नमस्कार मित्रांनो,
बातमी लेखन | बातमी लेखन कसे करावे? News Writing in Marathi आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बातमी लेखन विषयी माहिती देणार आहोत. बातमी लेखन म्हणजे काय? बातमी लेखनाचे प्रकार कोणते? बातमी लेखन कसे करावे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच लेखामध्ये मिळतील.
सर्वप्रथम बातमी लेखन (बातमी लेखन मराठी ) म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. baatmi lekhan in marathi
News-Writing |
बातमी लेखन म्हणजे काय?
मित्रांनो बातमी लेखन म्हणजे याच्या नावातच आपल्याला समजतं की बातमीचे केलेले लेखन. दैनंदिन दिवसात आपण रोज वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील बातम्या वाचत असतो किंवा टीव्हीवर ऐकत असतो. मित्रांनो जेव्हा या बातम्यांचं लिखाण केलं जातं त्यालाच “ बातमी लेखन " असे म्हणतात. बातम्या ऐकणं किंवा वाचणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि यामुळेच बातमी लेखन करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
बातमी लेखनाचे प्रकार कोणते?
batmi lekhan in marathi
बातमी लेखन हे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्रकारांवर केलं जातं. उदाहरणार्थ :- राजकीय, सामाजिक,वांग्मयीन, क्रीडा, कला, शालेय, वैद्यकीय, इत्यादी.
महाराष्ट्र मध्ये इयत्ता दहावी साठी मराठी भाषेच्या पेपरमध्ये, बातमी लेखन हे उपयोजित लेखनया विभागाच्या अंतर्गत येते. 60-80 शब्दांमध्ये बातमी लेखन करावे लागते, व त्यासाठी 6 गुण दिले जातात. तुम्हाला जर पेपर मध्ये बातमी लेखनात सहा पैकी सहा गुण हवे असतील तर पुढील मुद्यांचा काळजीपूर्वक विचार करावा. इयत्ता दहावी बातमी लेखन
1) व्याकरणाची जाण असणे गरजेचे आहे.
2) भाषा साधी सरळ सोपी असावी.
3) बातमी भूतकाळात लिहिणे गरजेचे आहे.
4) वाक्याची रचना व मांडणी साधी आणि समजण्यास सोपी असावी.
5) बातमी लेखानामध्ये स्वतःचे मत मांडण्याची आवश्यकता नसते.
6) अचूक शब्दांमध्ये जेवण्यात तेवढी बातमी लिहून पूर्ण करावी.
NEWS-Truth |
बातमी लेखन करण्यासाठी पुढील निकष देखील महत्त्वाचे ठरतात:-
1) बातमीचे शीर्षक :-
बातमीचा आरसा हा त्याचे शीर्षक असतो. बरेच वाचक शीर्षकावरून बातमी पुढे वाचायची की नाही हे ठरवत असतात. त्यामुळे कमीत कमी शब्दात बातमीची कल्पना शीर्षकामध्ये असावी लागते. त्यामुळे बातमीचे शीर्षक योग्य लिहिणे गरजेचे आहे.
उदा.
1) पावसासोबत गारठा वाढणार राज्यात थंडीची लाट येणार.
2) राज्याच्या काही जिल्ह्यात शाळा सुरू !! विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.
2) बातमीदाराची माहिती :-
बातमीदाराची माहिती म्हणजे बातमी कोणी दिली? तुम्ही जी माहिती लिहित आहात ती माहिती तुम्हाला कोणाकडून मिळाली याचा स्पष्ट उल्लेख बातमी लेखनामध्ये हा असावा लागतो. तुमचा वार्ताहर, प्रतिनिधी, किंवा इतर कोणत्या माध्यमातून तुमच्या पर्यंत बातमी आली असेल तर ते लिहिणे गरजेचे असते.
3) स्थळ, दिनांक, कालावधी, संबंधित व्यक्ती :-
तुम्ही लिहीत असलेल्या बातमीमध्ये, घडलेल्या बातमीचे स्थळ घडलेल्या दिवशीचा दिनांक आणि त्यावेळेचा कालावधी हे नमूद करणे महत्वाचे असते. त्याचबरोबर ही सर्व माहिती अचूक असणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
4) मुख्य बातमी :-
बातमी बद्दल थोडीफार माहिती दिल्यानंतर मूळ बातमीकडे वळावे. मूळ बातमीबद्दल योग्य शब्दात वाक्यांची अचूक मांडणी करावी त्याचबरोबर जास्त फापटपसारा लिहीत बसू नये, जेणेकरून बातमीची विश्वासार्हता कमी होऊन जाईल.
5) तपशील :-
बातमीचा तपशील हा मूळ बातमीला अनुसरूनच असावा.
6) बातमी कशासाठी आहे?:-
बातमी कोठे घडली? कधी घडली? केव्हा घडली? कशी घडली ? त्याचबरोबर त्यावेळेस कोण उपस्थित होते? अशी महत्वाची अनेक माहिती बातमीमध्ये समाविष्ट असली पाहिजे.
NewsPaper |
आता परीक्षेमध्ये तुम्हाला पुढील प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो.
प्रश्न :- खालील विषयावर बातमी तयार करा.
1) बातमी लेखन तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा?
उत्तर :-
दी. दा. उर्फ डॉक्टर बाबासाहेब देशपांडे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
मुंबई, २७ जानेवारी २०२२.
आमच्या प्रतिनिधीकडून,
D. S. Highschool विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शाळेच्या मुख्य हॉलमध्ये देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. खूप उत्साहाने विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली होती. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील हजेरी लावली होती. वंदे मातरम, भारत माता की जय, अशाच जयघोषानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
प्रभात फेरी पूर्ण झाल्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार होता. व यासाठी तळमजल्यावरील एक उंच स्तंभ सजविण्यात आला होता. झेंडा वंदनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री “ वामन महाडिक सर " उपस्थित होते. सात वाजून 30 मिनिटांनी त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि मान्यवरांनी झेंड्याला सलामी दिली, व जन -गण- मण - हे राष्ट्रगान गाण्यात आले. यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांनी देशप्रेम या विषयांवर भाषणे दिली. या नंतर शाळेचे मुख्याध्यापक वामन महाडिक सर व प्रमुख पाहुण्यांचे देखील भाषण झाले. या सर्व कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
झेंडावंदनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला व अशाप्रकारे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सांगता झाली.
प्रश्न :- खालील विषयावर बातमी लेखन करा.
2) शहराच्या प्रदूषण पातळी मध्ये झालेली वाढ.
वरील विषयावर लिहिलेले बातमी लेखन बघून तुम्ही या विषयावर बातमी लेखन लिहिण्याचा प्रयत्न करावा. इतरही कुठल्या विषयावर लिहून तुम्ही खात्री करू शकता जसे की स्वातंत्र्य दिन, क्रिडा, हवामान निगडीत! इ.
तर मित्रांनो वरील उदाहरणावरून आपल्याला लक्षात आले असेल की मराठी मध्ये बातमी लेखन कसे करावे. 60-80 शब्दांमध्ये अचूक बातमी लेखन करून तुम्ही परीक्षेमध्ये या प्रश्नात पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता. आम्ही आशा करतो हा लेख तुम्हाला आवडला असेल.
धन्यवाद 'बातमी लेखन | बातमी लेखन कसे करावे? News Writing in Marathi' वाचल्याबद्दल !!