लोकसभा निवडणुक २०२४ | Lok sabha election 2024
लोकसभा निवडणुक २०२४ म्हणजे भारतीय घटनेनुसार लोकशाहीच्या दृष्टीने सर्वात मोठा सण! हा सण साजरी करण्यासाठी उमेदवार तसेच पक्ष तसेच लोकही ५ वर्षांनंतर उत्सुक असतात. लोक त्यांचा आवाज देशाच्या पातळीवर राजधानीत जाऊन व्यथा मांडण्यास निवडत असतात.
राजकीयदृष्ट्या आजचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार होत्या. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दुपारी 3 च्या पत्रकार परिषदेत त्या जाहीर केले पण झाल्यात.
यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर होणार झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद तसेच बातम्यांमार्फत थेट प्रक्षेपित केले गेले तसेच तारीख जाहीर केली गेली.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार लोकसभा निवडणूका 2024 ७ टप्प्यांत पार पडतील. १९ एप्रिल ते ४ जून पर्यंत ह्या निवडणुका पार पडतील. आणि निवडणुकांचा निकाल हा ४ जूनला जाहीर केला जाईल. या निकालातून लोकांना त्यांच्या विभागातील खासदार हा ४ जून या तारखेला माहीत होईल.
पहिली फेज -: १९ एप्रिल २०२४
दुसरी फेज -: २६ एप्रिल २०२४
तिसरी फेज -: ७ मे २०२४
चौथी फेज -: १३ मे २०२४
पाचवी फेज -: २० मे २०२४
सहावी फेज -: २५ मे २०२४
सातवी फेज -: १ जून २०२४
राज्यातील निवडणूकांच्या तारखा खालीलप्रमाणे :
पहिला टप्पा -: २२ राज्यांतील लोकसभा निवडणुका या एका टप्प्यात पार पडतील. ही राज्ये पुढीलप्रमाणे -: अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पौंडचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा आणि उत्तराखंड.
दुसरा टप्पा -: ४ राज्यांतील लोकसभा निवडणूका ह्या दोन टप्प्यांत पार पडतील, ती राज्ये पुढीलप्रमाणे -: कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर.
तिसरा टप्पा :- २ राज्यांतील लोकसभा निवडणुका ह्या तीन टप्प्यांत पार पडतील, ती राज्ये -: छत्तीसगड आणि आसाम.
चौथा टप्पा -: ३ राज्यांतील लोकसभा निवडणुका चार टप्प्यांत पार पडतील, ती राज्ये -: ओडिसा, मध्यप्रदेश आणि झारखंड
पाचवा टप्पा -: २ राज्यांतील लोकसभा निवडणूका या पाच टप्प्यांत पार पडतील, राज्ये -: महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीर.
सातवा टप्पा -: ३ राज्यांतील लोकसभा निवडणूका या सात टप्प्यांत पार पडतील, राज्ये -: उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल.
याही वर्षी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र लोकसभा निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. कोणाचं अस्तित्व तर कोणाचं वर्चस्व पणाला लागलेलं आहे.
महाराष्ट्राच्या लोकसभेकडे इतरही राज्यांची नजर असते, कारण एकूण लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ४८ जागांवर महाराष्ट्रातुन निवडुन गेलेले खासदार असतात.
हेचं खासदार आपला सर्वसामान्यांचा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवण्यासाठी किती सक्षम आहेत, त्यानुसार लोक आपला कौल देत असतात.
इतर वर्षांप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अटीतटीची लढाई दिसून येत आहे. जसे की कोल्हापूर लोकसभा, सातारा लोकसभा, माढा लोकसभा, अहमदनगर ( अहिल्यानगर ) लोकसभा, मावळ लोकसभा, बीड लोकसभा इत्यादी.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं पारडे किती जड लवकरचं उमेदवार पूर्णपणे जाहीर झाल्यास तसेच प्रचारादरम्यान कळून येईलचं. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट इत्यादी पक्ष रिंगणात उतरले आहेत. यामुळे सामान्य जनतेला आपला खासदार निवडण्यासाठी थोडी कसरत ही करावी लागणार आहे. असे असले तरी या निवडणुकांची उत्सुकता तश्या रंजक दिशेने दिसून येत आहेत.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.
निवडणूक आयोगानुसार ९६.८ करोड भारतीय आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. त्यामध्ये ४९.७ कोटी हे पुरुष तर ४७.१ कोटी ह्या महिला, ४८ हजार तृतीयपंथी आहेत. आयोगाच्या माहितीनुसार १.८ कोटी इतकी संख्या असलेले मतदार हे first time voter म्हणजेच यंदा पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
वृद्ध आणि अक्षम व्यक्तींसाठी आयोगाने घरी बसून मतदान करण्याचा अधिकार त्यांना दिला आहे.
धन्यवाद "लोकसभा निवडणुक २०२४ | Lok sabha election 2024" वाचल्याबद्दल!!