अझीम प्रेमजी मराठी माहिती | Azim Premji biography in Marathi | Azim premji information in marathi
" जर लोक तुमच्या लक्ष्यावर हसत नसतील तर नक्कीच तुमची ध्येय ही छोटी आहेत!!"
--- अझीम प्रेमजी
अझीम प्रेमजी मराठी माहिती | Azim Premji biography in Marathi नमस्कार लोकहो...
स्वतःच्या वडिलांच्या छोट्याशा तेल आणि साबणाच्या दुकानाला ज्यांनी आज स्वतःच्या मेहनतीने कष्टाने एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की आज त्या कंपनीमध्ये जवळपास एक लाख पन्नास हजार पेक्षा अधिक लोक काम करत आहेत, 1 लाख 14 हजार 400 करोड संपत्तीचे मालक असलेले, भारताचे बिल गेट्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जेवढे धनी तेवढेच दानी असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच विप्रो ( Wipro ) कंपनीचे मालक " अझीम प्रेमजी " यांच्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Azim premji birth and childhood | अझीम प्रेमजी जन्म आणि बालपण
अझीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईमध्ये एका शिया मुस्लीम घराण्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद हाशीम प्रेमजी असं होतं. त्यांचे वडील खाण्याचे तेल व साबण विकायचा व्यवसाय करायचे. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री ह्या डॉक्टर होत्या. 29 डिसेंबर 1945 रोजी महाराष्ट्रातल्या आमळनेर, जळगाव मध्ये त्यांनी Western India vegetables Product म्हणजेच विप्रो ( WIPRO ) ची स्थापना केली. अझीम यांचा जन्म झाल्यानंतर दोनच वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात हिंसक,धार्मिक दंगली भारतामध्ये होत होत्या आणि अशा वेळेसच पाकिस्तानचे संस्थापक " मोहम्मद अली जिना " यांनी अझीम प्रेमजी यांच्या वडिलांना पाकिस्तान मध्ये येऊन त्यांचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला, पण हाशिम प्रेमजी यांनी हा सल्ला धुडकावून लावला व भारतामध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
Azim premji Education | अझीम प्रेमजी यांचे शिक्षण
अझीम लहानपणापासूनच अत्यंत शांत स्वभावाचे होते, त्यांनी त्यांचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी हायस्कूल मुंबई येथून केले. अझीम प्रेमजी यांच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने अमेरीकेमधून शिकून भारतामध्ये आपला व्यवसाय पुढे वाढवावा. आणि झालं सुद्धा असंच हाशिम प्रेमजी यांनी आपल्या मुलाला अमेरिकेमध्ये शिकायला पाठवले.
अधिक वाचा : उद्योजकांचा जन्म - धीरूभाई अंबानी | Entrepreneur born - Dhirubhai Ambani
खाद्यतेल आणि साबण बनविणार्या वडिलांच्या कंपनीला अझीम यांनी अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये प्रामुख्याने बेकरी प्रोडक्ट, विविध पेये, लहान मुलांना लागणाऱ्या गोष्टी, केसांसाठी उपयुक्त असणारे साबण, घरगुती वापरले जाणारे साहित्य, इलेक्ट्रिकल साहित्य, यांचा समावेश त्यांनी केला. आणि पुढे 1977 मध्ये कंपनीचे नाव बदलून विप्रो प्रोडक्ट्स लिमिटेड असे ठेवण्यात आले.
जेव्हा IBM कंपनीवर भारतीय सरकारने बंदी आणली, त्यावेळेसच IT क्षेत्रातील सुवर्ण संधी लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. 1980 साली अमेरिकन कंपनी सेंटिनल कम्प्यूटर कॉर्पोरेशन सोबत हातमिळवणी करून सुरुवातीला विप्रोने छोटे कंप्युटर बनवायला सुरुवात केली. याच वर्षी बंगळूर मध्ये त्यांनी IT सर्विसेस ची स्थापना केली, बघता बघता त्यांच्या या व्यवसायाने एक नवीन उंची भारतामध्ये गाठली. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे विप्रो कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली. आणि यामुळेच 1999 ते 2005 पर्यंत अझीम हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बनले होते.
महाराष्ट्रातील जळगावमध्ये जेव्हा विप्रो कंपनी चालत होती तेव्हा त्यातील बऱ्याच कामगारांची तक्रार येऊ लागली की इथे बरीच गर्मी आहे, या गर्मीमुळे काम करायला अडथळा येतो. अशावेळी अझीम प्रेमजी हे स्वतः जळगावला गेले व तब्बल सहा महिने अशा गर्मीमध्ये कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. आपल्या कंपनीच्या एवढ्या मोठ्या मालकाला आपल्या सोबत काम करताना बघून कामगार चकित झाले व त्यांच्या तक्रारी येणं देखील कायमचं बंद झालं.
स्वतःच्या मुलाला म्हणजेच रशीद प्रेमजी याला त्यांनी लगेचच आपल्या कंपनीमध्ये काम दिले नाही, तर सुरुवातीला त्याचा सुद्धा ( Interview ) मुलाखत घेण्यात आली. अझीम प्रेमजी म्हणतात " तुमच्या मुलांना लहानपणापासूनच सर्व सुख सुविधा पुरवून त्यांना कमजोर बनवू नका, तर त्यांना रडवा, पळवा, थकवा आणि त्यानंतर बघा, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी सक्षम असतील ".
अधिक वाचा : उद्योजकांचा जन्म - रेणुका आराध्य | Entrepreneur born - Renuka Aradhya
त्यांच्या पत्नीचे नाव यास्मीन प्रेमजी yasmeen premji असे आहे तर त्यांना दोन मुले देखील आहेत ज्यांची नावे राशिद प्रेमजी आणि तारीक प्रेमजी अशी आहेत. tariq premji
बरेचसे उद्योगपती श्रीमंत झाल्यावर सुद्धा अधिकाधिक श्रीमंत कसे होता येईल यावर सतत लक्ष देत असतात पण अझीम प्रेमजी याला पूर्णतः अपवाद ठरले. ज्या देशाच्या मातीने मला एवढं सगळं दिलं त्याच देशातील लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी माझा पैसा खर्च झाला पाहिजे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. भारताला जर जगामध्ये अजून पुढे जायचं असेल तर येथील शिक्षणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे व त्याचबरोबर येथील शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं आणि म्हणूनच 2001 साली त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशन ची स्थापना केली, या संस्थेमार्फत त्यांनी गरीब, अनाथ मुले यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचललेला आहे ही संस्था भारतातील सहा राज्य, 40 जिल्हे, 1 केंद्रशासित प्रदेश व कित्येक गावांपर्यंत पोहोचली आहे.
जेव्हा भारतावर कोरोना चे महासंकट ओढवले तेव्हा या माणसाने 1 एप्रिल 2020 साली कोवीड रिलीफ फंड मध्ये तब्बल 1,125 करोड रुपये दान केले. आणि या गोष्टीची कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतरसुद्धा जवळपास 20 करोड रुपये ते प्रति दिन दान करत होते आणि 2020 या पूर्ण वर्षामध्ये त्यांनी जवळपास आठ हजार करोड रुपये दान केले.
जगातील दोन सर्व श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी चालू केलेल्या " द गिविंग प्लेज " या मोहिमेमध्ये सहभाग घेणारे आणि आपली जवळपास 80 टक्के संपत्ती दान करणारे अझीम प्रेमजी हे पहिले भारतीय ठरले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या जगासाठी आणि देशाच्या हितासाठी समर्पित केले.
Azim Premji Awards and achievements | अझीम प्रेमजी यांना मिळालेले पुरस्कार
अझीम प्रेमजी यांनी केलेल्या त्यांच्या परोपकारी, देशहिताच्या कार्यासाठी 2005 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण तर 2011 साली भारताचा दुसरा सर्वात मोठा सर्वोच्च नागरी सन्मान " पद्मविभूषण " याने सन्मानित करण्यात आले.
भारतासाठी झटणाऱ्या अशा या कर्मवीर आणि दानवीर उद्योगपतीला आमचा सलाम.
तर कशी वाटली तुम्हाला अझीम प्रेमजी यांची जीवन कथा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
धन्यवाद "अझीम प्रेमजी मराठी माहिती | Azim Premji biography in Marathi | Azim premji information in marathi" वाचल्याबद्दल !!