गौतम गंभीर मराठी माहिती Gautam Gambhir information in marathi

गौतम गंभीर मराठी माहिती Gautam Gambhir information in marathi 

नमस्कार मित्रांनो,


 क्रिकेट या खेळाने भारतालाच नाही तर जगाला असे काही महान क्रिकेटपटू दिले, की ज्यांनी स्वतःच्या Talent च्या जोरावर संपूर्ण जगभरात नाव कमावलं. काहींनी तर जागतिक पातळीवर विक्रम केले, बघता बघता भारतीय संघाची ताकत अमाप पटीनी वाढत गेली ती ह्याच क्रिकेटपटूंमुळे.


काही असे खेळाडू आहेत ज्यांनी, भारतीय संघ वाईट परिस्थितीमध्ये असताना तन-मन एकत्र, आपल्या खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करून नेहमी भारतीय संघाला विजय दाखवला. आज आपण अशाच एका क्रिकेटर बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने भारताला 2 विश्वकप मिळवून देण्यात खूप मोठी आणि महत्वाची कामगिरी बजावली. क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं आदरार्थी नाव घेतलं जातं, असे भारतीय संघाचे तडफदार खेळाडू “ गौतम गंभीर " यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


 14 ऑक्टोबर 1981 साली भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये गौतम गंभीरचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दीपक गंभीर तर आईचे नाव सीमा गंभीर आहे. गौतमला एक छोटी बहीण देखील आहे, जिचे नाव एकता गंभीर आहे.


गौतम गंभीरचे बालपण हे त्यांच्या आजी आजोबा सोबत गेलं. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेट खेळायची आवड होती. वय वर्ष 10 असल्यापासून ते क्रिकेटची प्रॅक्टिस करायला लागले. यानंतर गौतमला त्याच्या मामांकडे ठेवण्यात आलं, जिथे शाळेतून घरी आल्यावर ते क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे. ते, त्यांचे मामा पवन गुलाटी यांना गुरु देखील मानतात. गौतम गंभीरचा खेळ बघून त्यांच्या मामाने क्रिकेटपटू होण्यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केलं.


 पुढे क्रिकेटच्या प्रोफेशनल ट्रेनिंग साठी त्यांनी दिल्लीतल्या लालबहादूर शास्त्री क्रिकेट अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यांचे कोच संजय भारद्वाज आणि राजू टंडन यांनी गौतमला क्रिकेटची बाराखडी शिकवली. बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी शिकवून गौतमला क्रिकेटमध्ये निपून केलं. याच दरम्यान त्यांनी हायस्कूलचे शिक्षण देखील पूर्ण केले. क्रिकेट व्यतिरिक्त अभ्यासामध्ये देखील गौतम गंभीर खूप हुशार होते.


 दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेऊन गौतम गंभीरने ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली. इसवी सन 2000 साली बंगलोरच्या National Cricket Academy मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. पुढे त्यांचं सिलेक्शन दिल्लीच्या रणजी टीम साठी झालं, दिल्लीसाठी त्यांनी लगातार सर्वोत्तम फलंदाजी केली. याच दरम्यान भारतीय टीमच्या काही लोकांची नजर गौतम गंभीरच्या खेळावर पडली आणि जराही विलंब नं करता सिलेक्शन 2003 साली भारतीय संघात झालं.


गौतम गंभीर क्रिकेट करियर

TVs cup भारत विरुद्ध बांगलादेश या एक दिवसीय वन डे मॅचमध्ये त्यांनी स्वतःचं डेब्यू  केलं, या सिरीजच्या तिसऱ्याचं मॅचमध्ये बांगलादेश विरुद्ध तब्बल 71 रन गौतम गंभीरने केले आणि संघाला विजय मिळवून दिला. या मॅचसाठी त्यांना man of the match चा किताब देण्यात आला. 2004 साली त्यांना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या ( Border Gavaskar Trophy )  शेवटच्या test series match साठी select करण्यात आलं. साऊथ आफ्रिकेसारख्या मजबूत टीमच्या विरोधात त्यांनी तब्बल 94 रन करून आपल्या खेळाची झलक संपूर्ण जगाला दाखवली.


त्यांचं पहिलं टेस्ट शतक याच वर्षी 2004 च्या डिसेंबर मध्ये त्यांनी बांगलादेश विरुद्ध केलं. 2005 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी 97 बॉल मध्ये 103 रन करून पुन्हा एकदा शतक ठोकलं. यानंतर श्रीलंके विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्यांना चांगला परफॉर्मन्स दाखवता आला नाही, आणि यामुळेच टेस्ट टीम मधून त्यांना ड्रॉप करण्यात आलं.


2007 मध्ये होणाऱ्या एक दिवसीय विश्वकपसाठी देखील त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं नाही. यामुळे ते खूपच निराश आणि हताश झाले होते. एवढेच काय तर क्रिकेटची प्रॅक्टिस देखील सोडून द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला होता. पण त्यांच क्रिकेटवर असणारं प्रेम, पॅशन आणि जिद्द कमालीची होती आणि म्हणूनच वेळेचा सदुपयोग करून त्यांनी त्यांची प्रॅक्टिस चालू ठेवली.


पुढे 2007 च्याच बांगलादेश टूरसाठी जाणाऱ्या भारतीय टीममध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची शेवटची संधी त्यांना सोडायची नव्हती आणि म्हणूनच या सिरीजमध्ये त्यांनी तुफान फलंदाजी करून सगळ्यांची मन जिंकली व भारतीय संघात आपलं स्थान कायम केलं.


2007 च्या T20 World Cup साठी देखील गौतमला निवडण्यात आलं. प्रशिक्षकांच्या या निर्णयाला योग्य ठरवत गौतमने संपूर्ण सिरीजमध्ये अफलातून बॅटिंग केली व पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये 54 बॉल मध्ये 74 रन करून भारताला पहिला T-20 विश्वकप मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. या टूर्नामेंटमध्ये त्यांनी 3 अर्धशतके करून 227 रन बनवले आणि यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन नंतर सर्वात जास्त रन करणारे दुसरे क्रिकेटपटू ठरले.


2008-09 साली देखील त्यांचा फॉर्म खूपच चांगला होता आणि म्हणूनच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांसारख्या मोठ्या आणि बलाढ्य संघांविरोधात देखील त्यांनी बऱ्याचं धावा करून वेळोवेळी भारताला विजय मिळवून दिला. याच दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्यांनी चांगली खेळी करत न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 136 रन करून गोलंदाजांना झुलवत ठेवलं.


साल 2009 मध्ये ICC च्या टेस्ट रँकिंग बॅट्समन मध्ये ते क्रमांक एकवर होते. आणि ह्याचं वर्षी त्यांना ICC cricketer of the year चा देखील सन्मान भेटला. 2010 साली भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरला कॅप्टनशिप सांभाळायची संधी मिळाली. आपल्या कॅप्टनशिपने सगळ्यांना प्रभावित करून त्यांनी न्यूझीलंड टीमला 5-0 अशा पराभवाने हरवलं. आणि यामुळेच त्यांना 2011 साली होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये देखील निवडण्यात आलं.


2011च्या या विश्वकप मध्ये देखील त्यांनी त्यांचा फॉर्म कायम ठेवला. आणि अखेर Final ला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात  सचिन आणि सेहवाग हे लवकर बाद झाल्यावर, भयंकर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला, तब्बल 97 धावा करून यशाच्या थेट जवळ पोहचवलं. आणि अखेर 23 वर्षानंतरच्या दीर्घ कालावधीनंतर विश्वकपची ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताला सर्वात जास्त गरज असताना त्यांनी खेळलेली ही पारी ऐतिहासिक ठरली.


याचं वर्षी 2011 साली कोलकत्ता नाईट रायडर्स या टीमने त्यांना आयपीएलमध्ये तब्बल 11.04 करोड रुपये देऊन खरेदी केलं, आणि IPL चे महागडे खेळाडू म्हणून त्यांचा हा विक्रम झाला. साल 2012 आणि 2014 साली त्यांनी कोलकाताला विजय मिळवून दिला.

gautam gambhir jersey number 05

 भारतीय संघाला कठीण परिस्थितीत वेळोवेळी विजय मिळवून देणाऱ्या या महान आणि गुणी खेळाडूने 3 डिसेंबर 2018 साली क्रिकेटमधून सन्यास घेतला.


अधिक वाचा: Sachin Tendulkar Information in Marathi | सचिन तेंडुलकर माहिती 

 गौतम गंभीरचे काही विक्रम  :-

Gautam-Gambhir-Photo

1) गौतम गंभीर हे पहिले भारतीय आणि जगातील चौथे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लगातार पाच टेस्ट सामन्यांमध्ये बॅक टू बॅक सेंचुरी मारलेली आहे. 


2) गौतम गंभीरच्या कॅप्टनशिप मध्ये खेळण्यात आलेल्या सहा सामन्यांमध्ये भारताला त्यांनी विजय मिळवून दिला आणि असा कारनामा करणारे ते एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत.


3) त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीत त्यांनी बॅटिंग करताना 58 टेस्ट matches मध्ये एकूण 4154, वन-डे मध्ये 5238, टी-20 मध्ये 932 तर आयपीएल मध्ये 4218 इतक्या धावा केलेल्या आहेत. gautam gambhir stats

अधिक माहितीसाठीCricbuzz Gautam Gambhir

 गौतम गंभीर यांना बऱ्याच पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2009 साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2019 साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.


अधिक वाचा: Smriti mandhana information in Marathi | स्मृती मंधाना मराठी माहिती

 त्यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल बोलायचं झालं तर 2011 साली त्यांनी नताशा जैन यांच्यासोबत विवाह केला. gautam gambhir wife

सध्या ते राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत, त्याचबरोबर क्रिकेट कॉमेन्ट्री आणि कोचिंग इत्यादी गोष्टी ते करत असतात.


"गौतम गंभीर मराठी माहिती Gautam Gambhir information in marathi"  वाचल्याबद्दल धन्यवाद!

Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

Post a Comment

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator