कबड्डी खेळाची माहिती | Kabaddi Sports Information in Marathi
कबड्डी खेळाची माहिती | Kabaddi Sports Information in Marathi कबड्डी खेळाची प्रस्तावना:
कबड्डी ह्या खेळाला 'हुतुतु' असे देखील म्हटले जाते. हा आपल्या भारतात खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे.
कबड्डी हा खेळ मातीमध्ये अधिक प्रमाणात खेळला जातो.
कबड्डी हा खेळ फार पुर्वीपासून खेळला जात आहे. पुर्वी ह्या खेळाला हुतुतु असे म्हटले जायचे. पुर्वी कबड्डी हा खेळ फक्त गावात खेळला जात होता. तेव्हा ह्या खेळाला कुठलाही नियम नसायचा. पण आता हा खेळ शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे.
कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी एका नरम अणि सपाट मैदानाची आवश्यकता असते. कबड्डीचे मैदान बनविण्यासाठी लालसर रंगाच्या मातीचा वापर केला जातो.
कबड्डी ह्या खेळात किती खेळाडु असतात? how many players in kabaddi in marathi how many players are there in kabaddi
कबड्डी ह्या खेळात दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ७ खेळाडू असतात.
कबड्डी खेळाचे मैदान -
कबड्डी ह्या खेळामध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी तसेच महिला अणि पुरूष या दोघांकरीता वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात.
कबड्डीच्या मैदानामध्ये मध्यभागी एक रेषा आखलेली असते. त्यामुळे यात मैदानाचे दोन भाग पडतात. मैदानाच्या दोन्ही बाजूला एक राखीव क्षेत्र असते.
कबड्डी खेळासाठी लागत असलेल्या क्रीडांगणाची एकुण तीन गटांमध्ये वर्गवारी करण्यात येत असते.
कबड्डी हया खेळात महिला खेळाडूंसाठी ११ मीटर * ८ मीटर, पुरूष खेळाडुंसाठी १२.५० मीटर * १० मीटर असे आयताकृती क्रीडांगण बनवले जाते.
पुरूष तसेच कुमार गटांच्या मुलांसाठी १३.०० मीटर बाय १०.०० मीटर .
महिला तसेच कुमारी गटातील मुलींकरीता १२.०० मीटर बाय ८.०० मीटर .
किशोर तसेच किशोरी गटांच्या मुलामुलींसाठी ११.०० मीटर बाय ८.०० मीटर .
अधिक वाचा: Sachin Tendulkar Information in Marathi | सचिन तेंडुलकर माहिती
कबड्डी खेळाचे स्वरूप -
कबड्डी ह्या खेळात दोन umpire अणि एक रेफरी असतो. यात एक गुण सांगणारा, दोन लाईनमन, दोन ज्यादा स्कोअर असे अधिकारी असतात.
कबड्डी ह्या खेळात रेफरीने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागत असतो. कबड्डी ह्या खेळात प्रत्यक्ष सामना खेळत असताना दोन्ही संघ मिळून नाणेफेक करत असतात.
जो संघ नाणेफेक जिंकत असतो त्याला चढाई किंवा अंगण सांभाळणे ह्या दोघांपैकी कुठलाही एक पर्याय निवडावा लागतो.
कबड्डी ह्या खेळात चढाई करत असलेल्या संघाला 'रेडर' ( raider) असे म्हणतात अणि बचाव करत असलेल्या संघाला 'अँटिस' ( Antis ) असे म्हटले जाते.
कबड्डी ह्या खेळात रेडर हा विरूद्ध टीमच्या कोर्टात धाव घेत असतो. आणि शक्य तितक्या खेळाडूंना स्पर्श करत स्वताच्या कोर्टात परत जात असतो.
रेडर विरूद्ध संघाच्या ज्या खेळाडुंना स्पर्श करत स्वताच्या कोर्टात परत जातो त्या सर्व खेळाडुंना खेळातुन बाहेर काढण्यात येत असते.
पण त्यांच्या संघाने टॅग अणि टॅकल मधुन मिळवलेल्या प्रत्येक गुणाकरीता त्यांना परत आणण्यात येत असते.
विरोधी संघाने रेडरला त्यांच्या खेळाडुंना स्पर्श करत स्वताच्या कोर्टात रेडरला जाण्यापासून थांबवले तर त्यांना पाॅईट / गुण मिळत असतो. मग यानंतर रेडरला बाद होऊन बाहेर जावे लागते.
कबड्डी ह्या खेळामध्ये विरोधी संघाविरुद्ध चढाई करत असताना रेडरला कबड्डी कबड्डी हा शब्द सतत उच्चारावा लागत असतो. असे न केल्यास फाऊल होत असतो.
पुरूषांसाठी २०-२० मिनिट अशा दोन सत्रामध्ये कबड्डी हा खेळ खेळण्यात येतो. तर महिला अणि मुले, मुली यांच्यासाठी १५-१५ मिनिट अशा दोन सत्रात हा खेळ खेळला जातो. यामध्ये पाच मिनिट इतका मध्यांतर असतो.
खेळाच्या शेवटी ज्या संघाकडे जास्त गुण असतील त्या संघाला विजयी घोषित करण्यात येते.
कबड्डी ह्या खेळातील पोशाख -
कबड्डी हा खेळ खेळताना पुरुष वर्गाला हाफ पॅन्ट आणि बनियन हा पोशाख परिधान करावा लागतो तर महिला वर्गाला टी शर्ट, हाफ पॅन्ट अणि पायात कापडी बुट असा पोशाख परिधान करावा लागतो.
प्रत्येक खेळाडूच्या पोशाखावर एक ठराविक नंबर लिहिलेला असतो.
कबड्डी ह्या खेळाचे काही महत्वाचे नियम / कबड्डी खेळाचे नियम -
१) पहिला नियम -
रेडरला विरूद्ध संघाच्या कोर्टात प्रवेश करायला सुरुवात करण्याआधी कबड्डी - कबड्डी बोलणे सुरू करावे लागते.
अणि तो पर्यंत कबड्डी कबड्डी उच्चारावा लागेल जोपर्यंत तो विरूद्ध संघाच्या खेळाडुला स्पर्श करून आपल्या स्वताच्या संघाच्या कोर्टात परत प्रवेश करत नाही.
२) दुसरा नियम -
विरूदध संघातील रक्षक रेडरचे कबड्डी कबड्डी बोलणे थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मार्ग वापरू शकत नाही.
पण विरूदध संघातील रक्षक रेडरचे कबड्डी बोलणे थांबवण्यासाठी चुकीचा मार्ग वापरत आहेत अशी तक्रार आल्यास खेळा दरम्यान रेडरला नाबाद घोषित केले जाते.
३) तिसरा नियम -
जेव्हा एखादा रेडर विरोधी छावणीत जातो तेव्हा त्याला कोणत्याही किंमतीत गुण मिळवावे लागतात. जर रेडरने गुण घेतले नाहीत किंवा त्याला गुण दिले नाहीत तर त्याला रिकामा छापा म्हणतात.
४) चौथा नियम -
क्रिकेटपेक्षा कबड्डी या खेळात नाणेफेक अधिक महत्त्वाचे असते. कारण नाणेफेक जिंकणारा संघच ठरवतो की त्याला आपल्या पसंतीचे कोर्ट हवे आहे की छापा मारण्याची संधी हवी आहे.
५) पाचवा नियम -
खेळाडूला नेहमी काळजी घ्यावी लागते की त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा कोर्टाबाहेर स्पर्श होऊ नये, जर असे झाले तर खेळाडू आऊट होत असतो.
६) सहावा नियम -
जर रेडरने त्याची पाळी आल्यावर छापा टाकणे टाळले तर विरोधी संघाला एक तांत्रिक गुण मिळतो आणि छापा टाकण्याची अतिरिक्त संधी देखील मिळते.
७) सातवा नियम -
जेव्हा रेडर येतो तेव्हा विरोधी संघाला योग्य बचाव करावा लागतो, म्हणजेच ते रेडरला त्याचे केस किंवा कपडे पकडून रोखू शकत नाहीत आणि असे करणाऱ्या बचावकर्त्याला बाद घोषित केले जाते.
कबड्डी खेळाचा इतिहास -
कबड्डी हा खेळ फार जुन्या काळापासून भारतात खेळला जात असलेला खेळ आहे.
आता ह्या खेळाला कबड्डी ह्या नावाने संबोधले जाते. पुर्वी हा खेळ गावखेडयात सवडीच्या वेळात फावल्या वेळात खेळला जायचा.
म्हणुन ह्या खेळाचे कुठलेही नियम नव्हते. पण जेव्हापासून हा खेळ शहरी भागात खेळला जाऊ लागला तेव्हापासून ह्या खेळाच्या राज्यस्तरीय पातळीवर स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या.
धन्यवाद "कबड्डी खेळाची माहिती | Kabaddi Sports Information in Marathi" वाचल्याबद्दल !!