ब्रह्मकमळ माहिती मराठी | Brahma Kamal information in marathi | ब्रम्हकमळ ह्या फुलाविषयी माहिती ! ब्रह्मकमळ इंफॉर्मशन इन मराठी
ब्रह्मकमळ माहिती मराठी | Brahma Kamal information in marathi ब्रम्हकमळ ह्या फुलाविषयी माहिती ! ब्रह्मकमळ इंफॉर्मशन इन मराठी
ब्रम्हकमळ फुल ही फुलाची एक महत्वाची प्रजाती आहे. हया फुलांच्या प्रजातीला धार्मिक आयुवेर्दिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या देखील विशेष महत्व आहे.
शिवपुराणात असे सांगितले आहे की देवी पार्वती यांच्या विनंतीवरून ब्रम्हकमळाची निर्मिती करण्यात आली होती.
कारण भगवान महादेव यांनी जेव्हा रागात गणपती बाप्पाचे शिर धडापासून अलग केले होते. तेव्हा पार्वती मातेच्या आज्ञेनुसार गणपती बाप्पा यांचे शिर बसवताना ब्रम्हकमळ ह्याच फुलाचा वापर करण्यात आला होता.
ब्रम्हकमळ हे फुल साधारणतः जुलै ते सप्टेंबर ह्या महिन्यात उमलत असते. ब्रम्हकमळ हे हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक महत्वाचे फुल आहे.
ब्रम्हकमळाचे हे फुल दिसायला एकदम सुंदर, आकर्षक आणि मोहक असते. हे फुल पांढरया शुभ्र रंगाचे असते. उमलताना हे फुल आणि ह्या फुलाचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसत असतो.
असे म्हटले जाते की ब्रम्हकमळ ह्या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपणास वर्षभर वाट पाहावी लागते.
कारण हे फुल दुर्मिळ फुल असल्याने इतर फुलांप्रमाणे आपल्याला बाजारात सहजरीत्या हे उपलब्ध होत नसते.
वर्षातुन एकदा उमलणारे हे फुल संध्याकाळी उमलण्यास प्रारंभ होत असतो. आणि मध्यरात्री पर्यंत हे फूल पुर्ण उमललेले आपणास दिसून येते.
ब्रम्हकमळ हे फुल महादेवाच्या पिंडीवर भक्तजण भक्ती भावाने अपर्ण करीत असतात. तसेच हे फुल भेट म्हणून देखील दिले जाते.
ब्रम्हकमळ हे एक औषधी फुल देखील आहे.त्यामुळेच ह्या फुलाला विकले देखील जात नाही आणि खरेदी देखील केले जात नाही. आणि समजा कोणी आपल्याला हे फुल भेट म्हणून दिले तरच आपणास हे अधिक लाभदायी ठरते.
अधिक वाचा : Mango Tree Information
ब्रह्मकमळाची पूजा | ब्रह्मकमळाची पूजा कशी करावी?
ब्रम्हकमळ उतरल्यानंतर याच्या रोपटयाची पुजा केली जाते. हळद-कुंकु, फुल तांदुळ वाहुन निरांजन लावत षडषोपचार पुजा ह्या रोपटयाची केली जाते. ब्रह्मकमळ पूजा
ब्रम्हकमळ हे फुल देवघरात देवाच्या समोर अपर्ण करण्यात येत असते. ब्रम्हकमळाला उत्तराखंडात ब्रम्हकमळ ह्या नावाने तर हिमाचल प्रदेशात दुधा फुल असे देखील म्हटले जाते.
ब्रम्हकमळ ह्या फुलाचे धार्मिक दृष्ट्या असलेले महत्व -
ब्रम्हकमळ हे फुल भगवान भगवान विष्णू यांच्या नाभीपासुन तयार झाले आहे अशी देखील ह्या फुलाबाबत धार्मिक मान्यता आहे.
हया फुलावर ब्रम्हा विराजमान आहेत. रात्रीच्या वेळी हे ब्रम्हकमळ फुलताना दिसुन येते.
ब्रह्मकमळ माहिती मराठी | ब्रह्मकमळ माहिती
ब्रम्हकमळाचे औषधी महत्व -
ब्रम्हकमळ हे एक औषधी फुल देखील आहे. हे फुल सुकवून कॅन्सर बरा करण्यासाठी औषध तयार केले जाते.
ब्रम्हकमळामुळे अतिशय जुनाट खोकला देखील बरा होऊ शकतो. तापावर देखील हे ब्रम्हकमळ अत्यंत गुणकारी ठरते.
ज्या महिलांना युरिन इन्स्पेक्शनचा त्रास आहे अशा महिलांसाठी देखील ह्या फुलाचा अर्क उपयुक्त ठरत असतो.
लिव्हर इन्स्पेक्शन मध्ये देखील हे फुल अत्यंत लाभदायी ठरते.
हाडे दुखी,सर्दी खोकला इत्यादीवर देखील हे फुल गुणकारी ठरते. हया फुलामुळे कुठलाही आजार पुर्णतः बरा होतो.
समजा आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावर जखम झाली असेल तर ब्रम्हकमळाच्या पानांचा अर्क त्यावर लावावा ती जखम बरी होण्यास मदत होते.
ब्रम्हकमळाचे वैशिष्ट्य काय आहे ?ब्रम्हकमळ महत्व
ब्रम्हकमळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे फुल वर्षातुन फक्त एकदा रात्रीच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात हे फुल उमलते. हे फुल पुर्ण रात्र फुलते अणि सकाळी कोमेजून जात असते.
हे फुल जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावले तर आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करत नसतात.
एवढेच नव्हे तर आपल्या घरात जे काही वास्तु दोष आहेत ते देखील दुर होत असतात.
ब्रम्हकमळाच्या फुलाने आपले भाग्य उजळते आणि आपल्यावर आलेली सर्व संकटे देखील दुर होतात. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
ज्यांच्या घरात हे फुल उमलते ते व्यक्ती भाग्यशाली आहेत असे मानले जाते. साक्षात ब्रम्ह देवाची कृपादृष्टी त्यांना लाभली आहे असे मानले जाते.
ब्रम्हकमळा फुलत असताना त्यामध्ये ब्रम्हदेव किंवा त्रिशुळ ह्या प्रकारची आकृती दिसुन येते.
ब्रम्हकमळ हे ते फुल आहे ज्यावर पाणी शिंपडुन भगवान शंकर यांनी गणपतीला पुन्हा जिवित केले होते. म्हणुन हे फुल जीवन देणारे फुल म्हणून ओळखले जाते.
हिमालयात उपलब्ध होत असलेले ब्रम्हकमळाचे हे फुल जी व्यक्ती फुलताना बघते त्याचे जीवन बदलुन जाते अशी मान्यता आहे.
ब्रम्हकमळ फुल हे महादेवाचे सर्वात आवडते फुल असल्याने केदारनाथ येथे महादेवाच्या प्रतिमेवर हे फुल चढविण्यात येत असते.
धन्यवाद "ब्रह्मकमळ माहिती मराठी | Brahma Kamal information in marathi | ब्रम्हकमळ ह्या फुलाविषयी माहिती" वाचल्याबद्दल!!