उद्योजकांचा जन्म - रेणुका आराध्य | Entrepreneur born - Renuka Aradhya
नमस्कार मित्रांनो!
उद्योजकांचा जन्म - रेणुका आराध्य | Entrepreneur born - Renuka Aradhya | आज मी एक अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी ऐकून तुम्ही तुमची इच्छाशक्ती अधिक बळकट करून आपले ध्येय गाठण्यासाठी तीव्रतेने प्रयत्न कराल. मी अश्या व्यक्तीबद्दल सांगत आहे त्याचे बालपण अतिशय गरीबीत गेले. परंतु जिद्दीच्या आणि स्वप्नाच्या बळावर त्याने आज आपली एक प्रतिमा तयार झाली.
त्यांचा हा अद्भुत प्रवास आज आपण जाणून घेऊयात. who is renuka aradhya? in Marathi
अधिक वाचा : अझीम प्रेमजी मराठी माहिती | Azim Premji biography in Marathi
जन्म / Birth
रेणुका आराध्य Renuka Aradhya यांचा जन्म ऑगस्ट 1969 मध्ये बंगळुरू मध्ये गोपसेंद्र या गावी झाला. त्यांचे वडील राज्य सरकार द्वारा असलेल्या मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या कामात त्यांना घर भागवण्यासाठी पुरेसे पैसे भेटत नसत. मंदिरात पूजेचे काम झाल्यावर रेणुका आराध्य याना भोजन मागण्यासाठी गावात फिरावे लागत. the indian struggle story
अश्या परिस्थिती मध्ये वडिलांनी रेणुका ला सहावी नंतर नोकर म्हणून कामाला लावले. घरची परिस्थिती लक्षात घेऊन रेणुका यांनी भांडी घासणे, कपडे धुणे अश्या प्रकारचे घरकाम केले. त्याचबरोबर पुढे त्यांनी एक वयोवृद्ध आजारी व्यक्तीच्या घरी त्यांची सेवा करण्यासाठी काम केले.
तिथे त्यांना अंघोळ घालणे, मलम लावले, कपडे घालणे अशी कामे ते करीत असत.
हे कामे चालू असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली मग त्यांनी पूर्ण वेळ काम करण्यात घालवला. पुढे 10 वी च्या परीक्षा मध्ये अनुत्तीर्ण झाले.
मग त्यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आता फक्त काम करून घर चालवणे याकडे त्यांचा जोर राहिला.
मग रेणुका यांनी अड्स लॅबमध्ये lab साफसफाई करण्याचे काम केले. यात त्यांना परवडत नसल्याने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. पुढं त्यांनी अनेक ठिकाणी मजूर म्हणून काम केले.
काम करत असताना त्यांचा पाऊल चुकीच्या दिशेला पडले. त्यांना दारू पिणे यासारखे वाईट व्यसन लागल.
कसेबसे स्वतःला सावरून त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्न नंतर त्यांची परिस्थिती थोडी खालावली. मग त्यांच्या पत्नीला सुद्धा एक प्लास्टिक कंपनी मध्ये मजूर म्हणून काम करावे लागले.
रेणुका आराध्य आता एक श्यामसुंदर ट्रेडिंग कंपनीत कामाला होते. तिथं त्यांनी 12 तास सुरक्षा रक्षक security guard चे काम अवघ्या 600 रुपय साठी केलं.
नारळ तोडण्यासाठी माळी चे काम त्यांनी केले.
अधिक वाचा / Read More -: उद्योजकांचा जन्म - धीरूभाई अंबानी | Entrepreneur born - Dhirubhai Ambani
अधिक वाचा / Read More -: Inspiring Story of Jack Ma in Marathi | जॅक मा - Chinese business magnet’
उद्योजक सुरवात | Entrepreneur startup
renuka aradhya biography in marathi
आता ते बाहेरची कामे करून कंटाळून गेले होते. म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
म्हणतात ना दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे रेणुका आराध्य आणि चालू केलेल्या व्यवसाय मध्ये पूर्ण बुडून त्यांच्यावर कर्ज झाले.
आता बाकी बस्स! म्हणून त्यांनी कुठंतरी नोकरी करण्याचे ठरवले.
ड्राइवर म्हणून काम शोधले.आणि हाच त्यांच्या जीवनात ला turning पॉईंट ठरला.
ड्राइवर ची नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक होते ते गाडीचे licence.
लग्नात मिळालेली अंगठी विकून त्यांनी licence मिळवणे. आणि काम सुरू केले.
यातही नेहमीप्रमाणे त्यांना अडचण आली. त्यांच्या हातून एक अपघात झाला आणि त्यांना कामावरून काढून टाकले.
पण त्यांचे लायसन्स असल्याने त्यांनी डेड बॉडी ट्रान्सपोर्ट ला जॉईन झाले. लवकरच त्यांनी दुसरं काम शोधलं.
या कामात ते विदेशी पर्यटन साठी आलेल्या पर्यटकांना फिरवत. त्यांना या कामातून डॉलर च्या रुपात पैसे मिळत असे.
थोडा बायकोचा pf फंडातून रक्कम काढून त्यांनी 2001 मध्ये एक इंडिका गाडी खरेदी केली. आणि पुढे 2006 पर्यंत पाच आणखी गाड्या खरेदी केल्या.
या गाड्या खरेदी करून त्यांनी सिटी सफारी नावाने कंपनी स्थापन केली. new business ideas
यात त्याचा चांगलाच जम बसला आणि त्यांत आणखी एक बातमी त्यांच्या कानावर पडली की इंडियन सिटी टॅक्सी कंपनी विक्रीला आहे. मग त्यांनी आपल्या गाड्या विकून साडे सहा लाखात इंडियन सिटी टॅक्सी ही कंपनी खरेदी केली आणि तिचे नाव प्रवासी कॅबस private लिमिटेड असे ठेवले.
ही त्यांच्या आयुष्यात घेतलेला जोखमीचा निर्णय होता. याच निर्णयाने ने आज करोडपती च्या यादीत आले.
सण 2018 मध्ये त्यांनी आपल्या कंपनीला चेन्नई आणि हैदराबाद अश्या मोठ्या शहरात विस्तार पसरवला.
ओला आणि उबेर यासारख्या कंपन्या येऊनही रेणुका आराध्य यांच्या कंपनी ला इतका परिणाम झाला नाही.
मित्रानो कुणी विचारही नसेल केला की लहानपणी जो खाण्यासाठी तरसत होता आज त्याच्या वर्षाचा कमाई 50 करोड च्या जवळ आहे.
त्यांच्या कंपनीत आज 1300 हुन अधिक कॅबस असून कामगार आहेत.
आपणही अशीच परिस्थिती वर मात करून आपले जीवन सार्थक बनवावे अशी अपेक्षा!
उद्योजकांचा जन्म - रेणुका आराध्य | Entrepreneur born - Renuka Aradhya
रेणुका आराध्या यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता सतत नवीन संधीच्या शोधत राहण्यासाठी प्रेरित करतो.
ReplyDelete