How to stay positive during Corona period? in Marathi | कोरोना काळात सकारात्मक कसे राहावे?
कोरोना काळात सकारात्मक कसे राहावे? | How to stay positive during Corona period? in Marathi | सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना सर्वप्रथम सण 1930 मध्ये आढळला गेला होता. संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणू (आयबीव्ही) पाळीव कोंबडी मध्ये दिसून आला.
1940 साली माऊस हेपेटायटिस व्हायरस (एमएचव्ही) आढळून आला.
1960 साली सर्वप्रथम मानवी जिवामध्ये हा कोरोना वायरस दिसून आला.
2019 मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपली मान वर काढली.
कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप येणे, थकवा जाणवणे आणि घशात कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना होतात, अनुनासिक रक्तसंचय, नाक वाहू लागते, घसा खवखवणे किंवा अतिसार ची लागण होणे. ही लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात आणि नंतर हळूहळू वाढत जातात.
काही लोकांना संसर्ग झाला असला तरी पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागते. काही लोक (सुमारे ८०% किंबहुना त्याहून अधिक ) हवे ते विशेष उपचार न घेता देखील या आजारातून बरे झाल्याचे दिसून आले आहे.
कोरोना होणाऱ्या व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वयवृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी आजारावर घरीच इलाज ना करता सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून त्यांना होणारा त्रास फार होणार नाही. सकारात्मक विचार मराठी लेख
कोरोनामुळे मानवी जीवनात झालेला परिणाम The effect of corona on human life -:
कोरोनाने मानवी जीवनात आमूलाग्र चांगले आणि वाईट असे दोन्ही बदल घडवून आणले. बऱ्यापैकी परिणाम हे मानवी जीवनात घातक तर ठरलेत. कोरोनात बऱ्याच जणांनी आपली जवळची माणसे गमावली.
तसेच काही प्रमाणात मानवी जीवनातील गरज काय आहे? हेही दाखवून दिले. जगभरासह देशातही बरेच दिवस लॉकडाऊन करावे लागले होते. त्यामुळे बऱ्यापैकी सर्वांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली.
बऱ्याच कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले. त्यातील गोरगरिबांचे तर हाल खुपच झाले. लॉकडाउन मुले सर्व कंपन्या आणि कारखाने बंद होती त्यामुळे पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात प्राणी आणि पशु मुक्त संचार करत होते.
निसर्गाच्या झालेल्या हानीमध्ये काही काळ बदल झाला. भारतासारख्या देशात शालेय शिक्षण ऑनलाईन माध्यमातून होण्यास पूरक वातावरण निर्माण झाले.
कामगार मंडळींना बऱ्याच दिवस घरात गुपचूप राहण्याची संधी मिळाली. तर काही प्रमाणात नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी एक वेगळाच वेळ भेटला. भारतासारख्या देशात जिथे शेअर बाजारात आतापर्यंत सट्टा म्हणून दुर्लक्ष केले जात होते, तिथे अचानकपणे इंटरनेट च्या सोयीमुळे शेअर बाजारात असलेली संधी बद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचली.
कोरोनाच्या काळाने सर्वांमध्ये एक भीतीने राहण्याची वेळ आणली. सर्व कामधंदा बंद असल्यामुळे बहुतांशी लोकांमध्ये एक निराशजनक वातावरण तयार झाले. ज्याचा परिणाम त्यांच्या भावी जीवनात आनंद कमी करेन. त्यासाठी त्यांना आव्हान आहे की, ही परिस्थिती जाईल अथवा राहील पण आपण हिम्मत हरवून चालणार नाही आपण तटस्थपणे संकटांना तोंड द्यावे.
सकारात्मक विचार करावेत! have think positive quotes!
कोरोनाचं काय तर जगातील कोणत्याही आजारातून तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बाहेर काढण्यासाठी लागतो तो सकारात्मक विचार!
विचारात प्रचंड ताकद आहे. आपण जसा विचार करता तसेच आपल्या सोबत घडत असते. सकारात्मक विचार आपले आयुष्यात आनंद आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला यशाकडे घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे आपल्या मनात नेहमी सकारात्मक भाव जपण्यासाठी प्रयत्न करत राहावं.
सकारात्मक विचार कसा करावा? How to think positive?
आपल्या जीवनातील सकारात्मक विचार हे जाणीवपूर्वक आणावे लागतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून योगा किंवा व्यायाम करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने आपले मन अगदीच प्रसन्न होते. तसेच आपल्या मनात एक स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होत जातो.
तसेच आपले मन काही कौशल्य आत्मसात करून घेण्यासाठी रमवावे जेणेकरून आपल्याला काही नवीन गोष्टींचा अनुभव तसेच दैनंदिन जीवनात बदल होईल.
पुस्तके वाचण्याचा छंद लावावा. जास्तीत जास्त ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पुस्तके वाचण्याचा एक छंद निर्माण करावा. कारण पुस्तकातून आपण प्रत्यक्ष अनुभव शिकत असतो.
मनाचा आणि शरीराचा एक मिलाप असतो त्यासाठी आपल्या मनावर संपूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत राहावं. जेणेकरून आपण भविष्यात स्वतःचे भविष्य उज्ज्वल करू तसेच सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करू.
घरच्यांसोबत वेळ मिळाला तेंच आपले आहोभाग्य! गेल्या काही वर्षे विचार करत असालच की कुटुंबासोबत वेळ मिळावा. पुन्हा एकदा एकत्र मिळून जेवायला बसणे आणि चर्चासत्र रंगणे हे म्हणजे काही औरंच! अश्या गोष्टींमध्ये वेळ खर्च झाला की वाटते वेळ योग्य मार्गी लागला.
कोणी सकारात्मक सोबती असला की मनात येणारे वायफळ नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे वाहू लागतात. कोरोना काळात सकारात्मक कसे राहावे? | How to stay positive during Corona period? in Marathi !
Good information Sir
ReplyDeleteClick here for Latest Technology News
Good information Sir
ReplyDeleteClick here for Latest Technology News