Rich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश नमस्कार मित्रांनो, हजारो वर्षांपासून पुस्तके मानवी जीवनाची अविभाज्य घटक आहेत. पुस्तके ही बऱ्याच प्रकारची असतात. कोणी प्रवासवर्णन लिहितो तर कोणी स्वानुभव. कोणी ऐतिहासिक पुस्तके लिहितो तर कोणी अध्यात्मिक. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याचा जवळपास बारा भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. या पुस्तकाने एक दोन नाही तर लाखो लोकांना त्यांचा पैशाप्रती असलेला Mindset बदलण्यासाठी मदत केली आहे.
मित्रांनो त्या पुस्तकाचे नाव आहे “ रिच डॅड पुअर डॅड " ( rich dad poor dad in marathi ). रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या या इंग्रजी पुस्तकाची आपण आज मराठी मध्ये Summary जाणून घेणार आहोत.
तसं पाहायला गेलं तर सर्वांच्या आयुष्यामध्ये एकच डॅड( वडील )असतात. पण लेखकाच्या आयुष्यामध्ये 2 डॅड होते. एक म्हणजे त्यांच्या स्वतःचे वडील तर दुसरे म्हणजे त्यांचा मित्र Mike याचे वडील. स्वतःच्या वडिलांना ते पुअर डॅड म्हणायचे तर मित्राच्या वडिलांना रिच डॅड.
Rich Dad Poor Dad marathi summary | Rich dad poor dad summary in marathi
पुअर डॅड हे खूप जास्त शिकलेले पीएचडी झालेले होते, तर या उलट रिच डॅड हे फक्त आठवी पास होते. पण पुअर डॅड एवढे शिकलेले असून सुद्धा आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे, त्यांना नेहमी पैशाची तंगी जाणवत असे. याउलट फक्त आठवी पास असलेले रिच डॅड त्यांच्या आर्थिक ज्ञानाच्या जोरावर शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती होती.
अधिक वाचा : कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | Power of Attorney meaning in marathi
रॉबर्ट यांच्या संपूर्ण जीवनामध्ये रिच डॅड त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर श्रीमंत होण्याबद्दल, पैशाबद्दल 6 अशा गोष्टी सांगतात, ज्या त्यांना स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आणि सदैव श्रीमंत राहण्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरतात. Robert Kiyosaki's Book Rich Dad Poor Dad summary in marathi
भाग 1 :- Rich don't work for money, Money work for them.
याचा असा अर्थ होतो की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही तर त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात. रॉबर्ट यांचे रिच डॅड रॉबर्टला सांगतात की या दुनियेमधील बरीच लोकं एकाच circle मध्ये अडकून पडलेली आहेत. ज्याला रिच डॅड Rat Race बोलतात. श्रीमंत होण्यापेक्षा, जगातील बऱ्याचशा लोकांचे स्वप्न फक्त चांगल्या विद्यापीठात शिक्षण घेणे, त्यानंतर चांगली नोकरी बघणे व आयुष्यभर कार, आणि घराचे कर्ज फेडत राहणे हेच आहे.
बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अंदाज नसतो की या Rat Race मध्ये ते सर्वात जास्त मेहनत करत असतात, आणि या गोष्टीचा फायदा दुसऱ्याच कोणालातरी होत असतो. खरेतर या Rat Race चा हिस्सा होत बरेच लोक नाखूष असतात पण मनातील भीती, लालच आणी मजबुरी मुळे त्यांना या Rat Race मध्ये अडकून राहावे लागते.
रिच डॅड म्हणतात की लोकांनी आपल्या मनातील भीती घालवून सर्वप्रथम या रॅट रेस मधून बाहेर निघायला हवं. आणि त्यानंतर असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून तुम्ही पैशांसाठी नव्हे तर पैसे तुमच्यासाठी काम करतील.
अधिक वाचा : शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market information in marathi
भाग 2 :- Keeping money is more Important than making it.
तुम्ही असे बरेच सेलिब्रिटी, श्रीमंत माणसे बघितली असतील जी त्यांच्या तरुणपणात अत्यंत श्रीमंत होती पण हळू हळू अगदी गरीब होऊन नंतर भिकेला लागली. तर लोक असे श्रीमंत होऊन परत गरीब कसे होतात तर ते केवळ आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे. रिच डॅड म्हणतात की केवळ पैसे कमावणे महत्त्वाचे नाही तर पैसे मेन्टेन करणे व वाढवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. संपूर्ण दुनियेमध्ये लोकांना घर हे asset वाटते, तर रिच डॅड यांना ते liability वाटते कारण, लोक आयुष्यभर घर घेऊन त्याचे कर्ज फेडत बसतात, आणि या गोष्टीमुळे त्यांच्याकडे पैसे राहत नाहीत. रिच डॅड फक्त त्याच गोष्टींना Asset मानतात ज्या त्यांना घरबसल्या पैसे कमावून देतात.
अधिक वाचा : स्टीव जॉब्स यांची माहिती | Steve Jobs Biography in Marathi
भाग 3 :- Get in your business along with your job
जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात त्याच्या आवडीचा जॉब मिळाला, तर ती व्यक्ती आनंदाने आपलं सर्व आयुष्य तो जॉब करण्यासाठी व्यतीत करते. पण रिच डॅड म्हणतात की जगातील कोणताही व्यक्ती स्वतःचा जॉब करत इतरही दुसरे काम करू शकतो व स्वतःचे बिजनेस एम्पायर उभे करून त्याचा राजा होऊ शकतो. आता या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण या जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन कंपनी असलेली मॅकडॉनल्ड्स चे मालक रे क्रॉक यांचे उदाहरण पाहू. आपल्यातील कोणालाही जर विचारले की मॅकडॉनल्ड्स कंपनीचे मुख्य इनकम स्त्रोत काय आहे, तर सर्वजण फास्टफूड विकणे हेच मुख्य Income source आहे असे म्हणतील. पण असे कदापि नाही तर रे क्रॉक यांचे मुख्य इन्कम सोर्स हे Real Estate आहे. मॅकडॉनल्ड्स कंपनीची जाळे पसरवत असताना त्यांनी रिअल इस्टेट चे सर्वात मोठे Empire उभे केले आहे, जे त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनवतात.
अगदी अशाच रीतीने कोणताही सामान्य व्यक्ती Asset मध्ये गुंतवणूक करून किंवा आपला जॉब न सोडता इतर इन्कम सोर्स निर्माण करून श्रीमंत होऊ शकतो. आणि याची उदाहरणे लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, जसे की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे, उद्योगधंदा चालू करणे, इ.
अधिक वाचा : ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi - माहिती !!
भाग 4 :- Taxes are only for middle class and poor.
Tax संकल्पना सुरुवातीला जेव्हा आली त्यावेळेस फक्त श्रीमंत लोकांवरच कर लावला जायचा व तो मिळालेला पैसा गरिबांच्या सुखसोयींनी साठी खर्च केला जायचा. पण नंतर नंतर Tax हा मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास लोकांवर देखील लावू लागला. आणि आज जर बघायला गेलं तर श्रीमंतांपेक्षा सगळ्यात जास्त टॅक्स हा मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास लोकांकडूनच भरण्यात येतो. याउलट श्रीमंत लोकांनी आपले डोके चालवून टॅक्स वाचवण्यासाठी बऱ्याच पळवाटा शोधून काढलेल्या आहेत.
भाग 5 :- The Rich, Invent money
श्रीमंत, पैशाचा शोध लावतात.
जर भारताबद्दल बोलायचं झालं तर धीरूभाई अंबानी, शिव नदार, अजीम प्रेमजी, ही अशी नावं आहेत ज्यांनी खरे तर पैशाचा शोध लावला आहे. कारण ही लोकं ती गोष्ट या देशात प्रथम घेऊन आले जी आधी कोणीही आणली नव्हती. त्याचबरोबर एक अशी आयडिया कल्पना या लोकांनी साक्षात सत्यात उतरवली याचा विचार याआधी कोणीही केला नसेल. या लोकांनी स्वतः संधी निर्माण करून, त्या संधीचं सोनं केलं. आणि म्हणूनच या लोकांबद्दल असे म्हटले जाते की या लोकांनी पैशाचा शोध लावलेला आहे. याच प्रकारे इतर लोकांनी सुद्धा केवळ पैसे कमावण्याचा विचार न करता पैशाचा शोध कसा लावता येईल असा विचार करावा.
भाग 6 :- Rich Learns all the time and know how to sell their ideas.
श्रीमंत संपूर्ण वेळ शिकतात आणि कल्पना कशा विकायच्या हे जाणून घेतात.
वरील ओळीचा अर्थ असा होतो की श्रीमंत लोक हे नेहमी शिकत असतात व स्वतःच्या कल्पना या मोठ्या स्तरावर कशा घेऊन जायच्या असतात हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. आज मॅक्डोनल्ड पेक्षा कमी किमतीत बरेच लोक त्यांच्याहून चांगला बर्गर विकतात, पण स्वतःची आयडिया ही मोठ्या स्तरावर कशी घेऊन जाता येईल हे माहित नसल्या कारणाने ते अगदी लिमिटेड कॉन्टिटी बर्गर विकू शकतात. शेवटच्या या भागामध्ये लेखक सांगतात की श्रीमंत लोक नेहमी शिकण्यावर व नवीन-नवीन स्किल्स शिकण्यावर भर देत असतात, व आपली आयडिया मोठ्या स्तरावर कशी विकली जाते हे त्यांना ठाऊक असते. तसेच इतर लोकांनी सुद्धा नवीन नवीन स्किल्स शिकण्यावर नेहमी भर द्यावा असे त्यांनी सांगितले आहे.
आम्ही अशी आशा करतो की, रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाची मराठी summary | Rich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद !!