पी व्ही सिंधू मराठी माहिती | PV Sindhu Awards, Education, Biography in Marathi
पी व्ही सिंधू मराठी माहिती | PV Sindhu Awards, Education, Biography in Marathi | भारत देशातील स्त्रिया या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा मागे नाही हे आपण सर्वांना माहितीच आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतात त्याबरोबर प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपली अलौकिक कामगिरी दाखवून भारताचे नाव गाजवणार्या या स्त्रिया आज खेळामध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवत आहेत. पी व्ही सिंधू मराठी माहिती | PV Sindhu Awards, Education, Biography in Marathi
भारताची सुवर्णकन्या आणि बॅडमिंटन खेळाची क्वीन म्हणून ओळखली जाणारी खेळाडू म्हणजे पी व्ही सिंधू होय. बॅडमिंटन खेळामध्ये आपली उत्कृष्ट असे कामगिरी करुन दिवसेंदिवस आपल्या देशाचे नाव उंच करणारी पी व्ही सिंधू ही खरोखरच भारत देशाचा सन्मान वाढवण्यासाठी महत्वाची ठरत आहे.
Image Credits:TOI
पी व्ही सिंधू माहिती / p. v. sindhu information:
What is the real name of Sindhu? पुसारला वेंकट सिंधू pusarla venkata ramana ही जागतिक क्रमवारीत भारतीय महिला बॅडमिंटन पट्टू असून ऑलम्पिक मध्ये आपल्या भारत देशाला एकेरी बॅडमिंटन रोप्य पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला ठरली.
पी व्ही सिंधू यांची सुरुवातीपासूनच कामगिरीही कौतुकास्पद होती. सिंधूने 2016 मध्ये चायना ओपनचे विजेते पद देखील जिंकले होते. पी व्ही सिंधू यांची कामगिरी आणि आपल्या देशाचा सन्मान वाढवण्याची आंतरराष्ट्रीय ख्याती तेव्हा प्राप्त केली जेव्हा पी व्ही सिंधू या 17 वर्षाच्या होत्या. 2012 मध्ये पी व्ही सिंधू यांनी जगातील टॉप ट्वेंटी वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग मिळवली होती. जगाच्या टॉप 20 मध्ये येणारी पहिली सर्वात कमी वयाची ठरली.
2013 मध्ये झालेल्या वर्ल्ड चंपियनशिप मध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू बनली होती. pv sindhu match
तिच्या अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणारी ती पहिली कमी वयाची खेळाडू होती.
पी व्ही सिंधू जन्म आणि बालपण :
पुर्सला वेंकटा सिंधू यांचा जन्म 5 जुलै 1995 रोजी एका तेलुगू परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पीव्ही रमण आणि आईचे नाव विजया असे आहे. पीव्ही सिंधू यांचे वडील एक माजी हॉलीबॉल पटू होते.
सिंधू यांचे वडील हॉलीबॉल पटू असताना देखील पी व्ही सिंधू यांना बॅडमिंट खेळांमध्ये रस होता. पी व्ही सिंधू यांनी बॅडमिंटन खेळांमध्ये मिळालेल्या यशाचे प्रेरणास्त्रोत ती 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुल्लेला गोपीचंद यांना मानते.
पी व्ही सिंधू यांना लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळाची आवड होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, कारण सिंधूने वयाच्या आठ वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती.
पी व्ही सिंधू यांनी बॅडमिंटनचे प्राथमिक प्रशिक्षण मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन खेळाची सर्व मूलभूत माहिती जाणून घेतली. त्यानंतर सिकंदराबाद मधील भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट मधून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे पी व्ही सिंधू यांनी पुल्लेला गोपीचंद अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. pv sindhu coach | 1st coach name in P.v Sindhu
पी व्ही सिंधू यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बॅडमिंटन खेळामध्ये जिंकण्याची जिद्द आणि चिकाटी होते आणि या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे त्यानी आज पर्यंत स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.
पी व्हि सिंधु यांचे करियर:
पी व्ही सिंधू यांनी आपले करियर बॅडमिंटन खेळामध्ये केले आहे, व बॅडमिंटन खेळातून त्यांनी स्वतःच्या नावासोबत देशाचे नाव देखील उंचावले आहे.
पी व्ही सिंधू या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या महिला खेळाडू आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पी व्ही सिंधू यांनी 2009 मध्ये कोलंबो मध्ये सबजूनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये रजत पदक जिंकले होते. त्यानंतर 2010 मध्ये इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चालेंज मध्ये पी व्ही सिंधू यांनी एका गटाला रौप्य पदक मिळवून दिले.
रिओ ऑलिम्पिक 2016 :
2016 मध्ये पी व्ही सिंधू यांनी रिओ ऑलम्पिक मध्ये महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानी खेळाडू नोझोमी ओकुहारला पराभूत करून अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकून अंतिम फेरी गाठली. Rio Olympics India Badminton Medal
टोकीयो ऑलिम्पिक 2021 :
भारताची स्टार बॅडमिंटनपटू खेळाडू समजल्या जाणाऱ्या पी व्ही सिंधू यांनी टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला ब्राँझ मेडल जिंकुन देऊन भारताचा सन्मान आणखी वाढविला. india badminton olympics
पी व्ही सिंधू यांना मिळालेले पुरस्कार / p. v. sindhu awards:
पी व्ही सिंधू यांनी बॅडमिंटन खेळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पी व्ही सिंधू यांना मिळालेले काही पुरस्कार पुढीलप्रमाणे;
1. अर्जुन पुरस्कार- 2013
2. पद्मश्री पुरस्कार -2015
3. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - 2016
4. पद्मभूषण पुरस्कार - 2020
तुमचं यश तुमच्या कष्टांवर तसेच सतत च्या प्रयत्नांवर अवलंबून असते. त्यातून फळ प्राप्त होत असते, त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पी व्ही सिंधू!
तर मित्रांनो! "पी व्ही सिंधू माहिती" वाचून आपणास आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
धन्यवाद पी व्ही सिंधू मराठी माहिती | PV Sindhu Awards, Education, Biography in Marathi वाचल्याबद्दल!