दहावी नंतर काय? १० वी नंतर पुढे काय करावे? What After 10th?
विद्यार्थी मित्रांनो,
दहावी नंतर काय? १० वी नंतर पुढे काय करावे? What After 10th? तुम्ही जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर आहेत, दहावीनंतर प्रथमच तुम्ही भावी करिअर निवडीसंबंधी निर्णय घेणार आहात.
तुम्ही आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि मग तुम्ही भविष्यात उत्तम यश संपादन कराल याची मला खात्री आहे. Make in india, skill india, start up india & stand up india या ध्येय पथावरआपला देश चालला आहे. हा ध्येय पथ तुम्हाला आत्मनिर्भर, जबाबदार व स्वाभिमानी नागरिक बनण्यास मदत करेन.
दहावीचे / बारावीचे पेपर झाल्यानंतर, सर्वात महत्वाचे प्रश्न मनी येतात ते म्हणजे, 'आता पुढे काय?', What After 10th?, what do choose after 10th/ssc/cbse? दहावीनंतरचे करिअर / 12 वी नंतरचे कोर्स
दहावी आणि बारावी जीवनाला करियर च्या दिशेने वळतानाचे महत्वाचे टप्पे! त्यात दहावी हा पहिला टप्पा. म्हणजे जर इथे योग्य ते क्षेत्र निवडले म्हणजे पुढे सोयीस्कर होत जाते.
दहावी झाल्यावर सहज उपलब्ध असणारे काही महत्वाचे क्षेत्र म्हणजे -:
१. विज्ञान शाखा Science branch
२. कला शाखा Arts branch
३. वाणिज्य शाखा Commerce Branch
४. आयटीआय ITI
५. डिप्लोमा Diploma
१. विज्ञान शाखा Science branch
वैद्यकीय विज्ञान Medical Science, अभियांत्रिकी Engineering ला प्रवेश घेण्यासाठी दहावीनंतर विज्ञान शाखा निवडणे गरजेचं असते. इतरही काही courses तुम्ही विज्ञान शाखेनंतर निवडू शकता. त्यांपैकी काही
a. वैद्यकीय विज्ञान
b. अभियांत्रिकी
c. फार्मसी pharmacy
d. बायो टेक्नॉलॉजी Bio Technology
e. बायो सायन्स Bio Science
f. एव्हीएशन Aviation Technology
g. फूड टेक्नॉलॉजी
इ. विषयांकडे वळता येते.
12 वी Science नंतर काय करावे ?
a. वैद्यकीय विज्ञान -:
आता वैद्यकीय विज्ञान अथवा डॉक्टर, नर्सिंग अथवा इतर त्या संबंधित कोर्सेस साठी केवळ PCB (फिजिक्स physics, केमिस्ट्री chemistry, बायोलॉजी Biology) गट असणे गरजेचे आहे.
अवधी -: चार वर्षे / पाच वर्षे
मिळणारी पदवी / Degree -:
- BHMS -: Bachelor of Homeopathy Medicine and Surgery
- MBBS -: Bachelor of Medicine, Bachelor of Surgery
- BAMS -: Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery
- BUMS -: Bachelor of Unani Medicine and Surgery
- BNYS -: Bachelor of Yoga and Naturopathy Sciences
- B.Sc Nursing
b. अभियांत्रिकी -:
तर अभियांत्रिकी engineering च्या प्रवेशासाठी बारावीला केवळ PCM (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित mathematics ) ह्यांचा गट असणे आवश्यक असते. how to become a software engineer after 12th / how to become a software engineer after 10th
अवधी -: चार वर्षे
मिळणारी पदवी /डिग्री -:
- B.E -: Bachelor of Engineering
- B.Tech -: Bachelor of Technology
ट्रेंड्स / Trends
-:
- मेकॅनिकल इंजिनीरिंग ( Mechanical Engineering)
- कॉम्पुटर इंजिनीरिंग (Computer Engineering)
- सिव्हिल इंजिनीरिंग ( Civil Engineering)
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलकमुनिकेशन इंजिनीरिंग (Electronics and Telecommunication Engineering)
- आयटी इंजिनीरिंग (Information Technology Engineering)
- इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग (Electrical Engineering)
- प्लास्टिक इंजिनीरिंग (Plastic Engineering)
- टेक्सटाईल इंजिनीरिंग (Textile Engineering)
- ऑटोमोबाईल इंजिनीरिंग (Automobile Engineering)
- इन्स्ट्रुमेंटेंशन इंजिनीरिंग (Instrumentation Engineering)
- केमिकल इंजिनीरिंग (Chemaical Engineering)
इ.
बीई किंवा बीटेक हे सर्वस्वी तुम्ही कुठल्या कॉलेजला किंवा विद्यापीठामध्ये असणार त्यावर अवलंबून आहे.
c. आणि फार्मसी, बायो टेक्नॉलॉजी किंवा बायो सायन्स -:
अश्या कोर्सेस च्या निवडीसाठी तुम्ही बारावीला फिजिक्स physics, केमिस्ट्री chemistry, बायोलॉजी Biology आणि गणित mathematics हे विषय असणे आवश्यक आहे.
अवधी -: तीन -चार- पाच वर्षे ( कोर्सेस वर अवलंबून)
मिळणारी पदवी/Degree -:
- B.Pharm
- D.Pharm
- B.Sc in Bio Technology
अनेक मार्ग उपलब्ध आहेत, सर्व जण करताय म्हणून आपणही केले पाहिजे ह्या हेतूने नेहमी बघितले गेले तर नोकरीची संधी कमी आणि स्पर्धा जास्त असे दिसून येते.
अभियांत्रिकी मध्येही Aeronautical इंजिनीरिंग सारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत जिथे इतर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांहुन प्रवेश कमी पण नोकरीच्या संधी अमाप आहेत.
२. कला शाखा Arts branch
११वी आणि १२वी कला शाखेची निवड केल्याने देखील अनेक मार्ग मिळतात.
अवधी -: ३ वर्षे
बी ए नंतर काय?
त्यांपैकी काही खालीलप्रमाणे
-:
A) B.A (Bachelor of Arts ) -:
ह्यामध्ये काही विषय/अभ्यासक्रम
- B. A in languages कुठल्याही भाषेसाठी B.A) करू शकता.
- B.A in Psychology ( मानसशास्त्र)
- B.A in History (इतिहास)
- B.A in Geography (भूगोल)
- B.A in Journalism (पत्रकारिता)
- B.A in Archeology (पुरातत्व शास्त्र)
- B.A in Sociology (समाजशास्त्र)
- B.A in Literature (साहित्य)
- B.A in Economics (अर्थशास्त्र)
इ. विषयांमधून एक निवड करू शकता. ह्याव्यतिरिक्त बरेचसे आहेत पण हे काही महत्वाचे!
B) B.F.A (Bachelor of Fine Arts) -:
ह्यामधील अभ्यासक्रम व विषय खालीलप्रमाणे -: Fine Arts, Visual Arts and Performing Arts ह्यात
- चित्रपट दिग्दर्शन ( Film Direction)
- चित्रपट सादरीकरण / बनविणे ( Film मेकिंग)
- नाटक क्षेत्रात संधी ( theatre)
- संगीत
- नृत्य
इ. क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होतात.
C) B.B.A ( Bachelor of Business Administration) -:
ह्या कोर्समधील अभ्यासक्रम खालीलप्रमाणे
- विपणन ( Marketing)
- विक्री ( Sales )
- वित्त (Finance)
इ. आहेत.
- B.B.A नंतर M.B.A ( Master in Business Administration) चा मार्ग मोकळा होतो. ह्यात तुम्हाला अनेक specialization कोर्सेस उपलब्ध होतात, जसे की -:
- M.B.A in Human Resources
- M.B.A in Marketing
- M.B.A in Finance
- M.B.A in Supply Chain
- M.B.A in Rural Management
- M.B.A in Business Analytics
अश्याप्रकारे कला शाखेत देखील अनेक संधी उपलब्ध आहेत.
३. वाणिज्य शाखा Commerce Branch
दहावीनंतर वाणिज्य शाखा का घ्यावी? ह्याचं उत्तर!
तुम्हाला वाणिज्य शाखेतील काही करिअर साठी मार्ग सविस्तर सांगत आहे. त्यापैकी जर कोणता मार्गाबद्दल अडचण किंवा माहिती हवी असल्यास आपण मला कंमेंट द्वारे विचारू शकता.
वाणिज्य विषय म्हणाल तर आर्थिक घडामोडी,खरेदी, विक्री, हिशोब, जमाखर्च, व्यवहार नोंदी आणि अंदाजपत्रक बनवणे याची आवड असली पाहिजे.
या मधील कलागुण जोपासून आपण उंच भरारी घेऊ शकतो.
वाणिज्य क्षेत्रातील करिअर
12 वी कॉमर्स नंतर काय करावे ?
वाणिज्य क्षेत्र हे कोणत्याही अर्थव्यवस्था चा पाया आहे.त्यामुळे पूर्वीपासून व्यापार, उद्योग धंदा, अर्थव्यवस्था या क्षेत्रात करिअर करण्याच्या हेतूने पाहिजे जाते.
एखाद्या व्यक्तीला व्यवसाय मध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी या क्षेत्रातील संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. व्यवसायासाठी आवश्यक आणि उपयुक्त असणारी तंत्रे या अभ्यासक्रमात शिकवले जातात.
आज वाणिज्य शाखेचा विस्तार महत्वाच्या सर्व क्षेत्रात पाहायला मिळतो. जसे की बँकिंग,विमा,वित्त, आरोग्य ,उद्योग, व्यवस्थापन, शेअरबाजार, कर सहकार इत्यादी. या क्षेत्रांचे नियोजन विविध स्तरावर करण्यासाठी वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
वाणिज्य क्षेत्रासाठी आवश्यक गुण
आकडे मोडीचे ज्ञान, कार्यालयीन कामाची आवड, नियोजन, नेतृत्व, समायोजन क्षमता, अचूकपणे आणि वेगाने काम करण्याचे कौशल्य, शिकण्याची आवड, संगणकाचे ज्ञान, कष्टाळू वृत्ती आणि लवचिकता, दूरदृष्टी व संभाषण कौशल्य!
काही अभ्यासक्रम
MSBVE यामध्ये प्रामुख्याने
- रिटेल ऑपरेशन असिस्टंट
- अकाउंट असिस्टंट
- रुलर मार्केटिंग असिस्टंट
- इव्हेंट मॅनेजर असिस्टंट
- इंडस्ट्रियल सेफटी मॅनेजमेंट training
- असिस्टंट लायब्रीअन
- मार्केटिंग
- सेल्समन शिप असिस्टंट
- बँकिंग असिस्टंट आणि टंकलेखन इत्यादि समावेश होतो.
ITI यामध्ये प्रामुख्याने
- फ्रंट ऑफिस असिस्टंट
- डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर
- ऑफिस कम कॉम्प्युटर ऑपरेटर
- स्टेनोग्राफ आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस यांचा समावेश होतो.
याचबरोबर तुम्ही उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच MSBVE & DVET याची पदविका करू शकता.
त्याचबरोबर अजून काही पदवी खालील प्रमाणे
- BCOM -: Bachelor of Commerce
- BFM -: Bachelor of Financial Markets
- BMS -: Bachelor of Management Studies
- B. Voc. -: Bachelor of Vocation
हॉटेल मॅनेजमेंट असो किंवा ट्रॅव्हल टुरिसम हे सर्व वाणिज्य शाखेत येतात.
याव्यतिरिक्त आपण CA, CS, CFA आणि CWA यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकता.
वाणिज्य शाखेतून नवोदित उद्योजक तसेच विविधांगी अनुभव याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो.
महत्वाचे टिप्स
आपण आपल्या ओळखीच्या वाणिज्य शाखेतील यशस्वी करिअर केलेल्या 2 -3 व्यक्तीला भेट द्या. त्यांचे अनुभव आणि मत ऐकून घ्या.
त्याचबरोबर हे काही कोर्स करताना अर्धवेळ नोकरी केली तर चांगले होईल. कारण त्याने आपला प्रत्यक्ष अनुभव वाढीस लागतो आणि स्वयंरोजगारच्या संधी वाढतात.
४ ) आयटीआय ( ITI - Industrial Training Institute Courses )
आयटीआय माहीती काही जणांचा समज आहे की ज्याला दहावीला कमी टक्के मिळाले तोच केवळ आयटीआयचा विचार करू शकतो. तर असे काहीही नाही, तर ज्याला वाटते त्याने एकदा cutoff बघावा. शिवाय दहावीनंतर बरेचजण हा मार्ग स्वीकारतात. केवळ दहावीनंतरचं नाहीतर बारावीनंतर देखील आयटीआय क्षेत्र निवडले जाऊ शकते. iti information in marathi
आय टी आय ट्रेंड खालीलप्रमाणे-:
- फिटर - Fitter Engineering
- मेकॅनिक - Mechanic Motor Vehicle Engineering
- वेल्डर Welder (Gas & Electric) Engineering
- प्लंबर Plumber Engineering
- इलेक्ट्रीशियन - Electrician Engineering
- कारपेंटर - Carpenter
- Hair & Skin Care
- Copa - Computer Operator and Programming Assistant
इ. अनेक ट्रेड विद्यालयानुसार उपलब्ध आहेत. सौंदर्याशी निगडित ट्रेड (आय टी आय कोर्स मुलींसाठी) देखील उपलब्ध आहेत विशेषतः मुली ह्यासाठी अर्ज करू शकतात.
५) Diploma डिप्लोमा (माहिती)
एक प्रश्न असा की कोणी विद्यार्थ्याला अकरावी आणि बारावी न देता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येऊ शकतो का ? Diploma Information in Marathi
तर होय, जर तो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाला असेल. डिप्लोमा हा एक उपाय आहे. डिप्लोमा साधारण तीन/३ वर्षांचा कोर्स आहे. ह्यामध्ये विविध अभ्यासक्रम असतात, त्यांपैकी काही खाली दिलेली आहेत.
- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग ( Diploma in Mechanical Engineering)
- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ( Diploma in Electrical Engineering)
- डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग ( Diploma in Civil Engineering)
- डिप्लोमा इन ईसी इंजीनियरिंग ( Diploma in Electronics Engineering)
- डिप्लोमा इन कॉम्पुटर इंजीनियरिंग (Diploma in Computer Engineering)
हे प्रत्येक कोर्सेस सहा सेमिस्टरचे असतात, तर एक सेमिस्टर सहामाही असतो.
आता पुन्हा प्रश्न असा की, डिप्लोमा नंतर इंजिनीरिंग ला ऍडमिशन कसे घ्यावे?
एकदा का तुम्हाला डिप्लोमाची पदवी मिळाली तुम्ही अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात तुम्ही प्रवेश होतो जर तुमच्याकडे डिप्लोमाची पदवी असेल तर! आणि जर तुमचा डिप्लोमा दरम्यान अभ्यासक्रम दुसरा होता अश्यात देखील इतर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो.
उदाहरणार्थ -: एका मुलाकडे डिप्लोमाची इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाची पदवी आहे तर तो कॉम्पुटर अभियांत्रिकी साठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ शकतो.
६) अजून जर आपल्याला
शिक्षण क्षेत्रात
आवड असेल तर आपण खालील कोर्स करू शकता. पण यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेतून १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
- D.T. Ed -: Diploma in Teacher Education
- BEd -: Bachelor of Education
- BPEd -: Bachelor of Physical Education
- MEd -: Master of Education
- MPhil -: Master of Philosophy
- Phd -: Doctor of Philosophy
- SET/NET
ज्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची आवड आहे त्यांनी UPSC, MPSC, IMPS, SSC या स्पर्धा परीक्षा देऊ शकता.
जर आपण संरक्षण क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आपण NCC सर्टिफिकेट घेऊन पोलीस, कोस्टगार्ड, बॉर्डर security फोर्स, खासगी Security, SRPH या ठिकाणी जाऊ शकता.
कुठलीही मदत हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये टाकावी. उत्तर नक्की दिले जाईल. तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या तर्फे मनापासून शुभेच्छा!! धन्यवाद !! दहावी नंतर काय? १० वी नंतर पुढे काय करावे? What After 10th? लेख - अनिकेत कुंदे
धन्यवाद माहितीबद्दल 👍
ReplyDeleteआम्ही मराठी
ReplyDelete१०वी नंतर काय करावे याबद्दल विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना फार मोठे प्रश्न असतात. त्याचे उत्तर तुम्ही या लेखामध्ये अतिशय योग्य आणि सोप्प्या मराठी भाषेमध्ये मांडले आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद...
ReplyDeletekhup chhan mahiti aahe.
ReplyDeletedhanyawad.
Marathi Motivation
nice information english marathi
ReplyDelete