अंतर्मुख आणि बहिर्मुख म्हणजे काय? Introvert and Extrovert in Marathi
Introvert and Extrovert in Marathi सामाजिक माध्यमांच्या bio मध्ये म्हणजेच तुमच्याविषयी काही लिहीणे अपेक्षित असते. मग त्यात काहीजण हॅशटॅग selenophile, हॅशटॅग(#) logophile, #extrovert #introvert असेही लिहितात. अर्थात मी पण logophile टाकलंय. त्याचा अर्थ होतो, शब्दांवर प्रेम करणारा किंवा शब्दांची नितांत आवड असणारा. Introvert and Extrovert in Marathi
पण अंतर्मुख आणि बहिर्मुख म्हणजे काय? who are introvert and extrovert? what's introvert and extrovert mean?
तर introvert म्हणजे अंतर्मुखी आणि extrovert म्हणजे बहिर्मुखी. हे एकाप्रकारे स्वभावचं म्हणता येतील. शाब्दिकरित्या जर बघितले तर जर समजायला अवघड आहे. ह्याचा सविस्तर विचार आपण करूया.
अंतर्मुखी असे लोक/ व्यक्ती की सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा थोडक्यात म्हणायचं झाले तर सार्वजनिक ठिकाणी हजर असायचं यांना वावडं.
मनमौजी एका सीमेपर्यंत आपण म्हणू शकतो. त्यांना मित्रहीन, secluded, Solitary अशा शब्दांनी संबोधले जाते.
बहिर्मुखी Extrovert असे लोक की जे सार्वजनिक गोष्टींमध्ये त्यांची ख्याती असते. त्यांना सामाजिकतेने उपलब्ध राहण्यास कुठलीही तमा किंवा समस्या नसते. हे पण थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं मन अश्या ठिकाणी रमते.
थोडा गहन विचार करूया जरा आता!
अंतर्मुख Introvert म्हणजे ते लोक ज्यांच्या मित्रांची संख्या कमी! ते एकटे जीवन जगण्याला प्राधान्य देतात. विचारही कोणासोबत सामायिक करायला आवडत नाही. सर्व गोष्टींच्या विचारांना एकचं मर्यादा असते, ती म्हणजे मन! त्यातचं, ह्या लोकांचे विचार सतत घोंगावत असतात.
मनमौजी असे पण म्हणता येईल की ती त्यांचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायला प्राधान्य देतात. कोणाचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाही, असे नाही पण एक सवय ते स्वतःला ठरवून देतात.
तर बहिर्मुखी म्हणजे मित्रांची अफाट भडिमार! नेहमी कोणाची सोबत अपेक्षित ठेवणारे. कोणी नसेल सोबत तर हे विचारात गुंततात. कोणी बोलायला नसेल तर ह्यांचे विचार वाढतात. गोष्टी मनात ठेवणे पटत नाही म्हणून ते नेहमी गोष्टी सामायिक करतात. आजूबाजूला असलेल्या व्यक्तींपासून काढता पाय न घेणे बहिर्मुखी लोकांना पसंद असते.
मग मनात एक प्रश्न येतो मग, आत्महत्या करणारे लोक कोण? अंतर्मुखी की बहिर्मुखी!
माझा एक वेगळाच दृष्टिकोन आहे ह्या बाबतीत! म्हणजे २०२० वर्षापासून ते आजच्या तारखेपर्यंत जर बघितले तर नेहमी प्रकाश झोतात असलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केली. अर्थात ख्यातनाम व्यक्तींनी Celebrity म्हंटल्यावर सार्वजनिक हजेरी तर लागणारचं. सामाजिकरित्या त्यांना उपलब्ध राहावेचं लागणार. मग ते अंतर्मुखी की बहिर्मुखी?
मला याबाबतीत असे वाटते, की जगाला हसता चेहरा दाखवून मनात असलेलं दुःख कोणाही समोर मांडायचे नाही. म्हणजे एकाप्रकारे जगासाठी बहिर्मुखी आणि स्वतःसाठी अंतर्मुखी.
आपण एक सामान्य माणूस म्हणून सेलेब्रिटी लोकांचे आयुष्य बघितले तर वाटतं की, इतकी लोक ह्याच्या वर प्रेम करतात तर त्याच्या चांगल्याचा विचार करणारी पण खूप लोक असतील.
पण जर तसे असते तर कोणी जगाला काही कळू न देता निरोप घेतलाचं नसता ना ! म्हणजे त्यांनाही वाटत असावे की काही गोष्टी आहेत त्या आपण कोणाही सोबत सामायिक करू शकत नाही.
एकतर हे लोक विविध माध्यमांतून सांगून जातात की, आयुष्य कसे आहे, ते कसे जगले पाहिजे, जेणेकरून केवळ विचार करणाऱ्या प्रक्रियेत न पडता कृती करावी. आणि अखेर हेचं असे आयुष्य संपवून घेतात.
मग आमच्या मुखात आणि मनात एक प्रश्न उदभवतो. की हेचं असे करू शकतात मग कोणीही असे करेल.
याचा अर्थ अंतर्मुखी लोकचं आत्महत्या करतात असं मुळीचं होतं नाही. भलेही ते काही विषय इतरांसोबत मांडत नाही पण ते सक्षम असतात तोडगा काढण्यासाठी! अजून त्यात जोडायचे झाले तर स्वतः निर्णय घेण्यात कोणाचे दुमत नसावे.
आपल्यापेक्षा स्वतःला आपल्याहून अधिक कोणी ओळखत नसतो, म्हणजे एकदम बारीक बारीक गोष्टींचा विचार केला तर! मग त्या विशिष्ट समस्येमधून निघण्यात आपण सक्षम असणारचं!
मग बहिर्मुखी करतात का आत्महत्या? नाही तेही नाही, जगाकडून अपेक्षित भावनांवर जगत असले तरी त्यांच्या काही प्रमाणात भावना लपलेल्याचं असतात. यांनाही मनमौजी म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही कारण हे आपले आयुष्य मनमुरादपणे जगतात. दुःखापासून दूर नेहमी आनंद खिश्यात घेऊन फिरणारे हे लोक असतात. खरं तर तो वाटायला पण मागे पुढे न मागे पाहणारे.
उत्तर ह्याचे कोणी नाही. जे लोक गोंधळलेले असतात, आपण काय करायला हवे? काय नाही? ते करतात. काही प्रमाणात म्हंटले तर अंतर्मुखी आणि बहिर्मुखी ह्या दोन्ही वर्गांत बसणारे असतात हे लोक! आत्महत्या करण्याला काही तशी व्याख्या नाही.
समस्या सामायिक करावीशी वाटतं असेल किंवा नसेल पण जगाला तेच दुःख दाखवा जे तुम्ही त्यांना सांगणार आहात. तुमच्या सुखात आनंदी असणारे कमी पण दुःखावर हसणारे जास्त असतात. म्हणून इतर गोष्टी सांगून स्वतःमध्ये पोकळी निर्माण करू नका.
काही प्रमाणात अंतर्मुखी लोक निर्णय घेण्यात कमीही पडतात, मग त्यातून विचार मग सतत रागाची भावना उत्त्पन्न होणे. त्यांनीही शक्य असल्यास कोणी सोबती करावा जो केवळ आपल्या भल्याचा विचार करेल.
इतके तर निरखून, पारखून घ्यावेच लागणार. काही प्रश्न मांडल्यावर, बोलल्यावरही सुटतात. बाकीचे आहेतचं मग नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा, योग्य तो आहार!
धन्यवाद "अंतर्मुख आणि बहिर्मुख म्हणजे काय?Introvert and Extrovert in Marathi" वाचल्याबद्दल !!