बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
नमस्कार मित्रांनो, बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
बिपिन चंद्र पाल यांची माहिती मराठी | bipin chandra pal in marathi
आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहे, येथील मोकळ्या हवेत श्वास घेत आहे, विविध विषयांवर मते मांडू शकत आहे, वाटेल त्या राज्यात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करु शकत आहे, हे स्वातंत्र्य एका रात्रीत मिळालेले नाही त्याचबरोबर फक्त कोणी एकानेचं यासाठी प्रयत्न केलेले नाहीत तर हजारो एकापेक्षा एक क्रांतिवीरांनी आपले आयुष्य पणाला लावून वेळे प्रसंगी बलिदान देखील दिलेलं आहे. आज अशाच एका महान क्रांतिकारी बद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव आहे “ बिपिनचंद्र पाल ".
बिपिन चंद्र पाल कोण आहे ? who is bipin chandra pal?
Lal-Bal-Pal ( from left) |
लाल-बाल-पाल हे त्रिकूट तर तुम्ही नक्की ऐकलंच असेल. या तीन जणांची धास्ती संपुर्ण ब्रिटिश सरकारला होती. यातीलच एक म्हणजे बिपिनचंद्र पाल. यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 रोजी सिलेथ (आजचा बांगलादेश ) येथे एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता (Bipin chandra pal birth date). त्यांचे वडील रामचंद्र पाल हे एक पारशी विद्वान आणि शिक्षक होते. बिपिनचंद्र यांचे सुरुवातीचे शिक्षण चर्च मिशन सोसायटी स्कूलमध्ये झाले. त्यांना लहानपणापासून शिक्षणामध्ये बिलकुल ही रस नव्हता, तरीसुद्धा त्यांना अवांतर वाचनाची भरपूर आवड होती आणि यामुळेच विविध विषयांवरील त्यांचं ज्ञान वाढत गेलं.
इंग्रजांचे वाढते अत्याचार ते स्वतः डोळ्यांनी पाहत होते, त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपण राजकारणामध्ये भाग घ्यायचा, 21 व्या वर्षी ते हेडमास्टर झाले होते. 1885 साली भारतीय नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि त्या वेळेस बऱ्याच मोठमोठ्या क्रांतिकारकांच्या सानिध्यात बिपिन चंद्रपाल आले ज्यामध्ये मुख्य लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक होते. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने जागृत होऊन बिपिन चंद्र पाल यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
अधिक वाचा : विनायक दामोदर सावरकर यांची माहिती | Savarkar | Veer Savarkar information in Marathi
ब्रिटिश लोक भारतातूनच कच्चामाल चोरून नेऊन त्यावर प्रक्रिया करत, आणि प्रक्रिया केलेला विदेशी माल चढ्या भावाने भारतीयांनाच विकत असत. या सर्वांमुळे भारतातील उद्योग धंदे बंद पडू लागले, आणि आणि भारताची अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ लागली, भारतातील लोक अधिकाधिक गरीब होत गेले. आणि या सर्वांची जाणीव बिपिन चंद्र पाल आणि इतर क्रांतिवीरांना होतीचं. यासाठी त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध अर्ज देऊन ब्रिटिशांना विनवणी केली, पण या सर्वांना ब्रिटिश अजिबात जुमानत नव्हते शिवाय दिवसेंदिवस त्यांचा क्रुरपणा वाढत चालला होता. त्यामुळे काही क्रांतिवीरांनी आता ब्रिटीशांचा निषेध आणि आंदोलने करायला सुरुवात केली. पण याला काही जणांचा विरोध होता.
बिपिन चंद्र पाल त्यांचे योगदान | contribution of bipin chandra pal !
bipin chandra pal photo |
1907 साली भारतीय नॅशनल काँग्रेसचे दोन भाग पडले, एक जहाल गट आणि एक मवाळ गट. बिपिनचंद्र पाल हे जहाल गटाचा एक भाग होते. यानंतर ब्रिटिशांनी जहाल गटाच्या नेत्यांना उचलून तुरुंगात डांबण्यातचा नित्यक्रम चालू केला. याच वेळेस लोकमान्य टिळक व लाला लाजपतराय यांच्यावरही बरेच अन्याय केले गेले, पण बिपिन चंद्र पाल हे कोणत्याही आरोपात सापडत नव्हते. यानंतर जेंव्हा औरबिंदो घोष यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला, तेव्हा ब्रिटिशांनी बिपिनचंद्र पाल यांना साक्ष देण्याची सक्ती केली, यास त्यांनी पूर्ण विरोध केला आणि सहा महिन्यांच्या शिक्षेला सामोरे गेले. तुरुंगात जाण्याची त्यांची हीच पहिली वेळ होती.
तुरुंगातून सुटून आल्यानंतर मात्र त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये तीव्र सहभाग घेतला. स्वदेशी चळवळीमध्ये स्वतःचा सहभाग घेऊन इतर लोकांना देखील यासाठी प्रवृत्त केले.
बिपिन चंद्र पाल हे जहाल नेत्यांपैकी एक होते, त्यांनी बऱ्याचशा चळवळींमध्ये भाग घेतला ज्यामुळे लाल-बाल-पाल हे त्रिकूट संपूर्ण भारतामध्ये ओळखले जाऊ लागले. ते एक उत्तम वक्ता व लेखक होते, परीदर्शक, न्यू-इंडिया, वंदे मातरम, इत्यादी वृत्तपत्र त्यांनी सुरु केले. यामध्ये ते ब्रिटिशांची कटकारस्थाने लोकांपर्यंत पोहोचवत असत. त्याचबरोबर स्वातंत्र्याप्रतीची प्रेरणा तरुणांमध्ये जागवत असत. यांचीच वृत्तपत्रे वाचून पुढे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या कित्येक तरुण क्रांतिवीरांनी ब्रिटिश सत्तेला भगदाड पाडले.
हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी करून केलं, याला देखील बिपिन चंद्र पाल यांनी तीव्र विरोध केला. स्त्रियांना देखील समान वागणूक मिळाली पाहिजे याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचे दोन विवाह झाले होते त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी एका विधवेशी लग्न करून विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. त्यावेळेस असे काही करणे म्हणजे हिंदू धर्म परंपरेनुसार चुकीचे मानले जात असत, आणि यालाच त्यांनी कडाविरोध करून ब्रम्हो समाजात प्रवेश केला.
अधिक वाचा : महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती | Mahatma Gandhi information in marathi
1920 सालच्या गांधींच्या असहकार चळवळीला बिपिनचंद्र पाल यांचा काहीसा विरोध होता कारण गांधी व इतर मवाळवादी नेत्यांना पूर्ण स्वराज पेक्षा अर्धे स्वातंत्र्य सुद्धा चालणार होते. पण पूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या जहाल नेत्यांना हे कदापि मान्य नव्हतं.
1896, 1903 व 1919 अशा तीन वेळेस ते इंग्लंडला देखील जाऊन आले होते. मतभेदांमुळे त्यांनी दोन तीन वेळा इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षातून माघार देखील घेतली होती. अखेर 20 मे 1932 साली कलकत्त्यामध्ये यांचे निधन झाले.
bipin chandra pal quote |
एक उत्तम वक्ता, लेखक, आणि क्रांतिकारक बिपिन चंद्र पाल यांनी हजारो तरुणांमध्ये देशप्रेम, आणि राष्ट्रवाद जागवला होता. त्यांच्या मृत्यूपश्चात स्वातंत्र्याचा हा लढा जोमाने चालू राहण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळाली. आपले जीवन त्यांनी स्वातंत्र्य कार्यासाठी आणि देशासाठी खर्ची घातले. त्यांनी केलेल्या अनमोल कार्यासाठी आपला भारत देश सदैव त्यांचा ऋणी राहील.
अधिक वाचा : भगत सिंग माहिती मराठी | Bhagat Singh Information in Marathi
धन्यवाद 'बिपिन चंद्र पाल यांची माहिती मराठी : Bipin Chandra Pal Information in Marathi' वाचल्याबद्दल !!