जॅक मा कोण आहेत? 'Chinese Businesss Magnet' होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता?
Who is Jack Ma? जॅक मा कोण आहे?
सूर्याचा
उदय प्रत्येक दिवशी होतो असाच एक दिवस होता,10 सप्टेंबर 1964 ला चीनच्या हंगझोउ मध्ये! अशाच एक दैदिप्यमान
सूर्याचं आगमन झालं.
१) ओळख आणि
सुरूवातीचा काळ -:
५४ वर्षांच्या
वयात
लोकोपकारी कामे, गुंतवणूकदार, राजकारण
अशा अनेक भूमिका वठवणारे त्यांच्या 'business magnet' या पेशाने नेहमीच जगाच्या चर्चेचा विषय
राहिले.
चला तर
जाणुन घेऊया, Ali Baba(अलिबाबा) ग्रुपचे सह संस्थापक 'जॅक मा' यांचा ‘Chinese
business magnet’ पर्यंतचा अथांग प्रवास!जॅक मा १३ वर्षांचे
असतांना इंग्रजी भाषा शिकणे असा त्यांचा न्यूनगंड, इतकेच नाही तर कुणाचीही मदत न घेता पर्यटक मार्गदर्शक म्हणुन
काम करतांना इंग्रजी भाषेवर त्यांची पकड बसत गेली. नऊ वर्ष त्यांनी पर्यटक मार्गदर्शक म्हणुन
काम केले. तदपर्यंत इंग्रजी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला होता.
जॅक मा यांचे खरं नाव Ma Yun(मा युन)पण पर्यटक मार्गदर्शक म्हणुन काम पाहत असतांना त्यांची मैत्री एका विदेशी पर्यटकासोबत झाली आणि त्यानीच जॅक नाव दिले. तेव्हा
पासुन jack ma(जॅक मा) नावानेच
ओळख होऊ लागली.
२) अपयश -:
जॅक मा यांचे
शालेय जीवन देखील खडतर होतेच चौथीत असतांना दोनदा तर आठवीत असतांना तीनदा अपयशास
सामोरे जावे लागले इतकंच नाही तर पदवीच्या प्रवेश परीक्षांमध्ये देखील पाच वेळा
अपयश आले.
अखेर एक
महाविद्यालयातुन इंग्रजी मध्ये पदवी धारण केली. त्यानंतर देखील अपयशाने त्यांची
साथ काही सोडली नाही. 30 हुन अधिक, विविध ठिकाणी संधी शोधण्याचा प्रयत्न केला पण
तिथेही निराशाच! जॅक मा यांनी स्वतः देखील एका मुलाखतीत उल्लेख केला होता
ती म्हणजे 'KFC
चीनमध्ये पहिल्यांदा
आली होती, २४ अर्ज होते आणि त्यातले २३ जण निवडली गेली होती तो एक मी होतो ज्याची
निवड झालेली नव्हती”.
इंग्रजी
मध्ये जॅक मा यांनी
तर प्रभुत्वच मिळवलं होतं. ह्याच कारणाने एका विद्यालयात व्याख्याता तसेच काही
दिवसांसाठी अनुवादक म्हणुन देखील काम केले.
अधिक वाचा : अझीम प्रेमजी मराठी माहिती | Azim Premji biography in Marathi
३) व्यवसाय
कोणत्या हेतुने स्थापन केला आणि येणाऱ्या अडचणी?
१९९५ साली जॅक मा मित्राला भेटण्याच्या हेतुने अमेरिकेला
गेले आणि तिथे गेल्यावर इंटरनेट ची माहिती मिळाली, beer या
शब्दाची इंटरनेट वर माहिती शोधण्याचा प्रयत्न मा यांनी केला पण विविध
देशांमधून माहिती प्राप्त करून देखील त्यांना खंत होती की चीन संबंधित काहीही
माहिती इंटरनेटकडे उपलब्ध नाही.
यातुन
त्यांच्या मनात काही कल्पनांनी थैमान घातले. इथुनच सुरुवात झाली चीनमधील इंटरनेटच्या बदलाला!
पहिला
प्रयत्न -: पहिला
प्रयत्न म्हणजे चीनमधील काही लहान मोठे व्यवसाय एका वेबसाईटद्वारे इंटनरेटला
जोडण्यास मित्रांची मदत घेतली. वेबसाईटचं नाव होतं ‘china yellow pages’ पण पुरेसा निधी न मिळाल्याने परिणाम
वेबसाईटवर झाला आणि ती बंद करावी लागली.’
अधिक वाचा : स्टीव जॉब्स यांची माहिती | Steve Jobs Biography in Marathi
४) समस्यांचे
निवारण कसे केले?
मागील अपयशाला डावलून ४
एप्रिल १९९९ मध्ये २० मित्रांच्या मदतीने अजुन एक वेबसाईट Alibaba तयार केली आणि अशाप्रकारे चीनच्या E- commerce क्षेत्रात जॅक मा यांचे आगमन झाले. Softbank
ने निधीसाठी मदतीचा हात
पुढे केला जेणेकरून अनेक लहान मोठ्या समस्यांचा तोडगा निघाला. इतकंच
नाही तर eBay सारख्या
४ वर्ष चीनच्या E-commerce क्षेत्रात थैमान घालणाऱ्या व्यवसायाला चीनमधून
काढता पाय घ्यावा लागला.
५) उपकंपन्या आणि विस्तार -:
Alibaba.com च्यासोबत Alibaba Cloud, Ali
Express, Ali OS, Ali Pay, Ali Genie, TaoBao, TMall, Lazada, 1688.com अशा काही अनेक सुविधा सध्या कार्यरत आहे.
६) व्यवसायात होणारे
उत्पन्न -:
एक
लाखांहून अधिक कर्मचारी असलेली Alibaba, Amazon आणि eBay हुन अधिक वार्षिक उत्पन्न असण्याचा दावा करते. जॅक मा यांचे
जगातील निवडक उद्योगपतींमध्ये नाव कायम आहे. ३१ मार्च २०१९
पर्यंत नोंद केल्या गेल्या प्रमाणे अलिबाबा संस्थेचे वार्षिक उत्पन्न ३७८.8 बिलियन
युआन म्हणजेच ५४.५ बिलीयन अमेरिकन डॉलर्स इतके होते. Inspiring Story of Jack Ma
काही
कामांमध्ये अपयश मिळाल्यास निराश होऊ नका! अपयश आपल्याला समजुतीने तेच काम पुन्हा
करण्याची संधी देते.
-जॅक मा
जॅक मा कोण आहेत? 'Chinese Businesss Magnet' होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता?
जॅक मा बद्दल फारच कमी माहिती दिली आहे.
ReplyDelete