, पावत्या बनवणे,पावत्या देणे, इत्यादी दैनंदिन जीवनातील सर्व जनरल कामांचे अधिकार जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे मुखत्यार पत्र धारकास दिले जाते. या कुलमुखत्यार पत्राद्वारे कुलमुखत्यार पत्र धारकास कोणत्याही व्यक्ती कडून पैसे घेण्याचे अधिकार नसतात. हे विनामोबदला कुलमुखत्यारपत्र असून यास पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. attorney general meaning in marathi
2) स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी ( specific power of attorney ) :-
एखाद्या ठराविक कामाकरिता दिल्या जाणाऱ्या कुलमुखत्यार पत्रास स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी असे संबोधले जाते. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती परदेशी वास्तव्यास असेल व त्या व्यक्तीला भारतामधील स्वतःच्या फ्लॅटचे पझेशन द्यायचे असेल किंवा घ्यायचे असेल तर अशावेळी स्वाक्षऱ्यांचे अधिकार देणे, किंवा बिल्डर बरोबर खरेदीखत, साठेखत, करार करायचा आहे व त्यावर त्या व्यक्तीच्या वतीने स्वाक्षऱ्या करायचे असल्यास, रेंट एग्रीमेंट, इत्यादी कामांसाठी स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी दिली जाते. स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी साठी देखील पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.
अधिक वाचा : समान नागरी कायदा म्हणजे काय? | uniform civil code in marathi
3) इरिवोकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी ( Irrevocable power of attorney ) : -
इरिवोकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र. हे कुलमुखत्यारपत्र नेहमी प्रॉपर्टीशी संबंधितच असू शकते. कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र हे तेव्हाच शक्य असते जेंव्हा आपण प्रॉपर्टी चे अधिकार राइट, टायटल, इन्वेस्ट, ownership, खरेदीखत किंवा एखाद्या डेव्हलपमेंट कराराच्या अंडर एखाद्या बिल्डर ला दिलेले असतात, किंवा एखाद्या व्यक्तीला विकलेले असतात याच केसेस मध्ये कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र बनवता येते.
power of attorney for property in marathi
जर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम किंवा मोबदला मिळाला असेल, पण त्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी स्वतःला स्वाक्षऱ्या करण्यासाठी जाता येणे शक्य नसेल, उदाहरणार्थ बांधकामाच्या परवाणग्या, NA च्या परवाणग्या, एन ओ सी, तर अशा ठिकाणी तुम्ही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र देऊ शकता. पण बऱ्याच वेळेला बिल्डरने पूर्ण पैसे मालकाला दिलेले नसतात तरीही हे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र बनवून घेतले जाते, खरे तर अशा प्रकारे कुलमुखत्यारपत्र बनवून घेतले जाऊ शकत नाही. आणि जरी बनवून घेतले तरीं ते कुलमुखत्यार पत्र रद्द करता येऊ शकते. कुलमुखत्यारपत्र कोणत्याही स्वरूपाचे असले तरी ते कुलमुखत्यार पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपुष्टात येते पण कधीही रद्द न होणारे म्हणजेच ( Irrevocable Power ऑफ attorney ) जी तुम्ही पूर्ण मोबदला घेऊन दिलेली आहे ती कुलमुखत्यार पत्र देणाऱ्याच्या मृत्यूपश्चात देखील Valid असते. हिच या कुलमुखत्यार पत्राची खासियत आहे.
अधिक वाचा : Rich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश
Irrevocable Power of attorney ( कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र ) यासाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस | irrevocable power of attorney format in marathi :-
जमिनीच्या किमतीच्या सहा टक्के स्टॅम्प ड्युटी, व 1 टक्के रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जातात. हा करार मुख्यतः विक्री कराराप्रमाणे मानला जातो आणि यामुळेच यासाठी पूर्णपणे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जातात.
आम्ही अशी आशा करतो की वरील लेखामधून तुम्हाला 'कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | power of attorney meaning in marathi' हे तुम्हाला समजले असेल. धन्यवाद!!