बदलते शिक्षण मराठी माहिती | ऑनलाइन शिक्षण चांगले की वाईट? | कोरोना काळाने बदललेली शिक्षणपद्धती
१) शिक्षणाचे बदलते स्वरूप
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाशिवाय कुठलाही व्यक्ती पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षणाची शैलीही आजच्या काळाची नसून प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले जात होते. सुरवातीला माणसाला विविध कलेचे शिक्षण दिले जात होते जसे की, धनुर्विद्या.
Advantage and disadvantage of online and offline classroom in Marathi
हे पण बघा -: नवीन रोचक आणि महत्वपूर्ण माहिती साठी भेट द्या - प्रज्ञान
हे वाचा : पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi
काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना शिक्षणामधील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पाटी आणि पेन्सिल हे होते. परंतु आधुनिक काळाप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आले. या पाटी पेन्सिलीची जागा आज वही आणि पेनाने घेतलेली आहे
Education vs Knowledge / कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण | online education in marathi
२) बदलती शिक्षण व्यवस्था
यापूर्वी शिक्षणाला पाहिजे तेवढे महत्त्वाचे स्थान नव्हते. परंतु आजच्या काळामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. आजच्या काळामध्ये जगणारा प्रत्येक व्यक्तीला शिक्षण इतके महत्त्वाचे दुसरी कुठलीही गोष्ट वाटत नाही.
जन्माला आलेल्या मुलाला काही वर्षांमध्ये शाळेमध्ये घालून त्याला ज्ञान दिले जाते. थोडक्यात लहान वयापासूनच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली जाते. शिक्षण असे माध्यम आहे. ज्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो.
असे म्हटले जाते की देशाची तरुण पिढी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे. परंतु देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे केवळ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयाचे शिक्षणासोबतच आयुष्य जगताना आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांची प्रगती करणारे ज्ञान म्हणजे शिक्षण होय.
परंतु अलीकडच्या काळामध्ये आतोनात प्रगती झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात डिजिटल युग असे सुद्धा म्हटले आहे. आज नवनवीन शोध लागले. या शोधांच्या जोरावर आजचे जीवन हे अधिकच सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. आणि या शोधांचा परिणाम हा आजच्या शिक्षणावर होत चालला आहे. त्यामुळे शिक्षण देखील बदलत चालले आहे. Digital Education in India
बदलते शिक्षण हे आजच्या पिढीला देखील बदलत आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षणाने देखील डिजिटल रूप धारण केले आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपाचे शिक्षण दिले जात आहे. एवढेच नसून आजच्या काळात ऑनलाईन शिक्षण प्रणाली चालू झाली आहे. विद्यार्थ्यांना घरात बसून शिकून ज्ञान दिले जात आहे. Digital Education Revolution
एक प्रकारे बदलते शिक्षण हे सोईस्कर आणि सोपे झाले आहे. तर बदलत्या शिक्षण प्रणालीचे परिणाम देखील पहायला मिळत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये प्रात्यक्षिक रित्या दिलेले शिक्षण हे एक उत्कृष्ट दर्जा पदावर बजावते. तर ऑनलाइन स्वरूपात मिळालेले शिक्षण हे काही विद्यार्थ्यांना समजते तर काही विद्यार्थ्यांना समजतही नाही.
काळानुसार बदलते शिक्षण हे योग्य प्रकारचे मानले जात आहेत. तर काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीलायोग्य दर्जा दिला जात आहे.
त्यामुळे बदलते शिक्षण हे कितपत योग्य आहे. हे प्रत्येकाच्या विचारधारणेवर अवलंबून आहेत. आपण फक्त ज्ञानप्राप्त करणे या हेतूने शिक्षण घेतले. तर शिक्षण हे कुठल्याही स्वरूपाचे असून ते आपल्याला फायदेशीरच ठरते.
तर मित्रांनो! "बदलते शिक्षण मराठी माहिती" वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
बदलते शिक्षण मराठी माहिती | ऑनलाइन शिक्षण चांगले की वाईट? | कोरोना काळाने बदललेली शिक्षणपद्धती वाचल्याबद्दल धन्यवाद !!