Start living a better life | How to start making changes in your life in Marathi?

Start living a better life | How to start making changes in your life?

Start living a better life | How to start making changes in your life in Marathi? | रेंच जण जीवनाला सुरुवात कुठून करावी? (Where to start life?) कशी करावी? (how to start better life?) ह्यातच गुंतलेले असतात. ह्याच विचारांत गुरफटत असतात आणि अमाप, अगणित विचारांनी मनात कोलाहल माजतो. डोकेदुखी, ताणतणाव अश्या अनेक गोष्टी उदभवतात.



Start living a better life

आयुष्यात बदल करणे चांगलेच आणि हाच मार्ग आहे स्वतःला माणुस म्हणुन विकसित करण्याचा आणि वाढण्याचा! बदल ही मानवी जीवांची स्थिर प्रक्रिया आहे.


"If You want to change the world, Start off by making your bed
- Admiral  William H. McRaven

 

कुणावर अवलंबून राहणे म्हणजे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू लागतो don't be dependent on others for your happiness. अपेक्षेप्रमाणे घडले नाही मग आपण स्वतःला कोसतो. जेव्हा आपण आयुष्यात बदल घडावेत यासाठी प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याची सुरुवात आपण जिथे आहोत तिथूनच केली पाहिजे. झटपट बदल घडणे जे अशक्यांच्या गोष्टींच्या यादीत असते. आपण आपल्या कष्टांवर अवलंबून राहून अपेक्षा करण्यापेक्षा त्यांवर जरा विश्वास ठेवला पाहिजे. 

How to make changes in our life?


हातात काही नसतानाही केलेली सुरुवात चेहऱ्यावर निकालाच्या अखेर आनंद देते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात पहिल्या पायरीने केली तर पाया भक्कम होत जातो. ज्या वृक्षाचे मूळ भक्कम ते वृक्ष न कोलमडता उभे राहते.

अगदी पहिल्यापासून सुरुवात करणे म्हणजे प्रामाणिकपणे हे शोधून काढणे की आपण घ्या घडीला कुठे आहोत? आणि काय करत आहोत? हे केल्याने आपल्याला माहीत होईल की काय बदल करणे गरजेचे आहे. थोडक्यात काय तर आकलन करणे. बऱ्याच जणांना कल्पना नसते की त्यांनी काय केले आहे? आणि काय केले पाहिजे?


How to track daily work activities? | दैनंदिन कामकाजाचा मागोवा कसा घ्यावा?

माझ्या काही मित्रांना वाचनाची नितांत आवड आहे. पण त्यांच्या मधल्या काहींचा नेहमीचा एक प्रश्न असायचा की ' वाचलेले काही वेळेपर्यंत लक्षात असते आणि काही दिवसांनी काहीसा विसर पडलेला असतो. कुठले बदल करणे अपेक्षित आहे?' मी त्यांना सुचवले, एक वहीवर लिहून घ्या की कुठले साहित्य आपण वाचतोय? किंवा वाचले पाहिजे? त्याने वाचन विषयानुसार विभागले गेले.

त्यांनी काही दिवसांनी ह्याचा मागोवा घेतला तर समजले होते की सर्व वाचन एकत्र झाल्याने एकंच गोंधळ व्हायचा. आता योग्यरीत्या आकलन करून गोष्टी साधण्याला प्राधान्य दिले तर साध्य होतात किंवा पूर्णत्वास जातात. बदल हे असेच घडतात फक्त संयम महत्वाचा! हे फक्त एक उदाहरणाद्वारे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे.

एकदा असेच वाचण्यात आले होते की, बहुतांशी लोक, वरील नसल्याने आवश्यक असलेल्या गोष्टी सोडून देतात. वायफळ गोष्टींवर फावला वेळही अपेक्षित वेळेपेक्षा अधिक खर्च केला जातो. कारण कोणी क्षण खर्च झालेल्या गोष्टींचा मागोवा घेत नाहीत. मागोवा जर घेतला गेला तर कळेल की कुठल्या गोष्टींवर किती वेळ वाया जातो किंवा खर्च केला जातो.
Time Management | Time is money


Time management एकदा गेलेली वेळ काही केल्या परत येत नाही, तो क्षण पुन्हा मिळत नाही. म्हणून तर म्हणतात ना "Time is priceless". अनेक जण विश्रांती म्हणून किंवा कामापासून दुरावा म्हणून टीव्ही समोर तासंतास बसलेले असतात. सोशल माध्यमे तर आहेच, त्यावर पण वेळ खर्च होतोच.

यावर उपाय म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा मागोवा घेणे. आपण पुढे जाण्याआधी काय करत आहोत? आणि आता कुठल्या जागी स्थित आहोत हे ज्ञात असले पाहिजे. एक दोन आठवडे किंवा एखादा महिना भर हे जोपासले तर खूप महत्वाची माहिती जमा होईल. असेही २१ दिवसांपर्यंत कुठल्याही गोष्टीची सवय लागते. यासर्व गोष्टी आपल्या बदलांच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल.

अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर, काहीजण त्यांचं वजन कमी  करण्यासाठी मागे लागलेले असतात. इथेही सारखेच पर्याय त्यांनाही उपलब्ध आहेत. झालेल्या वा गत गोष्टींचा मागोवा घेणे, वजन वाढण्याचे कारण कळेल. काय खाल्ले? काय नाही खाल्ले? पाहिजे किती प्रमाणात खायला हवे? ह्याची कल्पना येईल. ह्या सर्व गोष्टी सविस्तर उमगू लागतील.

सर्वप्रथम 'Body Mass Index' तपासलेले कधीही उत्तम! Underweight / अपेक्षित वजनापेक्षा कमी, Overweight / जास्त किंवा Normal / सामान्य आहे. हेचं मोजण्यासाठी इथे क्लिक करा. ( Calculate Body Mass Index)
 
किती वेळ आपण झोपेवर खर्च करतो? अनावश्यक गोष्टींवर किती पैसे खर्च करतो? कोणत्या गोष्टींसाठी किती वेळ खर्च केला पाहिजे? या सर्व गोष्टींचे उत्तर बदल घडण्याची सुरुवात असेल.

 Start living a better life | How to start making changes in your life in Marathi? । लेख - अनिकेत कुंदे
Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

Post a Comment

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator