हिरोजी इंदुलकर कोण होते? । रायगड बांधणीचा इतिहास काय आहे? जाणून घ्या!

हिरोजी इंदुलकर कोण होते? । रायगड बांधणीचा इतिहास काय आहे? जाणून घ्या!

हिरोजी इंदुलकर कोण होते? । रायगड बांधणीचा इतिहास काय आहे? जाणून घ्या!श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यावरचा मानाचा मुकुट! महाराजांचं नाव ऐकले तरी महाराष्ट्रातील हर एकाला प्रेरणा मिळते. केवळ मराठी माणूस नाही तर इतिहासात डोकावणारा प्रत्येक जण जेव्हा 17व्या शतकाचे पान उघडतो. तोही त्याचं भावनांनी आणि प्रेरणेने मनात आणि हृदयात छत्रपती नाव कोरून घेतो.


दोन वर्षांपूर्वी स्वतः महाराजांनी आमच्या, रायगडाच्या भेटीचा योग घडवून आणला होता. वेळ ती रायगडाची, राजांच्या दर्शनाची, समाधी पुढं माथा टेकवुन पुन्हा एकदा त्रिवार मुजरा करण्याची!
              
गड सर करत असतांना चांगलीच कसरत झाली, पायी चढण्याचा निर्णय अंगाशी येतो का काय? असंच वाटत होते. सूर्यदेव जरा परीक्षा घेण्याच्या मूड मध्ये होते जणू, पण वेळोवेळी दही, ताक मिळत होते त्याने थकव्याचे रूपांतर कदाचित उत्साहात केले असावे.

अखेर एक, दोन तासांत कसेबसे पोहोचलो पण जसं काही अचानक अशी ऊर्जा मिळावी, गडावर पाऊले पडली आणि उत्साह द्विगुणीत झाला.
        
हत्ती तलावाची अवाढव्यता बघून पुढे निघालो, राजदरबारात प्रवेश केला आणि राजांचे तेज त्या भास्कराहून अधिक भासत होते. दरबारातील एक ख्याती आहे की कोणत्याही कोपऱ्यात काहीही आवाज झाला तरी सिंहासनाधीश्वर महाराजांना ऐकू येत होते.

राजांचा महाल, बालेकिल्ला, राणीवसा बघितल्यानंतर पुढेच धान्याचं कोठारही बघितलं. पुन्हा वेळ होती, ती राजांच्या समाधीकडे जाण्याची पण त्या आधी विचार आला तळपत्या सूर्याला बघुन की हा देखील उगवताना महाराजांचे दर्शन आणि मावळतांना निरोप घेत असेल. 
           
शिवकालीन बाजारपेठ दूरपर्यंत पसरलेली ती बाजारपेठ बघुन आम्हाला देखील आश्चर्य वाटले. बहुतेक सर्व कारभार महाराजांच्या साक्षीने व्हावा, असा या मागचा उद्देश असावा कारण किल्ल्याच्या खूप जवळ आहे बाजारपेठ! त्याचं मार्गाने पुढें गेलो नि टकमक टोक दिसलं.

आता पर्यंत तर फक्त ऐकलं होतं, वाटलं की मरणं देखील किती भयावह असू शकतं. अनेक किंकाळ्या या रायगडाला असह्य असाव्यात. पुन्हा निघालो ते थेट जगदीश्वराच्या दर्शनाला ।।
    
तिथलं दर्शन घेतलं अन पुढे आलो ते महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला. समाधीपुढं माथा टेकवला आणि हळवे ना होणे म्हणजे आश्चर्यच!

chhatrapati shivaji maharaj empire
महाराष्ट्राचं आराध्य विश्रांती करतंय तिथं गेल्या 350 वर्षांपासून ! पण आजही मनात आणि  हृदयात आणिकही जिवंत आहेत.  समाधीचे दर्शन घेऊन गड उतार होण्याची वेळ होती. ती वेळही फार कमालच होती, तशी संध्याकाळी ८ ची, पूर्ण असा काळोखच पसरलेला इतरत्र पण तेव्हाचा अनुभव काही औरच होता.
     
पण मनात काही गोष्टींनी मात्र थैमान घातले होते, की महाराजांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकावुन बघतो तेव्हा मला इतका उत्साह जाणवतोय, उत्तेजित झाल्यासारखे जाणवतेय मग 350 वर्षांपूर्वी राजांचं प्रत्यक्ष अस्तित्व होते तेव्हा मावळे किती उत्साहाने जोमाने लढाईस तत्पर होतं असतील, राजांच्या प्रत्येक इच्छेस आपलं सर्वस्व मानत असतील. कुठल्या प्रेरणेने ते कार्य पूर्णत्वास नेतात. 

     
नि तडक आज भेट दिलेल्या रायगड  किल्ल्याची,  मराठ्यांच्या जिवंत आणि ज्वलंत इतिहासाच्या राजधानीची  निर्मिती करणाऱ्या वास्तूरचनाकार  हिरोजी इंदुलकर hiroji indulkar history in marathi यांची स्वामीनिष्ठा डोळ्यांसमोर  आली. त्यांचे नाव जरी आले तर ती घटना सर्वांनाच याद येते, रायगडाची बांधणी करण्याची महाराजांनी जबाबदारी हिरोजींवर सोपवली होती आणि महाराज स्वारीवर निघाले.

       
किल्ला जेमतेम बांधलाच जातो की पैशांचा अभाव भासु लागला, हिरोजींनी ही गोष्ट कोणापुढेही न मांडता आपला राहता वाडा, जमीन विकुन पैश्यांची कमतरता भरून काढली आणि गडावर कुटुंबासह झोपडीत राहू लागले.

chhatrapati shivaji maharaj coronation


राज्यभिषेकाच्या वेळी वाऱ्यासोबत स्पर्धा करणारा रायगड इंद्राच्या  स्वर्गापेक्षा अन स्वप्ननगरीहून काही कमी भासत नव्हता मात्र राजांना हिरोजी बद्दलची गोष्ट कळाली होती. 


त्यांना बोलवल्यानंतर महाराजांनी हिरोजींचे तोंडभरून कौतुक केले, 'अशी अद्वितीय वास्तू तुम्ही बांधली, अगदी मनासारखी किंबहूना त्याहुन अधिक सुंदर रचना या रायगडाची तुम्ही केली आहे,  मागा काय हवं ते हिरोजी? आज तुम्ही म्हणाल ते देऊ करू आम्ही' raigad fort information in marathi | raigad fort hiroji indulkar
   
हिरोजी नम्रपणे मान झुकवत म्हणाले, 'महाराज मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज ना जाणे अजून कोण यांचे जुलुम सहन करून रयत त्रासली होती. त्यात तुम्ही आम्हाला आशेचा किरण दाखवला, स्वराज्य रयतेचे राज्य स्थापन केलं, अजुन आम्हाला काय हवे राजे, तुम्ही छत्रपती होणं म्हणजेच आमचं भाग्य आणि बक्षीस या बांधकामासाठी'. 

'नाही हिरोजी तुम्ही काही तरी मागितलेच पाहिजे' राजांच्या विचारण्याला डावलता न येणारे म्हणुन हिरोजी म्हणाले 'एक विनंती आहे महाराज, या रायगडाच्या सामोरे जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे,  त्याच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी.' chhatrapati shivaji maharaj aani hiroji indulkar inspirational story

'अहो हिरोजी तुम्ही या अगणिक सौन्दर्य असलेल्या या वास्तूसाठी ना वतनदारी मागितली,  ना पाटीलकी, ना जमीनदारी, मागितलं तर  दगडावर नाव कोरण्याची परवानगी, का?' महाराजांनी विचारणा केली.
  
'राजे जेव्हा कधी तुम्ही रायगडावर असाल, जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल, पायरी चढताना त्यातल्या एक पायरीवर माझे नाव असेल, तेव्हा तुमच्या पदस्पर्शाने, पायधुळीने सतत माझ्या मस्तकावर अभिषेक होत राहील.'
    
स्वामीनिष्ठ असावे तर असे जीवाचं दान देखील देणारे मावळे होते, ते शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी!

 स्वामिनिष्ठा  म्हणजेच स्वामी विषयी असलेला एकांत आदर आणि प्रेम!
                                               
             !!!!! सेवेचे ठायी तत्पर !!!!! 
               हिरोजी इंदुलकर (Hiroji Indulkar)

 

 हिरोजी इंदुलकर कोण होते? । रायगड बांधणीचा इतिहास काय आहे? जाणून घ्या!

Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

4 Comments

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

  1. अप्रतिम....लेख.

    ReplyDelete
  2. मला रायगडाच्या बांधकामाबद्दल माहिती हवी आहे
    ति कुठून मिळणार? कृपया सुचवावे

    ReplyDelete
Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator