चंद्रावरची ती “ रहस्यमय झोपडी " तुम्ही पाहिलीत का ? | Mystery Hut on Moon
जाणून घ्या पूर्ण माहिती.....!
नमस्कार मित्रांनो,
जेव्हा भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता त्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली होती, ते आपल्यापेक्षा बऱ्याच पटीने पुढे होते, फक्त इंग्लंड देश नाही तर जवळपास सर्वच पाश्चिमात्य देश, औद्योगीकरणाकडे वळू लागले होते, अनेक आविष्कार या देशांमध्ये घडत होते. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे या सर्वांसाठी फार वेळ जावा लागला. चंद्रावरची ती “ रहस्यमय झोपडी " तुम्ही पाहिलीत का ? | (Mystery Hut on Moon)
20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर माणसाची अंतराळात आणि चंद्रावरची यात्रा कायमची सुरू झाली ती आजवर अबाधित आहे. त्यानंतर अनेक देशांनी आपली अंतराळयान आणि अंतराळवीर चंद्रावरती पाठवले, यामध्ये आपल्या भारताचा देखील समावेश आहे.
एवढ्या लांब असलेल्या चंद्रावर कधी कोणी पोहोचू शकेल हे केवळ अशक्य वाटायचं, पण टेक्नॉलॉजी आल्यानंतर हे सर्व शक्य झालं, आणि दिवसेंदिवस यामध्ये प्रगती होत गेली आणि माणूस चंद्राच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. चंद्रावर पोहोचल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा अनेक देशांनी केलेला आहे, मागच्या वेळेस भारताने चंद्रावर पाणी असल्याचा दावा केला होता आणि हे सिद्धही केले होते. पण आता काही दिवसांपूर्वी चीनमधील अंतराळ संशोधन केंद्राने चंद्रावरती एक रहस्यमय झोपडी असल्याचा दावा केलेला आहे.
कोणी पाहिली चंद्रावरची रहस्यमय झोपडी ??
चीनमधील अंतराळ संशोधन केंद्र असणाऱ्या “ चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन " च्या या शास्त्रज्ञांनी, चंद्राच्या पृष्ठभागावर एक “ मिस्ट्री हट " म्हणजेच गूढ किंवा रहस्यमय झोपडी बघितल्याचा दावा केला आहे. एका झोपडीच्या आकाराची आकृती त्यांना चंद्राच्या एका भागात दिसली होती पण अद्यापही ही आकृती नेमकी काय आहे, याचा शोध लागलेला नाही. चीनचे “ यूटू -2 " रोव्हर चंद्रावर माहिती गोळा करत असताना, जवळपास 80 मीटर अंतरावर ही झोपडी दिसली आहे. चंद्रावरचे 80 मीटर अंतर हे फार असल्यामुळे एवढ्या वरूनच या आकृतीचा अचूक अंदाज लावणे हे कठीण आहे. चंद्रावरची ती “ रहस्यमय झोपडी " तुम्ही पाहिलीत का ? | Mystery Hut on Moon
जेव्हा या आकृतीच्या जवळ जाऊन फोटो काढले जातील आणि संशोधन केंद्रात पाठवले जातील तेव्हा शास्त्रज्ञ याचा सखोल अभ्यास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या प्रवासाला दोन ते तीन दिवस लागणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पण हे चंद्रावरचे दोन तीन दिवस म्हणजेच पृथ्वीवरचे तब्बल तीन महिने आहेत. म्हणजेच या रोवरला आता ज्या ठिकाणी आहे तिथून प्रवास करून त्या झोपडी सारख्या दिसणाऱ्या आकृती पर्यंत पोचायला किमान तीन महिने तरी लागतील अशी माहिती शास्त्रज्ञांकडून मिळाली आहे.
या रहस्यमय आकृती चे फोटो Viral??
चंद्राच्या पृष्ठभागावर दिसलेल्या या रहस्यमय आकृती चे फोटो सर्वप्रथम चीनमध्ये व्हायरल झाले आणि तिथून ते जगभरात सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं, पृथ्वीवर जशी माणसांची वस्ती आहे घर आहेत त्याचप्रमाणे चंद्रावर एलियनची वस्ती असल्याचा दावा विविध लोकांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी मात्र आतापर्यंत या माहितीला दुजोरा दिलेला नाही. ग्रह ताऱ्यांबद्दल ज्यांना कुतूहल, आपुलकी वाटते त्यांच्यासाठी मात्र हा विषय अगदी आनंदाचा आणि उत्साहाचा बनलेला आहे. सोशल मीडिया वरून जगभरातल्या अनेक लोकांनी या आकृतीवर तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे.
शास्त्रज्ञांचं म्हणणं काय??
शास्त्रज्ञांनीं मात्र एक वेगळाच अंदाज लावलेला आहे त्यांच्या मतानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर सापडणाऱ्या असंख्य खडकांपैकी हा एखादा भलामोठा खडक असू शकतो अशी माहिती त्यांनी दिली. येत्या काही महिन्यातच या संशयाचे निवारण होईल जेव्हा हे रोवर या आकृतीच्या अधिक जवळ जाऊन स्पष्ट फोटो पाठवेल. स्पष्ट फोटो पाठवल्यानंतर चीनचे शास्त्रज्ञ या विषयावर सखोल अभ्यास करतील. चंद्रावर चीनच्या अनेक चंद्र मोहीम सुरू आहेत. चीनचे “ यूटू-2 " हे यान 21 मे 2018 रोजी चंद्रावर उतरले होते. चंद्रावरची ती “ रहस्यमय झोपडी " तुम्ही पाहिलीत का ? | Mystery Hut on Moon
तुम्हाला या रहस्यमय आकृती बद्दल काय वाटते? हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा.
धन्यवाद " चंद्रावरची ती “ रहस्यमय झोपडी " तुम्ही पाहिलीत का ? | Mystery Hut on Moon" वाचल्याबद्दल !!