योगासने प्रकार व फायदे मराठी | योगाचे प्रकार | yoga marathi
नमस्कार मित्रांनो,
सदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी, मानवी शरीराला व्यायामाबरोबरच योगासने करणे देखील महत्त्वाचे आहे. योगासने केल्याने आपले तन मन स्थिर राहते, आणि आपल्याला दीर्घायुष्य देखील लाभते. योग हे आपल्या प्राचीन संत आणि ऋषी मुनी यांनी मानवतेला दिलेली एक अमूल्य देणगीचं आहे.
आजच्या या आर्टिकल मध्ये आपण, विविध योगासनांचे प्रकार व त्यांचे फायदे जाणून घेणार आहोत!
योगासनांची नावे व फायदे | yoga types in marathi| योगासने प्रकार मराठी माहिती
1) ताडासन : -
ताड या वृक्षावरून या आसनाला ताडासन असे नाव पडले. तुमच्या दोन्ही पायांच्या मध्ये अर्धा फुटाचे अंतर ठेवून, सरळ उभे राहून, दोन्ही हात एकमेकांत अडकवून, शरीर वरच्या बाजूस खेचावे, अशा प्रकारे हे आसन केले जाते. हे आसन केल्यामुळे शरीरातील पेशींवर ताण येऊन त्या लवचिक बनण्यास मदत होते. ताडासन केल्यामुळे तुम्ही इतर योगासने अगदी सहजपणे करू शकता. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी देखील तुम्ही हे आसन करू शकता.
2) पद्मासन :-
पद्मासन हा योगासनांनमधील एक अतिशय सोपा त्याचबरोबर प्रमुख प्रकार मानला जातो. पाय एकावर एक ठेवून मांडी घालून, पाठीचा कणा ताठ ठेवून हे आसन केले जाते. ध्यानधारणा म्हणजेच मेडीटेशन करण्यासाठी हे आसन सर्वोत्तम मानले गेले आहे. हे आसन केल्यामुळे शरीरातील कार्याची गती मंदावते, वं ध्यान करण्यास मदत होते. हे आसन केल्यामुळे मानसिक शांती, एकाग्रता त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढते.
अधिक वाचा : नकारात्मकता ते सकारात्मकतेकडे प्रवास कसा करावा? | Negativity to Positivity in Marathi
3) वज्रासन :-
वज्रासन हेदेखील एक अतिशय सोपे त्याचबरोबर लाभदायी आसन आहे. वज्रासन केल्यामुळे आपली पाचनशक्ती उत्तम कार्य करते. मुख्यतः हे आसन जेवण केल्यानंतर केले जाते. हे आसन केल्यामुळे कंबर दुखी देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते.
अधिक वाचा : नालंदा विद्यापीठ माहिती मराठी
4) मार्जरी आसन :-
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपले गुडघे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकवून, मांजर ज्याप्रमाणे उभी राहते त्याप्रमाणे उभे रहा, या नंतर श्वास हळू हळू बाहेर सोडत तुमची हनुवटी छातीकडे घेऊन जा, या नंतर पाठीची कमान करा, या स्थितीत काही काळ राहून तुम्ही पूर्वस्थितीत यायचे आहे. अशाप्रकारे हे आसन केले जाते.
पोटावरील अतिरिक्त चरबी करण्यास हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. हे आसन दैनंदिन केल्यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ व लवचिक राहतो, त्याचबरोबर पचन क्रिया देखील सुधारते.
अधिक वाचा : Start living a better life | How to start making changes in your life in Marathi?
5) हलासन :-
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपून तुमचे दोन्ही हात बाजूला ठेवावेत, आता तुमचे दोन्ही पाय हवेमध्ये उचलून हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन जा, तुमचे पाय जमिनीला स्पर्श करेपर्यंत, पाय खाली घेऊन जावेत व हे करत असताना दोन्ही हातांनी पाठीला आधार द्यावा. हे असे एक काही काळ करून तुम्हाला पूर्वस्थितीत यायचे आहे.
हे आसन केल्यामुळे तुमची पचन क्रिया सुधारते, थायरॉईड ग्रंथी उत्तमरीत्या कार्य करतात, त्याचबरोबर हे आसन नियमितपणे केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर या आसनाचा प्रयोग करू नये.
6) त्रिकोणासन :-
हे आसन करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या दोन्ही पायांमध्ये दोन ते तीन फुटांचे अंतर ठेवा, दोन्ही हात खांद्यांना सरळ रेषेत ठेवून, आपला एक हात हवेत उचला व दुसऱ्या हाताने जमिनीला स्पर्श करा, हात जमिनीकडे नेताना श्वास बाहेर सोडायचा आहे तर मूळ स्थितीत परत येताना श्वास आत मध्ये घ्यायचा आहे. पूर्वस्थितीत आल्यानंतर हीच क्रिया दुसऱ्या बाजूला देखील करा.
या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे आपले शरीर बळकट व लवचिक बनते. लठ्ठपणा दूर करण्यास हे आसन जास्त उपयुक्त ठरते.
पाठ दुखी,मान दुखी, लो बीपी, हाय बीपी, किंवा मायग्रेन चा त्रास असल्यास हे आसन करणे टाळावे.
7) धनुरासन :-
हे आसन करण्यासाठी प्रथम पोटावर झोपावे, त्यानंतर दोन्ही हात बाजूला ठेऊन, तुमचे पाय गुडघ्यातून वाकवून वरती उचलावेत, आता दोन्ही हात आणि तुमचे दोन्ही पाय धरावे, श्वास घेत तुमची छाती वं मान वरच्या दिशेला उचलावी, तुमचे दोन्ही पाय कमरे जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. या अवस्थेत तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे दिसते, आणि म्हणूनच याला धनुरासन म्हटले जाते. यानंतर हळूहळू श्वास सोडत पूर्वावस्थेत परत यावे.
हे आसन केल्यामुळे, हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात, पाठीचा कणा लवचिक होतो, मानेला व खांद्यांना व्यायाम मिळतो. गर्भवती महिला, हाय बीपी, लो बीपी पेशन्ट, या सर्वांनी हे आसन करू नये. त्याचबरोबर ज्यांना मान-दुखी,खांदे-दुखी इत्यादीचा त्रास असेल त्यांनी देखील हे आसन करणे कटाक्षाने टाळावे.
8) शीर्षासन :-
शीर म्हणजेच डोके, आणि डोक्या सोबत केले जाणारे आसन म्हणूनच यास शीर्षासन असे संबोधले जाते. शीर्षासन करण्याचे एका पेक्षा एक अद्भुत फायदे आपल्या शरीराला मिळतात. शीर्षासन केल्यामुळे आपल्या मेंदूला वं डोक्याजवळील भागास उत्तम रक्तपुरवठा होऊन याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.
शीर्षासन केल्यामुळे, केसांची समस्या नाहीशी होते, तुमचे केस गळणे कमी होऊन घनदाट बनतात. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो, वं हे आसन केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास खूप मदत होते. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी देखील हे आसन फायदेशीर ठरते.
सुरुवातीला हे आसन करण्यासाठी तुम्ही घरातील भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता, या नंतर हळू-हळू तुम्ही भिंतीच्या मदतीशिवाय हे आसन करू शकता. हाय बीपी, लो बीपी, गर्भवती महिला, वं कोणतीही सर्जरी झालेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
9) वृक्षासन :-
या योग प्रकारात शरीराला वृक्षाच्या आकारात आणले जाते म्हणून वृक्षासन म्हणतात.
हे आसन करणे खूप सोप्पे आहे, एकदम दोन्ही पाय जुळवून आणि हात बाजूला सोडून, सामान्य असे उभे राहा. मान सरळ ठेवून समोरच्या दिशेला बघत राहा.
डावा पाय उचलून त्याचा तळपाय उजव्या पायच्या जांघेत, जेवढा वर शक्य होईल आणि तिथे ठेवा. नंतर पूरक प्रक्रिया करत हळुवारपणे दोन्ही डोक्याच्या दिशेने न्या, डोक्यावर गेल्यावर दोन्ही हातांचे तळहात एकमेकांना चिकटू द्या. तोवर उजव्या पायावर संतुलन करून ठेवा.
हळूहळू शरीर सैल सोडून रेचक श्वसनाची प्रक्रिया करत अगदी सुरुवातीच्या अवस्थेत पुन्हा या.
ह्या आसनाने एकाग्रता वाढून स्नायू आणि मज्जासंस्था ताळमेळ सुधारतो.
तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण विविध योगासनांचे प्रकार आणि त्यांचे फायदे जाणून घेतले. योगासने ही मानवी शरीराची गरज आहे. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला..? हे कॉमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.
"योगासने प्रकार व फायदे मराठी | योगाचे प्रकार | yoga marathi" वाचल्याबद्दल धन्यवाद !!