राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024 | National Science Day information in marathi विज्ञानापासून होणाऱ्या फायदयांची समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच विज्ञानाची विचारसरणी जनमाणसात प्रगल्भ करण्यासाठी विज्ञान दिवस साजरी केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरी केला जातो? | राष्ट्रीय विज्ञान दिवस मराठी माहिती
National-Science-Day-2023 |
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक सिवी रमन ह्यांची त्यांचा शोध रमन इफेक्ट जगासमोर मांडला होता. म्हणून ह्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस ( national science day ) साजरी केला जातो.
अधिक वाचा : बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
सी व्ही रमण यांचा परिचय:
सिवी रमन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमन होते. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तमिळनाडूच्या तिरुचिलापल्ली मध्ये झाला होता. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे लेक्चरर होते. त्यांनी विशाखापट्टनम च्या सेंट एलॉयसिस एंग्लो-इंडियन हायस्कूल मध्ये प्राथमिक तसेच मद्रास म्हणजे सध्याच्या चेन्नई च्या प्रेसिडेन्सी कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्याचं महाविद्यालयातुन त्यांनी १९०७ च्या दरम्यान एम एस सी चे शिक्षण पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कडून त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.
१९०७ ते १९३३ दरम्यान त्यांनी कोलकात्यात इंडियन एसोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स मध्ये काम केले. याचं दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र शी निगडित अनेक विषयांवर गहन अभ्यास तसेच संशोधन केले. पारदर्शक पदार्थांमधून जाणाऱ्या प्रकाशाच्या किरणांमध्ये येणाऱ्या बदलांच्या ह्या शोधाला रमन प्रभाव ( रमन इफेक्ट ) म्हणून ओळखले जाऊ लागले. ह्याचं शोधाचा उपयोग आजवर पूर्ण जगात होत आहे.
ह्या शोधाकरिता सी वी रमन यांना १९३० साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रमन इफेक्ट हा शोध साजरी करण्यासाठी १९८६ पासून सूरु झालेल्या ह्या विज्ञान दिवसाला प्रत्येक वर्षी एक थीम ठरवली जाते.
C-V-Raman |
मागील तीन वर्षांची राष्ट्रीय विज्ञान दिवस थीम-:
वर्ष २०१९ - विज्ञानासाठी माणसे आणि माणसांसाठी विज्ञान
वर्ष २०२० - विज्ञानात महिलांचे योगदान
वर्ष २०२१ - STI ( Science, Technology आणि Innovation) चे भविष्य
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 थीम -: ह्या वर्षी थीम आहे, दीर्घकालीन भविष्यासाठी विज्ञान और प्रौद्योगिकीकरणात एक दृष्टिकोन !
अधिक वाचा : राष्ट्रीय युवा दिवस - स्वामी विवेकानंद जयंती | National Youth Day 2022
राष्ट्रीय विज्ञान दिवस उद्देश्य | National Science Day Marathi Information
विज्ञान दिन प्रोद्योगिकी परिषद अर्थात प्रौद्योगिकी मंत्रालयाद्वारे प्रत्येक वर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी साजरी केला जातो. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा १९८७ मध्ये साजरा केला गेला होता. उद्देश हाच की सामान्य जनमानसांत विज्ञान चे महत्व रुजवणे आणि विज्ञानाची आवड निर्माण करणे. ह्याचं करीता मंत्रालयाद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की विज्ञान क्षेत्रात नाव कमावलेल्या वैज्ञानिकांचे भाषण, निबंध, लेखन, विज्ञान संबंधित प्रश्नःउत्तरे, विज्ञान प्रदर्शने, सेमिनार इत्यादी सामावलेले असतात.
लहान मोठ्या शोध, संशोधनांना प्रेरणा मिळावी ह्यासाठी अनेक योजना देखील जाहीर केल्या जातात. विज्ञान क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील केला जातो.
देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या सर्व शोधांनी सामान्य माणसाला देखील फायदा झालेला आहे. याचं फायदयांची समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच विज्ञानाची विचारसरणी जनमाणसात रुजू करण्यासाठी विज्ञान दिवस साजरी होणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला 'राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या' शुभेच्छा !! लेख आवडला असेल तर शेअर करा !! धन्यवाद!!