Mpsc साठी लागणारी पुस्तके | MPSC books Marathi | mpsc book list
Mpsc साठी लागणारी पुस्तके | MPSC books Marathi | mpsc book list मित्रांनो! अलीकडे वाढती स्पर्धा यामुळे बहुतांश विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांना अत्यंत महत्त्वाचे स्थान देऊन स्पर्धा परीक्षा करण्याच्या हेतूने आणि सरकारी नोकरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने एम पी एस सी परीक्षा देण्यासाठी उतरतात.
परंतु नवीन अभ्यास चालू केलेले विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी करायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना एमपीएससी करण्यासाठी कोणती पुस्तके वाचावी किंवा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा हे माहिती नसते. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही एमपीएससी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन सोबतच MPSC साठी लागणारी पुस्तकांची यादी घेऊन आलोत. mpsc syllabus in marathi
Mpsc साठी लागणारी पुस्तके | MPSC books Marathi | MPSC Book List |
Mpsc साठी लागणारी पुस्तके | MPSC book Marathi | MPSC Book List | books for mpsc in marathi | mpsc books name :
महाराष्ट्र राज्याच्या वतीने एमपीएससी हे घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. एमपीएससी परीक्षा मुख्यता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. mpsc book list in marathi
- Prelim Exam ( पूर्व परीक्षा)
- Mains ( मुख्य परीक्षा)
- मुलाखत
1. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची यादी:
Mpsc पूर्व परीक्षा मध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर 1 मध्ये एकूण सात विषय असतात. त्यामध्ये मुख्यता इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडींचा समावेश होतो.
वरील सर्व विषयांमध्ये Mpsc पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास करणारी पुस्तके पुढील प्रमाणे;
इतिहास :
- इयत्ता पाचवी, आठवी आणि अकरावी इतिहास विषयाची महाराष्ट्र राज्य शासनाचे पाठ्यपुस्तके
- प्राचीन व मध्ययुगीन भारत- ज्ञानदीप/ के. सागर (k sagar mpsc books)
- आधुनिक भारत
- महाराष्ट्राचा समग्र इतिहास
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स
- तात्याचा ठोकळा
भूगोल :
- इयत्ता पाचवी ते बारावी महाराष्ट्र शासनाची भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
- भारताचा भूगोल- मजीद हुसेन/ भागीरथ (Bhagirath publication mpsc books)
- महाराष्ट्राचा भूगोल- दीपस्तंभ/ ए बी सौदी
- जगाचा भूगोल- मजीद हुसेन
- Geography through maps- k. Siddharth
राज्यशास्त्र :
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत आणि तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना भाग- 1 आणि भाग -2
- पंचायत राज- के सागर
- राज्यशास्त्र -रंजन कोळंबे (ranjan kolambe books)
अर्थशास्त्र :
- महाराष्ट्र राज्याचे अकरावी बारावी चे अर्थशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तक
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र
पर्यावरण :
- अकरावी, बारावी पाठ्यपुस्तके
- पर्यावरण व जैवविविधता- तुषार घोरपडे (Tushar Ghorpade )
- विज्ञान सामान्य विज्ञान
चालू घडामोडी / current affiars mpsc marathi :
- news paper- लोकसत्ता/ महाराष्ट्र टाईम्स
- मासिक/ months- पृथ्वी परिक्रमा
- वार्षिक- सकाळ वार्षिक
CSAT :
- CSAT उतारे
- गणित आणि बुद्धिमत्ता
- Mains ( मुख्य परीक्षा):
2. राज्यसेवा मुख्य परीक्षेला आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची यादी/mpsc mains book list:
Mpsc या परीक्षेचा दुसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे मुख्यपरीक्षा जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात तेच विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मुख्य परीक्षा मध्ये योग्य त्या उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.
सामान्य अध्ययन एक -इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- भूगोल- एच.के डोईफोडे
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए.बी सवदी
- कृषी व भूगोल- ए बी सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
सामान्य अध्ययन 2- भारतीय संविधान व भारतीय राजकारण कायदा
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
- भारतीय राज्यपद्धती
- पंचायत राज -किशोर लवटे
- महाराष्ट्र राज्य बोर्ड पुस्तके अकरावी आणि बारावी
सामान्य अध्ययन 3- मानव संसाधन व मानवी हक्क
- मानव संसाधन विकास- रंजन कोळंबे
- Development भाग 2- किरण देसले दीपस्तंभ
- युनिक मानव संसाधन विकास
- मानव अधिकार- NBT प्रकाश
सामान्य अध्ययन 4- अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थव्यवस्था आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- विज्ञान घटक
- विज्ञान तंत्रज्ञान -के सागर
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 1- दीपस्तंभ प्रकाशन (Deepstambh Publication)
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
धन्यवाद!