इंटरनेटवर सुरक्षितपणे कसे ब्राउझ करावे? मराठी मध्ये | How to securely browse the internet?
इंटरनेटवर सुरक्षितपणे कसे ब्राउझ करावे? मराठी मध्ये, | how to securely browse the internet? | हल्ली प्रत्येकाला स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी भासायला लागली आहे. बाहेरील वातावरण बघता शरीराची, आणि घरात असताना मोबाईल, इंटरनेट इ. Data breach डेटा उल्लंघन अशा कानावर पडणाऱ्या बातम्या, आपण कुठे माहिती दिलेली अन ती हयात समाविष्ट तर नाही ना? ह्याची धास्ती!How to search safely on the internet
विविध social साईट्स ला प्रविष्ट किंवा जतन केलेली माहिती जगाला उघड होईल किंवा त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. असा मनावर असणारा ताण एकप्रकारे छुप्या पध्दतीने आपल्याला डीवचत असतो. आपली माहिती कोणी चोरली किंवा तिचा गैरवापर झाला आहे, ह्याबद्दल त्या विशिष्ट कंपनीला दंड ठोठावला जातोच. पण एकदा बाहेर पडलेली माहिती पुन्हा सुरक्षित झालेली आहे, ह्याची हमी ती कंपनी तर देत नाही. How to browse the internet safely
माहिती प्रदान करण्यापूर्वी विश्वास कोणावर ठेवणार? Who to trust before providing information?
हा प्रश्न अशावेळी साहजिकच पडतो, आपण ज्यांना कोणाला माहिती प्रविष्ट करतोय. ती किती प्रमाणात त्यांना मिळणे अपेक्षित आहे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. कुठलेही अँप्लिकेशन आपली माहिती घेण्याअगोदर आपल्याकडे विनंती करत असते. त्यावेळी आपण ती विनंती कशासाठी आहे? हे न बघण्याच्या आधी 'allow' करून मोकळे होतो.
काही अँप्स आपल्या स्थानावरती (location) अवलंबून असतात. मग तिथे आपण ' Allow while using this app' अश्या पर्यायाची निवड करू शकतो. त्याचा अर्थ असा की आपण अँप ला स्थानाच्या निगडित माहिती वापरण्याची परवानगी देऊ शकता. पण केवळ त्या अँपचा जेव्हा तुम्ही वापर करत असाल तेव्हाच!
माहिती चोरली गेली तर त्याचे परिणाम जास्तीतजास्त काय होऊ शकतात? What are the possible consequences if information is stolen?
काही अँप बँक किंवा payment च्या निगडित असतात. त्यांच्या वापरासाठी सर्वच परवानगी असणे आवश्यक असतात. अर्थातच त्यांचा gateway तितकाच सुरक्षित असतो. जोवर आपण काही माहिती प्रदान करत नाही तोवर ते कुठल्याचं गोष्टीला स्वतःहून सुरुवात करत नाही.
ज्यावेळी आपण कुठल्या अवैध दुवावर ( Invalid links) क्लिक करून माहिती प्रविष्ट करतो. त्यावेळी त्या माहितीवर आपल्या नकळत अभ्यास करणारे काहीसे डोके असतात. ह्या अवैध दुवा संदेशांमार्फत आपल्यापर्यंत पोहचत असतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन क्लिक केले पाहिजे.
how to browse internet securely? in Marathi
बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतोच की इंटरनेटवर सुरक्षितपणे browse कसे केले पाहिजे? अनेक असे सायबर अटॅक ( cyber attacks) हे गूगल मध्ये माहिती प्रविष्ट केल्यानेही होतात. Cyber threats पण आपली माहिती गोळा करून दिले जातात.
१) डेटा उल्लंघनामध्ये किंवा इतर ठिकाणी आपला Gmail वापरला गेला आहे का ते पहिल्यांदा तपासायला हवे, ते कसे?
- सर्वप्रथम मोबाईल/डेस्कटॉप मध्ये गूगल search उघडा.
- त्यात 'Have I Been Pwned' हे एंटर करा. दाखवल्या जाणाऱ्या पहिल्याच दुवावर (link) क्लिक करा. किंवा इथेही क्लिक करु शकता.
असे page उघडले जाईल, त्यात तुम्हाला हवा असलेला ई-मेल टाकून 'Pwned' वर क्लिक करा.- जर तिथे, 'Oh no — pwned!' असे दाखवले गेले तर त्याचं क्षणी Gmail अकाउंट चा पासवर्ड बदलून 'Two Factor Authentication' सुरू करा.
- जर 'Good news — no pwnage found!' असे दाखवले गेले असले तर काही समस्या नाही. पण कुठेही ई-मेल ID प्रविष्ट करण्याआधी विचारपूर्वक करायला हवा.
२) Google Chrome वर सुरक्षितपणे browse कसे करावे? how to browse securely on chrome? how to search securely on the internet ?Safe internet browsing tips
- सर्वात पहिले क्रोम उघडून, उजव्या बाजूच्या वरच्या दिशेला तीन डॉट्स वर क्लिक करा.
- मग 'Settings' वर क्लिक करा. पुढे गेल्यावर 'Privacy and Security' वर क्लिक करा.
- 'Safe Browsing' वर क्लिक करून 'Enhanced Protection' किंवा ' Standard Protection' वर क्लिक करू शकता. हे करण्याचे फायदे तुम्हाला इथे गेल्यावर सविस्तर माहिती होतील.
- पुन्हा त्या तीन डॉट्स वर क्लिक करून 'New Incognito Mode' वर क्लिक करा. इथुनच surfing करणेच सर्व काही आहे असे नाही. तुमचा वापर करून झाले की 'Incognito Mode' चा टॅब बंद करा.
- नंतर तीन डॉट्स वर क्लिक करून 'Settings' मध्ये या आणि 'Privacy and Security' वर क्लिक करा.
- पुढे 'Clear browsing data' वर क्लिक करा आणि त्यात दोन विभाग दिसतील. पहिला 'Basic' आणि दुसरा 'Advanced'!
मूलभूत ( Basic) मधील 'Browsing history', 'Cookies and Site data' आणि 'Cached Images and Files' यांसमोरील checkbox टिक करून खाली असलेल्या 'clear data' वर क्लिक करा. सर्वात महत्वाचे वर असलेली 'Time Range' नेहमी 'All Time' वर निवडा.
'Advanced' मधील 'Browsing history', 'Cookies and Site data', ' Cached Images and Files', 'Saved Passwords', 'Autofill form data' आणि 'Site Settings' यांसमोरील checkbox टिक करून खाली असलेल्या 'clear data' वर क्लिक करा. यातही सर्वात महत्वाचे वर असलेली ' Time Range' नेहमी 'All Time' वर निवडा.
मी 'Autofill form data' बंद करण्याचा सल्ला देईल. कारण नको असलेल्या ठिकाणीही ते हेच वापरकर्त्यांकडे विचारणा केली जाते. आणि 'Saved Passwords' पण बंद केले तर उत्तमचं! आणि जर सुरू असेल तर क्लिअर करताना तोही डेटा करायला हवा.
३) सर्वात महत्त्वाचे अजून एक, google वर 'history google' प्रविष्ट करा किंवा इथे क्लिक करा.
इथे आपल्याला आपली संकेतस्थळावरील उपक्रम( Web App Activity), स्थान ( Location history) आणि Youtube history माहीत होईल. आणि वेळोवेळी इथून activity किंवा history काढून टाकलेली कधीही योग्य !
अजून काही प्रसिद्ध अशी सुरक्षित browsersचा तुम्ही वापर करू शकता.
इ.
इंटरनेटवर सुरक्षितपणे कसे ब्राउझ करावे? मराठी मध्ये, | how to securely browse the internet?
How to browse securely over the Internet? How to securely browse the internet? How to browse privately?, how to browse in incognito mode? लेख - अनिकेत कुंदे
छान आणि अतिशय उपयुक्त माहिती!
ReplyDeleteVery nice and useful content.
ReplyDeleteVery informative and great containt for browsing to protect policy and privacy
ReplyDeleteGood information Sir
ReplyDeleteClick here for Latest Technology News
nice. do visit - https://www.bedunechar.in
ReplyDelete