जागतिक शांतता दिवस 2022 | International Day of Peace 2022 in Marathi
जागतिक शांतता दिवस 2022 | International Day of Peace 2022 in Marathi | २१ सप्टेंबर दरवर्षी याचं दिवशी जागतिक शांतता दिवस म्हणून साजरी केला जातो.
जागतिक शांतता दिन 2022
shaping peace together संयुक्त राष्ट्रांनी ह्याची सुरुवात वर्ष १९८१ पासून केली होती आणि म्हंटलं ही जाते ह्या मागचे कारण युद्धजन्य परिस्थिती आणि हिंसेला आटोक्यात आणणे आहे.
international peace day 2022
![]() |
International Peace Day 2021 |
जागतिक जर बघितलं तर कोरोना रुपी राक्षसाने पुरेसे थैमान घालून ठेवले होते आणि सध्याही त्याचा काही पूर्णतः ओसर अजून पडलेला नाही. मागच्या वर्षी तर शांतता दिन खरंच शांत रीतीनेचं सर्वांच्या नकळतचं साजरी झाला असेल. World Peace Day 2022
world peace day is celebrated on 21st September!! | 21 September world peace day
एक गोष्ट स्वइच्छेने नमूद करावीशी वाटते. आपण भारतीय अशात काय करत होतो?
तर शांतता दिन साजरी करतोय ते म्हणजे गेल्या वर्षापासून कोरोनाच्या शिरकावासोबत लोकांचा व्यवसाय, नोकरी, तसेच तोंडावरही लॉकडाऊन बसले. मग करावयाला काही नाही मग सोशल माध्यम उत्तम मार्ग असतो. संतप्त किंवा उसळलेल्या मनात साचलेल्या रागाचा मात्र उद्रेक व्हायला योग्य असं माध्यम.
ट्विटर, व्हाट्सएप आणि इन्स्टाग्राम हे तर रोष सार्वजनिक पसरवण्याचे हानिकारक वा वाईट माध्यम!! ह्यांचा उपयोग विपणनासाठीही (social media marketing) उत्तम होऊ शकतो हे आमच्या बुद्धीला ज्ञात नसावे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांत एकदम घरात वेळ व्यथित होत असल्यामुळे लोकही आनंदी होते. मागून न मिळणारी सुट्टी या आपत्तीने देऊ केली होती. पण वेळ सरत गेली, कामात व्यस्त असणे लोकांना सर्वसुखी असते असे वाटू लागले. कामाचा बोजा डोईवर अन हातात मोबाईल नामक यंत्र ह्यांचा मेळ बसू लागला. social media negatives
अनेक प्रकरण आम्हा भारतीयांच्या वाटेला आले, चर्चेला उधाण फक्त!! सुशांत सिंग राजपूत एक बॉलीवूड अभिनेता त्याची आत्महत्या की हत्या, इथून शेती बिल, राम मंदिर, सुरवातीच्या काही वेळ NRC/ CAA मध्येही गेला. Debate/ वादविवाद हा तर आम्ही भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय! इथे जर आम्ही गप्प बसलो तर ह्याचा अर्थ जग आम्हाला काहीच माहीत नाही, असे घेईल. पण ह्याचे पडसाद उमटू लागले ते लॉकडाउन च्या अखेरीस! मोर्चा, आंदोलने! सरकारविरोधात रोष मांडणे ही गोष्ट काही चुकीची नाही. पण का करत आहोत? ह्याचं सढळ कारण समोर असायला हवे.
एक अभिनेत्री, तिने म्हंटलं ह्या चित्रपट उद्योग मध्ये नेपोटीझम अशा विषयांवर टीका केली, ती टीका अतिशय योग्यही होती. पण हत्या की आत्महत्या या पासुन दूर नेऊन ठेवणारा हा विषय घडला. ह्यामागची पार्श्वभूमी माहित न करता लोकांनी प्रतिक्रिया द्यायचा वेळ शुन्य सेकंद ही नव्हता. त्यांनंतर हाचं विषय इतका दूर भरकटला गेला कदाचित अजूनही आहे. मग काही जणांना बॅन करा अशी मागणीही झाली. पण त्या वर्षासाठी वा महिन्यासाठी ती तत्पर होती.
सांगायचा मुद्दा इतकाच, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया उमटवण्यासाठी आपल्याला केवळ १ ते २ सेकंदांचा अवधी पुरेसा असतो. मग त्या विषयावर २४ किंवा १२ तासांसाठी राखलेल्या स्टेटस मधून आपल्या भावना वाटल्या जातात. हल्ली भावना अश्रूंद्वारे वा रोष प्रकट करून नाहीतर एकमेकाला टोमणे मारून किंवा निरनिराळ्या गाण्यांची मांदियाळी सप्रेम करून दाखवल्या जातात. ते स्टेटस, तास घटले की पुन्हा दुसऱ्या विचारांसाठी मन व्यापण्यास सज्ज!!
bad effects of social media in Marathi माणसांचा अभ्यास सध्या प्रसार माध्यमांतून चुकीच्या रित्या होत असल्या कारणाने कुठला तो शांतता दिन!
International day of living together in peace
![]() |
World Peace Day 2022 |
आता जर जागतिक दृष्टीने जर विचार केला तर ज्यांनी कोणी हा दिन साजरी करण्यास सुरुवात केली तो प्रत्येक देश सीमा वादात सामील आहे. यात अधिक म्हणजे तालिबानने व्यापलेले अफगाणिस्तान! आता ह्यात काही देश तालिबानच्या सपोर्ट मध्ये तर काही विरोधात. दोन गट इथंच पडतात, शांतता ती हिचं का ? हा प्रश्न मात्र पडतो.
युद्ध न व्हावे म्हणून उदयाला आलेला शांतता दिन, कुठल्या न कुठल्या पद्धतीने जसे की 'digitally' लढले जात आहे. भ्रमणध्वनी उचलला की त्यात त्वरित दिसणारी एखाद्या गोष्टीचे घोषवाक्य आपल्याला खेचते मग तिथून सुरूवात होते ती म्हणजे गूगलच्या 'recommendation engine' ला!!
जागतिक शांतता दिवस 2022 थीम / International peace day 2022 theme :
'वंशवादाचा अंत करून, शांतता निर्माण करणे'. 'End Racism, Build Peace'.
माहीत नाही पण आपल्या मनाशी खेळण्याचं काम हे अचूक करते. यावर उपाय म्हणजे भ्रमणध्वनीचा वापर कमी असा हाच केवळ नाही तर, जी कोणती गोष्ट आपण पुढे सारतोय तिचे पडसाद कुठवर येऊन पडतात ह्याचा विचार न करता. अशा कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी तपासून, योग्य की अयोग्य हा विचार करून देखील ती पुढे सामायिक करता येऊ शकते.
तुम्हाला सर्वांना जागतिक शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! happy international peace day!
धन्यवाद 'जागतिक शांतता दिवस 2022 | International Day of Peace 2022 in Marathi ' वाचल्याबद्दल !!
लेख -: अनिकेत कुंदे