कोंकण प्रवास वर्णन 2019 | Konkan Diaries 2019
कोंकण प्रवास वर्णन 2019 | Konkan Diaries 2019 कामात राम असलाच पाहिजे पण आरामही मिळावा ही क्षुल्लक इच्छा असते. म्हणून या उद्देशाने कुठेतरी ट्रिपला जाण्याचं पक्के झालं, मात्र कुठं जाणार हा प्रश्न होताचं!
त्या प्रश्नाचे देखील खुप वेळाने निवारण झालं, सर्वांच्या संमतीने मार्ग असा ठरला की लोणावळ्यापासून सुरुवात होईल. मग बिर्ला मंदिर मग काशीद बीच श्रीवर्धन मग हरिहरेश्वर ला मुक्काम आणि अखेरीस रायगडाला शिवरायांच्या पायी माथा टेकवुन पुन्हा माघारी!
अस म्हणतात "photos are temporary, Memories are permanent" अस काही तरी झालं आमच्या बाबतीत सुद्धा. हर एक दृश्य बघूनचं ते आत्मसात केले असे म्हणायला हरकत नसावी.
तर सुरुवात झाली पहाटेपासुन, नेहमीप्रमाणे सर्व सोबत असणारे हर एक, काय नवीन बघायला मिळणार ह्या आतुरतेने, मस्त पहाटेच्या स्मित वाऱ्याचा आनंद घेत निघालो, पहिलं ठिकाण होतं बिर्ला मंदिर हे !
आतमध्ये मोबाइल वा कॅमेरा काही एक घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. पण तिथल्या सर्व गोष्टी योग्य आणि सुंदर अशा मनात कैद करून घेतल्या. अगदीच सांगायचं झालं तर कोकणात प्रवेशचं त्या मंदिराद्वारे व्यवस्थित रित्या झाला.
सर्वजण पहिल्यांदाच बिर्ला मंदिर येथे आलेलो होतो. अतिशय सुंदर असं बांधकाम तसेंच त्या मंदिराच्या परिसर किती योग्यरीत्या राखुन ठेवलाय ते देखील बघावयास मिळाले.
गणपती बाप्पा, श्रीकृष्ण रखुमाई, दुर्गा माता सर्वांचे आशिर्वाद घेऊन निघालो पुढील प्रवासाकडे. पुढील ठिकाण होते, अलिबाग येथील काशीद बीच खरंतर समुद्राला भेटण्याची माझी पहिलीचं वेळ! अथांग सागर बघितला आणि त्याची दुरी, खोलपणा विचार करूनच धसका बसला। Alibaug Beach
असा दूर पसरलेला तो लाटांच्या कारणाने अधिकच विशाल जाणवत होता आणि कदाचित त्याचं कारणाने त्याचे रौद्र रूप दाखवत असेल. तिथे काही वेळ घालवून पुन्हा एकदा बीच वर वेळ आली होती घोडेस्वारीची, एकतर पहिल्यांदाच घोडेस्वारी करणार होतो, माझ्यासोबत अनेकांची तारांबळ तिथंच उडाली. Horse Riding at Alibaug Beach
पण घोडेस्वारीचा सर्वांनी खुप आनंद घेतला. त्यातुन हे देखील कळाले कि बीच वर घोड्याला फिरवण्यात मजाच काही और असते.
त्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाची वेळ, शीपमध्ये या किनाऱ्याहुन त्या किनाऱ्यावर जाण्याची वेळ तत्पुर्वी आम्ही काही दृश्य छायाचित्रांमध्ये कैद केले. तो किनाऱ्याहुन दुसऱ्या किनाऱ्यावरील तसा प्रवास देखील मजेदार होता. खुप वेळ प्रवासानंतर येऊन पोहोचलो ते थेट श्रीवर्धन बीचला जगाला प्रकाश देणाऱ्या त्याच्या हर दिनाच्या यशस्वी फेरी नंतर साक्षी व्हायला त्या सूर्य अस्ताचा!
Shrivadhan to Harihareshwar
अश्यावेळी सुर्यदेखील आपल्या किरणांनी पूर्णतः लालसर करतो सागराच्या हर एक लाटेला! त्या वेळी निसर्ग बघणं म्हणजे भाग्य च समजावे लागेल.
आजूबाजूला डोंगर विस्तारलेले त्यांत सागर आपली जागा करू पाहतोय तोच रवी त्यांवर निघण्याची किंवा पुन्हा आगमन करण्याची परवानगी मागतोय हा खेळ असाच चालू आहे वर्षोनुवर्षे !
Harihareshwar Beach / Harihareshwar Sunset
दिवस मावळल्यानंतर सूर्य अस्ताचा, चंद्रोदयाचा नजारा बघुन वेळ होती ती हरिहरेश्वर च्या वाटेची, मग निघालो हरिहरेश्वरला जाण्यास. संध्याकाळी 9 च्या सुमारास पोहोचलो हरिहरेश्वरला राहण्यास खोली बघण्यात फारशी कसरत करावी लागली. जेवण झाल्यावर झोपी गेलो आतुरता होती ती म्हणजे हरिहरेश्वर च्या कथित निसर्गाच्या सानिध्यात वावरण्याची!
सर्व जण गाढ झोपी गेले, सकाळी उठताच बीचवर जाण्याचा योग होता. अथांग सागराला डोंगरापलीकडुन डोकावणाऱ्या सूर्याची किरणे ज्यावेळी लाटांवर पडत होती ते दृश्य काही औरच होते. काही वेळानंतर लाटांसोबत दोन ते तीन डॉल्फिन देखील आमच्या सोबत आनंद लुटत असाव्यात.
Harihareshwar Temple | हरिहरेश्वराची ख्याती
विलोभनीय दृश्य याला साजेसा शब्द किंवा स्थळ म्हणजे हरिहरेश्वर घ्यायला हरकत नसावी. अखेर काही वेळ समुद्राच्या लाटांचा तिथे असणाऱ्या हर एक नैसर्गिक गोष्टींचा सुंदर देखावा बघितल्यानंतर आमचे पाय वळले ते काळभैरवाच्या मंदिराकडे दर्शन घेऊन हरिहरेश्वर सोडलं.
पुढील रायगड अनुभव / प्रवास इथे वाचा!!