गेल्या काही वर्षांत लोकांची मराठी सिनेमाकडे पाठ फिरवण्यामागची ५ कारणे | मराठी सिनेमा अपयशाची कारणे
-:
मागील काही वर्षांत अनेक मराठी सिनेमे हिट/सुपरहिट/ब्लॉकबस्टर ठरले. सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, धर्मवीर, वेड, बाईपन भारी देवा इत्यादी चित्रपटांनी तर राज्यभर थिएटरमध्ये राज्य केले. अनेक हिंदी सिनेमेही थिएटरमधून उतरवले गेले. पण हिट होण्याच्या ते त्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या एकूण चित्रपटांचा ratio काही औरंच सांगतो.
१ अथवा २ जास्तीत जास्त ४-५ वर्षभरात केवळ इतकेच मराठी चित्रपट का हिट, सुपरहिट किंबहुना ब्लॉकबस्टर कॅटेगरीमध्ये स्थान मिळवतात. इतर चित्रपट थिएटरमध्ये जागा मिळवायला धडपडतात तर काहींकडे प्रेक्षक पाठ फिरवतात.
तर ह्यामागची काही कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू, मराठी चित्रपट समीक्षक संदेश वहाने ह्यांच्या निरीक्षणातून!
1. मराठी सिनेसृष्टीतील लोकांचे आपापसातील मतभेद :
इंडस्ट्री ग्रुपमध्ये विभागली गेली आहे, फक्त सिनेमाच्या प्रीमियरलाचं ते एकत्र दिसतात. पण रिऍलिटी disappoint करणारी आहे, सिनेमांचे clash ( एकाचं दिवशी एक किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होणे) , एकाच particular अभिनेत्याला वारंवार कास्ट करणं, एकाच म्युजिक डायरेक्टरची गाणी, डायव्हर्सिटी वाईज फ्लेक्सिबल नसणं या बेसिक गोष्टी खूप सहजपणे आयडेंटिफाय होतात
ज्यामुळे लोक सिरियसली घेणं बंद करून टाकतात.
2. Inexperienced, Greediness कमी अनुभव
लव्ह स्टोरी, बी ग्रेड मुव्हीज यांचं inbalance आणि ओव्हरडोस, मार्केटिंगचं अपूर्ण ज्ञान, सिनेमाच्या नावाखाली सबसिडीच्या माध्यमातून स्वतःच घर भरण्याची मानसिकता, स्क्रिप्टची डिमांड नसताना प्रदेशात शूट आणि सबसिडीच्या पैशातून फॅमिली ट्रिप सॉरी फॅमिली ट्रीपच्या मध्ये थोडंफार शूट !
गेल्या काही वर्षांत लोकांची मराठी सिनेमाकडे पाठ फिरवण्यामागची ५ कारणे
3. लोकांमधला सायकॉलॉजिकल ड्रास्टीक चेंज -
आता फक्त बॉलीवूड हॉलिवूड हा प्रेक्षकांचा प्रांत नाहीये, तर तो पूर्ण ३६० डिग्री explore करतोय, १०-१५ वर्षाआधीची ब्लॉकबस्टर स्टोरी आजच्या डेट मध्ये ऍव्हरेज कन्सीडर होते. हि सिम्पल गोष्ट मॅक्सिमम मेकर्स ला realise होत नाही.
मेलोड्रामा, इमोशन कार्ड फेकून लोकांचं अटेन्शन grab करणं हे आता इतिहासजमा झालंय, आजच्या डेट मध्ये content हाचं किंग आहे.
हे देखील वाचा -: माहिती अधिकार कायदा विषयी माहिती
4. Creatively Disorganise -
त्याच त्याच रटाळ कथांचा वापर, केविलवाणी रायटिंग, साधारण सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शकाचं व्हिजन क्लिअर नसल्यावर निघून येणार गचाड आउटपुट यासर्वात चांगला कलाकार असला तरीसुद्धा सिंगल हँडेडली survive करणं खूप कठीण असत, त्यातल्या त्यात जर फर्स्ट टायमर असेल तर क्रिटिसिजम व्यतिरिक्त दुसरं काही हाती लागत नाही.
गेल्या काही वर्षांत लोकांची मराठी सिनेमाकडे पाठ फिरवण्यामागची ५ कारणे
5. यशस्वी कलाकृतीच्या सावलीमागे धावणे
प्रत्येक जॉनर(Genre) मध्ये तुम्हाला याची उदाहरण बघायला मिळतील. पण मेकर्स विसरतात कि सक्सेसफुल स्टोरीचा जन्म एका दिवसात होत नाही. त्यामागे creative माईंडसेट असतो जो कॉपी करण्याच्या अट्टहासात compromise होऊन जातो.
धन्यवाद "गेल्या काही वर्षांत लोकांची मराठी सिनेमाकडे पाठ फिरवण्यामागची ५ कारणे - संदेश वहाने" वाचल्याबद्दल !!