मी अनुभवलेला गणपती | ganpati bappa 2023 |
happy ganesh chaturthi
happy ganesh chaturthi in marathi
मी अनुभवलेला गणपती | ganpati bappa 2022 |
happy ganesh chaturthi
अथांग सृष्टीच्या आदी देवाच्या पायाशी नतमस्तक होऊन सुरुवात करण्यास उत्सुक होतो. मंडळाचे पहिले वर्ष, अजूनही आठवतं मला माझं वय असेल लगभग ७ किंवा ८ वर्ष! त्या वर्षी आम्ही जोमाने गणपतीचं आगमन करायचं म्हणून मंडळाची स्थापना केली. त्या वर्षी ती ११ रुपयांची मूर्ती आणलेली, मूर्तीला किंमत नसते अगदी तसेच काहीसे, ती मूर्ती ganpati murti
गणेशाच्या खऱ्या रुपाला कल्पेनपरी असलेल्या बालमनाला भिडणारी होती. ganpati bappa morya गणपती फोटोज
|
ganpati png |
आमच्या शेजारी असलेल्या पडवीत, एक कनात चारही बाजूंनी बांधली. मधोमध टेबलरूपी सिंहासन आपल्या लाडक्या बाप्पाचं आसन म्हणून सज्ज करून ठेवले होते. नैसर्गिक, कागदी स्वतः बनविलेल्या वस्तुंनी सजावट व्हायची. ह्यासाठी पहिले काही दिवस राखीव असायचे. गणपती बाप्पा मोरया
एक दोन तीन चार , गणपतीचा जयजयकार !!
अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर !!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!
जयघोषात बाप्पाचं आगमन होऊन, बाप्पा विराजमान ही व्हायचा. या पूर्वी tv माध्यम होते. गणपती बाप्पाला मनभरून बघायचे, कार्टून किंवा इतर कुठल्या ही रुपात तो बालमनाला भुरळ घालतोच.
पार्वतीच्या बाळा, सनईचा सूर कसा?, रांजणगावाला महागणपती, अशी
गणपतीची गाणी
ganpati song त्यावेळी प्रमाणे आताही तितकेच लोकप्रिय आहेत.
सकाळ झाली की लवकर उठून बाप्पा समोर जाऊन बसायचे. एक मात्र खरं होते की त्याच्या नयनांची किमया ही खूप भारी होती, क्षणात प्रेमात पडायचो आणि हे मात्र सर्वज्ञात आहे. प्रत्येकाने अनुभवलंय देखील! वर्ष सरतात मूर्तीवरील का होईना ते प्रेम, तो निघतो वर्षासाठी का होईना तो दिसणार नाही पण आसवं ही दाटून असतात, त्या डोळ्यांच्या पडद्यांमागे!
ganpati decoration
बाप्पा चालले आपले गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला!! हे गाणेही तितकंच हृदय पिळवटून टाकायचं. खरी तारांबळ इथेही उडायची, आरती! लंबोदर पितांबर हे कडवं आधी की रत्नखचित फरा आधी ? मग कित्येक वर्षे तिथं विराम द्यायचो कोण कसं म्हणतंय निरखून ऐकले की, मग आपली आरती ही सुरू.
आणि जागतिक प्रश्न हा सुद्धा असायला हवा दास रामाचा वाट पाहे सजना, काय चुकलंय ह्यात! सदना असायला हवे नाही का?
एकदा का आरती ganpati aarti संपली, आवाजाला उधाण यायचं, वाढता आवाज साक्ष द्यायचा. गणेशोत्सव मराठी निबंध
|
Ganpati Aarti pooja |
घालिन लोटांगण वंदीन चरण !
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे!!
आणि विशेष तर तेव्हाही होते की हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ला आवाज तर आभाळालाही दस्तक द्यायचा.हे मात्र अजूनही उमगलं नाही की तो मोदकांसाठी व्याकुळ निरपराधी पोटाच्या प्रश्नाअभावी आवाज कळवळा व्हायचा की खरंच आरती येत नव्हती.
मग गल्लीतल्या ह्यांना त्यांना, वरिष्ठ, ज्येष्ठांना तुमची आरती आहे आज संध्याकाळी असा निरोप धाडायचा. उकडीचे मोदक करा, खिरापत तर विशेष असुद्या, काही गोड धोड असले तर उत्तमचं. फर्माईश गणपती च्या मनातली आमच्या मुखात असायची. बाप्पा ला हवा तो किती तरी एक मोदक त्याहुन अधिक त्याची भूक तरी किती?
सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आरती करून, संध्याकाळी तर दहा दिवसांकरिता पूर्ण वेळ बाप्पासाठीचं असायचा. वर्ष सरत राहिले, पण ह्या उत्साहाला कुठेही ठेच लागली नाही. १० ते १५ दिवस आधी वर्गणी सुरू व्हायची आणि सर्वजण कळत नकळत त्यापरी मदतही करायचे. मंडप उभारणी बाप्पाच्या आगमनाच्या ३ ते ४ दिवस आधी जोमात सुरू व्हायची.
पुन्हा त्याचं जयघोषात त्याचं आगमनही व्हायचं. संध्याकाळी दहा दिवसांकरिता विविध स्पर्धा ganpati spardha रंगायच्या. संगीत खुर्ची, चमचा लिंबू इ. आणि हे उपक्रम ग्रामीण प्रमाणे शहरी भागांत अजूनही अस्तित्वात आहेत. मग त्यात जिंकणाऱ्यास पेन्सिल, पेन इ. वस्तू देऊन सत्कार व्हायचा विशेष म्हणजे आधी त्या गोष्टींचा देखील हेवा वाटायचा.
विसर्जनाच्या दिवशी मात्र त्याचं पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घ्यायचो. ट्रॅक्टर ची ट्रॉली सजवुन निरनिराळ्या गर्जना देऊन,
अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला!!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!
भलेही वर्षाचा विलंब पण तरीही पुढच्या वर्षाच्या आगमनाची आतुरता ह्या वर्षीच्या विसर्जनाच्या दिवशीच असायची.
आपल्या मंडळाचा गणपती एकदा का विराजमान झाला, मग लहानग्या मंडळाला घेऊन आख्या गावात फेरफटका मात्र असायचा. आपला गणपती इतका तर ह्यांचा इतका, ही मात्र तुलना व्हायची. पण बालमनाच्या त्या तुलनेत तथ्य नसायचे काही! काहीएक वर्षांच्या परंपरा असलेले गणपती मंडळे दर वर्षी विविध देखाव्यां सहित आपल्या गणपतीला, मंडळाला सादर करायचे. विसर्जनाच्या दिवशी देखील नयनरम्य देखाव्यांनी सजलेल्या ट्रॉली असायच्या.
मात्र गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी !
अस का?
तर आता आमचे गणपती मागणी करतात, कर्कश्य आवाजाची, विविध लायटिंग चा फोकस गणपती वर त्याच्या डोळ्यांवर असला पाहिजे. मंडपाच्या खाली जागा असल्यास पत्त्यांचे डाव तर मांडले गेलेच पाहिजे. अनेक कार्यक्रमही रंगतात त्याचं मंडपाखली! पण काही क्षुल्लक लोकांमुळे सर्व गणपतीच्या सणाला टोमणा बसतो.
|
ganpati photo |
आगमनाच्या किंवा विसर्जनाच्या दिवशी फिल्मी गाण्यांनी तर माहोल होतो. बाहो मे बोतल, डॉन, सात समुंदर, असली तुच्छ गाणे वाजतात. ज्या गाण्यांचा आणि गणपतीचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. ज्या कोणाला मंडळांच्या काही गोष्टी खटकतात त्या ह्याचं! काय तर म्हणे आमचा गणपती नाचतो, सण आम्ही साजरा करतो मान्य आहे ना याबद्दल दुमत नाही.
गणपती समोर का पण? गणपतीचं विसर्जन ganpati visarjan किंवा मूर्ती स्थापना करावी नंतर काय करायचं ते करा. अशा तथाकथित भक्तांच्या कृत्यांमुळे लोक त्या मंडळाला नाव ठेवतात हे मात्र तितकंच खरं! गणपती नाचत आला पाहिजे असेही काही असेल तर ढोल ताशा हे पारंपारिक वाद्ये आहेतचं. कोणाला डोस हवा असतो नाचण्याकरिता पण गणपतीला त्याची गरज नसते.
आता मात्र गणपतीची अजून एक मागणी ही असते, राजकारणी लोकांमुळे बाप्पा प्रसन्न होतो. आरती साठी त्यांची वर्णी लागणे मंडळासाठी तसेच गणपती साठी उपयुक ठरते. ख्यातनाम व्यक्तींमुळे देखील गणपतीची प्रतिभा, लोकप्रियता वाढते. त्यांना आमंत्रित करून विविध फिल्मी संवादांची देखील गणपती मागणी करतो.
खरंय का? तेव्हा विचार येतो, लहानपणापासून ज्या गणपतीवर अथांग प्रेम आपण करतो. त्याची अशी विटंबना होते, हे मात्र आता असह्य होते. विसर्जनाच्या दिवशीही मूर्तीचे हाल बघवत नाही. लहान मुले मात्र निरपराधी मनाने, हृदयाने त्याची वर्षभर वाट बघता. दहा दिवस त्याची पुरती मनोभावे पूजा करतात. ganpati pooja
|
Ganpati Visarjan |
यंदाही कोरोनामुळे गणोशोत्सव जरा साध्या पणाने होईल, गेल्या वर्षापासून देवाला देखील मंदिरात क्वारंनटाइन व्हावे लागले आहे. पुढच्या वर्षी आगमन मात्र थाटामाटात होईलचं, जोमाने होईल. गेल्या दोन वर्षांची कसर निर्विवाद पुढल्या वर्षी पूर्णत्वास जाईल, पण वरील विषयांचा विसर न व्हावा. सण आपलाच आहे मूर्ती जिवंत म्हणून आपण गणेशाकडे बघतो.
धन्यवाद! मी अनुभवलेला गणपती | ganpati bappa 2023 |
happy ganesh chaturthi
!! वाचल्याबद्दल! तुम्ही तुमचा अनुभव कमेंट मार्फत share करू शकता!