आपण डिजिटल मार्केटिंग का शिकले पाहिजे? डिजिटल मार्केटिंग काय आहे? / Why do we need to learn digital marketing?
जाणून घेऊया सविस्तर!
आपण डिजिटल मार्केटिंग का शिकले पाहिजे? डिजिटल मार्केटिंग काय आहे? | कारण 2020 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार top 10 must learn skills मध्ये Digital Marketing एक आहे. हे skills विविध नोकऱ्यांच्या संधीवरून Job Opportunities ठरवले जातात.
आत्मसात करण्याहून अधिक certifications वर हल्लीच्या काळात जास्त भर दिला जातो. ज्या ठिकाणी तुमच्या Skill Set ला वाव आहे, अश्याचं ठिकाणी तुमचे skills खर्च करा त्यातून अनुभव कमावता येतो.
What is Digital Marketing? Information about Digital Marketing / डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
Digital marketing म्हणजे असा विपणनाचा मार्ग ज्याने ऑनलाइन स्वरूपात तुमचे प्रॉडक्ट्स/सुविधा ग्राहकांपर्यंत पोहचली जाते. मागच्या दशकात आणि येणाऱ्या काळात इंटरनेट वापर कर्त्यांची संख्या खूप वाढली गेली आणि वाढत जातेय.
ह्या दृष्टीने विचार केल्यास जगात लगभग प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये इंटरनेट! मग प्रत्येक ग्राहकाने खरेदी करावे यासाठी त्याच्या दारापर्यंत आपले प्रॉडक्टची वा इतर सुविधेची माहिती पोहचवणे शक्य नाही. या ठिकाणी Digital Marketing कार्य करते. मग तिथे विविध माध्यमे सुचविली जातात.
Digital Marketing मध्ये उपलब्ध असलेली माध्यमे -:
- SEO – Search Engine Optimization
- SEM – Search Engine Marketing (Display Ads)
- Content Marketing
- Email Marketing
- Local Store / Physical Store Marketing
- Mobile Apps Marketing
- Social Media Marketing etc.
यांचा वापर तुमच्या व्यवसायात कसा होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे इथे बघा.
Mistakes you should not make while learning digital marketing! डिजिटल विपणन शिकत असताना आपण चुका करू नये!
अर्धे ज्ञान - काही जण फक्त अर्धे ज्ञान घेऊन Digital Marketing मध्ये पारंगत असल्याचे दाखवतात. पण हे खूप मोठे जाळेअसल्याचे ते विसरतात, इथे मंत्र हाचं केवळ की, Keep Learning! ज्या गोष्टी शिकलात त्या implement करा. यासाठी Freelancing चा मार्ग अवलंबणे काही कठीण नाही. पण ज्या गोष्टी पूर्णतः माहीत आहेत त्यावरचं इतरांना मार्गदर्शन करावे.
Digital Marketing हे असे क्षेत्र आहे की दिवसेंदिवस ते update होतं असते. नवीन गोष्टी दिवसागणिक येत जातात आणि त्याचं वेगाने जुन्या होतात. यामध्ये शिकणे थांबवले तर Outdated चा टॅग आपल्याला लागू शकतो.
Keyword Research करतांना(Keywords चा शोध घेताना)'long tail keywords' किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून स्पर्धा कमी होईल. शिकण्याला Basic(मूलभूत)पासून Advance च्या दिशेने सुरुवात करावी.
Digital Marketing ची पहिली पायरी आणि आढावा घेण्यासाठी मी एक कोर्सची शिफारस करू इच्छितो. त्यासाठी खाली दिलेला मुद्दा तुम्हाला नक्की मदत करेल.
Digital Marketing by Google Course that I recommend /
Digital Marketing free course with certificate Registration
-: digital marketing free course from google / free digital marketing course for beginners
- सर्वात पहिले इथे Fundamentals
of digital marketing - Google Digital Garage (learndigital.withgoogle.com) क्लिक करा.
- नंतर ‘Start Course’ वर क्लिक करा.
- तुम्हाला अकाउंट तयार करावे लागेल किंवा तुम्ही थेट Gmail ने देखील रेजिस्टर करू शकता. Gmail अकाउंट ने रेजिस्टर केलेले कधीही उत्तम! यासाठी ‘Register with Google’ वर क्लिक करा.
- तुमचे Google Credentials ( ओळखपत्रे / माहिती ) प्रविष्ट करून पुढे जा.
- पुढे गेल्यावर तुम्हाला 'Email Preferences' विचारले जातील.
- 'Would you like to receive emails with tips on improving your digital skills?' कोर्सेसच्या निगडित Notifications/अधिसूचना किंवा मेल मिळविण्यासाठी 'Yes, Please' ची निवड करा. अन्यथा तुम्ही 'No Thanks' निवडा.
- 'Can our research partners occasionally contact you to get your feedback?' हे 'Feedback/अभिप्राया'च्या निगडित आहे. तुमची learning कशाप्रकारे चालली आहे किंवा इतर प्रश्न ज्यांच्या उत्तरांची विनंती तुम्ही google कडे करणार. ह्या सर्व गोष्टींच्या अभिप्रायासाठी 'Google Research Partners' तुम्हाला ईमेलद्वारे संपर्क करतील. इथेपन तुम्ही अभिप्राय/ Feedback निगडित ई-मेल हवे असल्यास ‘Yes Please’ select/निवड करा. अन्यथा तुम्ही 'No Thanks' निवडा.
- 'Do you want to receive emails about new courses or related products?' नवीन कोर्सेस च्या किंवा प्रॉडक्ट्सच्या निगडित माहिती ई-मेलद्वारे मिळविण्यासाठी इथेही 'Yes Please' Select करा किंवा 'No Please' पर्याय निवडू शकता.
- हे सर्व झाल्यावर Google च्या कोर्स निगडित 'Terms & Conditions' चेकबॉक्स वर टिक करून agree करा.
- 'Captcha' सोडवून ‘Complete’ वर क्लिक करा. इथे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
- पुढे Dashboard वर 'My Learning Plan' मध्ये तुम्हाला 'In Progress' आणि 'Completed' कोर्सेसची माहिती मिळेल.
- ‘Fundamentals of Digital Marketing’ चा कोर्स रेजिस्टर करण्यासाठी डॅशबोर्ड पॅनल वर असणाऱ्या 'Online Courses' वर क्लिक करा.
- पहिलेचं तुम्हाला ‘Fundamentals of Digital Marketing’ हा कोर्स सूचित केला जाईल. Visible किंवा उपलब्ध नसल्यास 'Categories' टॅब मध्ये ‘Digital Marketing’ हा चेकबॉक्सची निवड(Select) करा.
- 26 Modules आणि 40 तासांचा हा कोर्स सिलेक्ट करून पुढे जा.
- नवीन पेजवर आल्यानंतर ‘Start Course’ वर क्लिक करा.
ह्या 26 modules मध्ये तुम्ही काय शिकणार?
- Analytics and data insights
- Business strategy
- Content marketing
- Display advertising
- E-commerce
- Email marketing
- Local marketing
- Mobile / App Marketing
- SEM
- SEO
- Social media
- Video / Youtube ads Marketing
- Web optimization
13. हे सर्टिफिकेट तुम्ही LinkedIn सारख्या Professional / व्यावसायिक संकेतस्थळांवर Upload करू शकता.
इतर Google च्या कोर्सेस साठी खाली दिलेली Link / दुवा तुम्हाला उपयुक्त ठरेल. ही लिंक क्लिक केल्यावर काही विषय दाखवले जातील. Digital marketing free courses
ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्रे/Certificates देखील मिळतील.
Topics-:
a. Google Ads
b. Google for Education
c. Google Marketing Platform
d. Google My Business - यावर तुमच्या स्टोअरचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा. etc.
यांपैकी एखादा कोर्स निवडावा आणि प्रमाणपत्र/ Certificate Claim करावे.
आपण डिजिटल मार्केटिंग का शिकले पाहिजे? डिजिटल मार्केटिंग काय आहे?
लेख - अनिकेत कुंदे