वर्षा ऋतू निबंध| पावसाळा निबंध | Essay on rainy season in marathi
सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
वर्षा ऋतू निबंध| पावसाळा निबंध | Essay on rainy season in marathi | माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध लहानपणी हे गाणं गुणगुणले तरी पावसाच्या सरी या नाजुक हातांवर, आभाळाकडे ते इवलेसे डोळे मिटुन बघत असलेल्या चेहऱ्यावर वाऱ्याची झुळुक जशी तशा काहीशा अलवार स्पर्श करायच्या.
पावसाळा निबंध मराठी | सुट्टी त्यावेळी वाटणारी क्षुल्लक अपेक्षा या पावसाकडे असायची. भरगच्च डबक्यांना तुडवत रस्त्याची सुरुवात आणि सांगता व्हायची. त्याची तिखट किंमत नंतर आईच्या फटक्यांनी मोजलीचं जात होती. ते भिजणे देखील त्या माराच्या योग्य होतं. वर्षा ऋतू मराठी माहिती
|
Rain |
पण सरत्या वर्षांसारखे या मनी वसणाऱ्या कविता, गाणे यांचा विसर होत जातो आणि ते वय देखील नसते की त्या गाण्यांना पुन्हा एकदा अनुभवू शकू. पण सध्या लेखांमध्ये गुंतलेला मी, कसंतरी ते पान शब्दांद्वारे विरळ रेखाटण्याचा दुर्मिळ प्रयत्न करत असतो. पर्वणी असते ती पावसाच्या टपोऱ्या थेंबांना, त्यांनीही स्वतःला माझ्या वर्णनास सिद्ध करावं ह्या साठीची, त्यांची मात्र नितांत धावपळ आणि स्पर्धा देखील होते. पावसाळा निबंध in marathi
व्यस्त, चिंतेत लिन असलेल्या आसमंतात चित्कार टोह माजला होता, संदर्भात देखील अंतच, इवल्याशा स्पष्टीकरणात कुणा सबंध काळोखाच्या रुपास परिचित मी, त्यास कवटाळून मिठी मारण्या तत्पर होतो.
त्या नभांनी व्यापलेल्या आभाळात केवळ ते दोन,चार नाही तर नजर अपुरी, क्षितिज नजरेहुन अर्धे भासेल असा प्रचंड सर्वदूर पसरलेला पक्षांचा थवा आर्त किंचाळी देत होता. नभांच्या त्या गर्जना करणाऱ्या, एकमेकांवर आदळून ह्रदयात धडकी भरेल अशी ध्वनी निर्मिती करणाऱ्या त्या असह्य आभाळा सोबत स्पर्धा करण्यास तो थवा उत्सुक होताचं. वर्षा ऋतू | पावसाळा निबंध | Essay on rainy season in marathi
|
Bird |
मी मात्र घराच्या खिडकीतुन हे दृश्य लेखणीच्या साहाय्याने वर्षाऋतूच्या( माझा आवडता ऋतू ) आगमनाची दोन थेंब पानावर टिपत होतो. अखेर आभाळात तीव्र गडगडाट झाला, काळोखात प्रकाशाचं प्रमाण ती वीज देत होती.
मी तूर्तास तरी त्या भयावह वातावरणात सामोरे होऊन न जाणे पसंत केले होते. सर्वत्र माजलेला गदारोळ अचानक स्तब्ध होण्याकडे वळत होता, नि वातावरण अगदी शांत झाले. हाच तो क्षण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट बघावी, मागील चार महिने त्या अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यात कसे बसे दडून बसण्यात खर्च झाले.
मेघ गर्जना यावेळी थांबली होती, शीत वाऱ्याची झुळुक खिडकीत बसलेल्या माझ्या कानाशी येऊन थांबत होती. ती पावसाची चाहुल लागली नि तडक लिखाणाची तूर्तास सांगता करून लेखणी जोरात आदळली आणि धावत सुटलो. अंगणाच्या दिशेने! घरी कोणी येणार यासारखी बसलो वाट बघत त्याची! अंगणा नजीकच्या पिंपळाच्या झाडावर विसाव्यास आलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट जरा काही वेळ थांबला होता.
त्याही या निसर्गाच्या सौन्दर्याचं वर्णन करू पाहत असतील, पण निशब्द त्या!!!
वाऱ्याची झुळुक स्वर निर्मितीचे धडे गिरवत होती, अथांग वारा मी स्वतःमध्ये सामावुन घेत होतो. डोळे बंद करून, पूरक रेचकाचा हा प्रयत्न मी, पुरता यशस्वी केला होता. दुर वर नदीच्या दिशेने बघता वरून राजाचे आगमन झाले होते, मयूराच्या त्या बेभान नृत्याची साक्षात इंद्रदेव प्रशंसा करत होते. तप्त, वर्षभर उष्णतेमुळे भेगाळलेल्या वसुंधरेने निःश्वास सोडला, तोच सुगंध सर्वत्र दरवळू लागला होता.
मी हात पसरवले, डोळे मिटले, मस्तक आभाळाच्या दिशेने करून श्वासासोबत ही दरवळ आत घेत होतो, मनात असणाऱ्या कित्येक विचारांना आराम देण्याचं काम ही करत होती.
पावसाळ्यातील निसर्ग रूप निबंध | Essay on the nature of the rainy season
खुप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर यंदाच्या पावसाचा पहिला थेंब मस्तकी विसावला. मोह भिजण्याचा होत होताच पण त्यासोबत अनियंत्रित ताल न पकडणे म्हणजे नवलंच! पुर्ण भिजलो होतो, त्या मन समाधानी करणाऱ्या अगणित पाण्याच्या थेंबांमुळे, शरीरातील तहान भागवण्यासाठी जसे पाणी भूमिका बजावते अगदी तसंच पण मनाच्या थकव्या पासुन दूर कुठे नेऊन ठेवणारं पावसाच्या पाण्याची गोडी निर्विवाद अविस्मरणीय!!
घराच्या कौलांतून पाण्याचे ओघळ थेट जमिनीशी संवाद साधुन अवघ्या काही क्षणांत विलीन व्हायचे. धो धो बरसल्यावर नदीच्या प्रवाहाने आत्मसात केलेला वेग दिसून येत होता. सरीवर सर जिव मुठीत असल्याप्रमाणे जमिनीवर कोसळणास धडपड करत होती. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
पाऊस आता जरा विराम अवस्थेत जाण्यास उत्सुक होता, सूर्य अस्ताची वेळ ती, संपुर्ण लालसर आभाळ भासत होते. मी मात्र डोळे विस्फारून ते चित्र बघत होतो. इंद्रधनुष्य सप्तरंगांनी त्या आस्मानाची शोभा वाढवत होते. पक्षांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला होता.
|
Cows |
डोळे दिपवून टाकणारा तो प्रसंग, पक्षांच्या संगतीने गुरं पण पावसानंतरच्या ह्या वातावरणात रमली होती. या पहिल्या पावसाच्या अनुभवाने मनातल्या विचारांना बांध घालुन होतो, आता फक्त गरज होती ती बांध काढण्याची आणि शब्द साहित्य त्या कोऱ्या कागदावर मांडण्याची!! पावसाळा या विषयावर निबंध
केवळ मी, पक्ष्यांचे थवे, गुरांचे कळप आम्हीचं नव्हतो या अपेक्षित आगमनाचे जल्लोषात स्वागत करणारे, आमच्याहून अधिक तो शेतकरी राजा विसावला असेल. आणि काहींच दिवसानंतर या सततच्या रिपरिपीने झाडांना मोहर फुटायला लागला होता. जागोजागी असलेल्या मैदानांची जागा आता वेलींनी तसेच छोट्या झुडुपांनी बळकवायला सुरुवात झाली होती. माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध
|
Lightning |
थंड आणि ओल्या वातावरणाची प्रचिती देणारा हा ऋतू सर्वांना भावतो पण धिम्या गतीने सुरुवात झालेला वरुण मोसमाच्या मध्यावर रौद्र रूप धारण करतो आणि विविध ठिकाणी पुर महापूर जन्य परिस्थिती निर्माण करतो, ही त्याची कडवट बाजू देखील या मोसमाची अनुभवायला मिळते आणि नकोशी ही वाटते.
धन्यवाद "वर्षा ऋतू निबंध| पावसाळा निबंध | Essay on rainy season in marathi| माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध" वाचल्याबद्दल!!