हे 10 प्रेरणादायी मराठी पुस्तके नक्की वाचा | 10 Best motivational books to read in Marathi
हे 10 प्रेरणादायी मराठी पुस्तके नक्की वाचा | 10 motivational books read in Marathi मित्रांनो! प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कुठली नको ती गोष्ट असते हे त्या त्या गोष्टीतून एखाद्या व्यक्तीला प्रेरणा मिळत असते. आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचे असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायचे असेल तर आपल्याला ही गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक प्रेरणा असणे गरजेचे आहे.
हे दहा प्रेरणादायी पुस्तके नक्की वाचा | 10 motivational books read in Marathi | inspirational books in marathi | motivational books in marathi
जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि आपल्या आयुष्याला नवीन चालना द्यायची असेल तर पुस्तके खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आम्ही 10 प्रेरणादायी पुस्तकांची यादी घेऊन आलो ते पुस्तके वाचलास नक्की तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रकाश पडण्यासाठी आणि तुमच्या जीवनाला प्रेरणा मिळण्यासाठी फायदेशीर ठरेल.
1. अग्निपंख:
लेखक - डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले अग्निपंख हे पुस्तक वाचल्यास तुमच्या जीवनाला प्रेरणा मिळण्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. अग्निपंख पुस्तक
अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवासप्रवास हा नक्कीच प्रेरणादायी ठरतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यास त्याला अग्निपंख देऊन त्याचा गौरव करतात. यामागचे उद्दिष्ट म्हणजे अग्निपंख पुस्तका मधील ज्ञानाचा विद्यार्थ्यांवर देखील प्रभाव पडावा.
अग्निपंख या पुस्तकामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन प्रवास आहे त्यांचे बालपण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले महान कार्य आणि राष्ट्रपती होण्यापर्यंतचा सर्व प्रवास व त्यासाठी त्यांनी केलेली खडतर प्रयत्न.
अग्निपंख हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या जीवनाला नवीन प्रेरणा मिळू शकते.
2. श्यामची आई:
लेखक -साने गुरुजी
श्यामची आई या पुस्तकामध्ये साने गुरुजी यांनी आईचे महत्व आणि आपल्या आई बरोबर घालवलेल्या आठवणींचे वर्णन गोड आहे अशा शब्दांत मांडलेले आहे.
श्यामची आई आहे हे देखील पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या जीवनाला टाइमिंग प्रेरणा मिळून आईचे महत्व समजण्यास मदत होते.
3. माझी आत्मकथा:
लेखक -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपल्या भारत देशामध्ये अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले त्यातील एक म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर."
माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेषातील घटनांना जे.गो.संत कथेच्या स्वरूपामध्ये मांडले आहे.
हे पुस्तक वाचत असताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलत आहेत असा भास होतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र सुद्धा आपल्या जीवनासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते.
4. मन मे है विश्वास:
लेखक -विश्वास नांगरे पाटील.
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे विचार तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरलेले आहेत.
मन मे है विश्वास या पुस्तकाच्या माध्यमातून विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे विचार आणि आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा सर्व जीवन प्रवास मांडला आहे.
त्यामुळे मन मे है विश्वास हे विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेले पुस्तक तरुण पिढीसाठी एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी होऊ शकते.
5. प्रकाश वाटा:
लेखक- डॉक्टर प्रकाश आमटे.
कुष्ठरोग्यांची सेवा करणारे प्रकाश आमटे यांनी लिहिलेले प्रकाशवाटा हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरू शकते कारण या पुस्तकामध्ये त्यांनी आदिवासी लोकांच्या समस्यांनवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आदिवासी लोकांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कामटे कुटुंबाचा सेवाभाव, अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी केलेले प्रयत्न आणि प्रकाश आमटे यांचे उदार विचार आपल्याला देखील समाजासाठी काही तरी चांगले करण्याची प्रेरणा देतात.
वाचा : Marathi Status - Amchi
6. सकारात्मक विचारांचे सामर्थ्य:
लेखक- नाॅर्मन विन्सेंट पील.
जीवनामध्ये सकारात्मक विचारांना किती महत्त्वाचे स्थान आहे याचे वर्णन सकारात्मक विचारांचे सामर्थ्य या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. हे पुस्तक वाचल्यास आपल्याला सकारात्मक विचार करण्यासाठी मदत होते तसेच आपल्या जीवनामध्ये मनशांती आणि जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि नवीन प्रेरणा सुद्धा मिळते.
7. एक होता कार्व्हर:
लेखिका- वीणा गवाणकर
एक होता कार्व्हर हे पुस्तक वीणा गावणकर यांनी लिहिलेले असून जॉर्ज वॉशिंग्टन यांचा संपूर्ण जीवन प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. शरीर प्रकृती अशक्त असताना देखील जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या जेवणामध्ये यशाच्या पायऱ्या कशा चढल्या त्याचे वर्णन त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
व्यक्तीचे कर्तृत्व हे त्याच्या बाह्य सौंदर्यावर अवलंबून नसून त्याच्या गुणांमध्ये आणि बुद्धीमत्तेवर सिद्ध होते हे या पुस्तकातून मांडलेला सिद्धांत हेच म्हणता येईल. मुलांमध्ये चांगल्या गुणाचे बीज रुजवायचे असेल तर एक होता कार्व्हर हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते.
8. महानायक:
लेखक- विश्वास पाटील.
महानायक हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिले असून नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे संपूर्ण जीवन चरित्र या पुस्तकामध्ये मांडलेले आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस एक थोर देशभक्त होते त्यांनी देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी इतिहास जाणून घ्यायचा असेल तर महानायक कादंबरी आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.
9. यश तुमच्या मुठीत:
लेखक- ब्रायन ट्रेसी आणि सुरेंद्रण जे
कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त यश प्राप्त करण्यासाठी "यश तुमच्या मुठीत' हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरतात.
10. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
लेखक- सद्गुरु श्री वामनराव पै.
जीवन विद्या तत्त्वज्ञानामध्यील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे " तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या तत्वज्ञानानुसार आपले आयुष्य आपले विचार, उच्चार आणि आचार यांच्यामार्फत घडत असतात याचे वर्णन सद्गुरु श्री वामनराव पै यांनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकांमध्ये केलेले आहेत.
पुस्तक हे ज्ञानाचा केंद्रबिंदूही समजले जातात. त्यांच्यातून इतर लोकप्रिय, ज्ञानी, अनुभवी लोकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. त्या अनुभवातून आपण शिकले पाहिजे हेच कदाचित त्यांचं उद्दिष्ट असावं.
तर मित्रांनो! "हे 10 प्रेरणादायी मराठी पुस्तके नक्की वाचा | 10 Best motivational books to read in Marathi" हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
छान माहिती
ReplyDelete15 ऑगस्ट भाषण