पोलीस उपनिरीक्षक | PSI information in Marathi | PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते?
पोलीस उपनिरीक्षक | PSI information in Marathi | PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते ?आजची तरुण पिढी ही सरकारी नोकरी च्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये पीएसआय हे एक महत्त्वपूर्ण पद आहे. एमपीएससी आयोगाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून पीएसआय पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी पीएसआय पदासाठी अर्ज करीत असतात.
परंतु आपल्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना पीएसआय म्हणजे काय? किंवा पीएसआय पदाबद्दल पुर्णता माहिती अध्यावत नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही PSI information in Marathi घेऊन आलोत. आम्हाला आशा आहे की, PSI information in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.
Police Sub inspector |
PSI meaning in Marathi | पीएसआय म्हणजे काय?
psi full form | psi full form police
PSI शब्दाचा इंग्रजी अर्थ 'Police sub inspector' असा होतो तर PSI meaning in Marathi 'पोलीस उपनिरीक्षक' असा होतो.
MPSC आयोगाकडून पीएसआय पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. Mpsc combined group B ही परीक्षा PSI, STI, ASO या पदांसाठी एकत्रित prelim exam घेऊन पीएसआय पदांसाठी योग्य पात्रता असलेल्या व्यक्तिची निवड करतात. याला मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा म्हटले जाते.
Psi information in marathi 2023
PSI परीक्षेचे स्वरूप | psi exam information in marathi
पीएसआय परीक्षेचे स्वरूप मुख्यता चार विभागांमध्ये विभागलेले असते ते पुढीलप्रमाणे-
1. पूर्व परीक्षा - 300 गुण
2. मुख्य परीक्षा - 400 गुण
3. मुलाखत - 75 गुण
4. शारीरिक चाचणी - 200 गुण
पूर्व परीक्षेचे स्वरूप
पीएसआय पूर्व परीक्षा 300 गुणांची करिता असते. या पेपरसाठी एक तासाची वेळ असते. पेपर 1 हा general ability वर आधारित असतो. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच m.c.q. या पद्धतीचे असते. या पेपरमधील प्रत्येकी प्रश्नाला एक गुण असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप
मुख्य परीक्षा यामध्ये एकूण दोन पेपर असतात पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येकी पेपर हा 200 गुणांचा असतो.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे-
पेपर क्रमांक १:
यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयांसाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची एक उत्तरे असा अभ्यासक्रम सध्या आयोगाने दिलेला आहे .
पेपर क्रमांक २ :
यामध्ये पुढील घटक व उपघटकांसाठी कंसात दिलेल्या गुणांइतके प्रश्न सर्वसाधारणपणे विचारले जातात .
चालू घडामोडी ( ३० गुण )
बुद्धिमत्ता चाचणी ( ४० गुण )
मुंबई पोलीस कायदा ( १० गुण )
मानवी हक्क व जबाबदाऱ्या ( ४० गुण )
महाराष्ट्राचा भूगोल ( ४० गुण )
महाराष्ट्राचा इतिहास ( २५ गुण )
भारतीय राज्यघटना ( १५ गुण )
मुलाखत
पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवार कितपत सक्षम आहे हे मुलाखतीतून ठरविले जाते. मुलाखत हा पीएसआय परीक्षेचा अंतिम टप्पा असतो. मुलाखत मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पीएसआय बनतो.
शारीरिक चाचणी
शारीरिक चाचणी हे 200 गुणांकरिता असते. यामध्ये 200 गुणांपैकी 100 गुण मिळवणे अनिवार्य आहे.
पुरुषांसाठी
1.गोळाफेक - वजन ७.२६० कि . ग्रॅ . कमाल गुण = ३०
2.पुल अप्स -कमाल गुण = ४० कमाल गुण % ३०
3. धावणे ( ८०० मीटर्स ) - कमाल गुण = १००
4. लांब उडी -४०
महिलांसाठी
1.गोळाफेक : वजन ४ कि . ग्रॅ . कमाल गुण
2.धावणे ( २०० मीटर्स ) : कमाल गुण : 20
3. चालणे ( ३ कि . मी . ) ; कमाल गुण : ८०
Maharashtra Police |
police sub inspector recruitment
PSI साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता | पोलीस उपनिरीक्षक पात्रता
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रतेचा विचार करताना जे उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. तसेच उमेदवार भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला योग्यप्रकारे लिहिता-वाचता येणे गरजेचे आहे.
PSI साठी वयोमर्यादा -:
सामान्य श्रेणीतील व्यक्तींसाठी 19 ते 31 वर्षांत पर्यंतची मर्यादा असते तर मागासवर्गीय सेनेतील विद्यार्थ्यांसाठी 19 येते 34 वर्षापर्यंत मर्यादा असते.
धन्यवाद 'पोलीस उपनिरीक्षक | PSI information in Marathi | PSI होण्यासाठी काय तयारी करावी लागते ?' वाचल्याबद्दल!!