पुणे शहरातील तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी एखाद्या उत्तम महाविद्यालयाच्या शोधात असतात.
जेणेकरून त्यांना आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा शिक्षण करत असतानाच महाविद्यालयाच्या वतीने चांगले भरघोस वेतन असलेली जाॅब प्लेसमेंट प्राप्त होईल.
पुणे शहर हे आयटी केंद्र तसेच विद्येचे माहेरघर असल्याने येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होत असतात.
म्हणून अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची ईच्छा असते की त्याला पुण्यातील उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्राप्त व्हावा.
याचकरीता आजच्या लेखामध्ये आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय कोणकोणते आहेत याविषयी माहीती जाणुन जाणुन घेणार आहोत.
1) पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे
पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक खासगी महाविद्यालय आहे.
पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक खासगी महाविद्यालय आहे जे १९९९ मध्ये स्थापित करण्यात आले होते.
ह्या महाविद्यालयाचा कॅम्पस १३ एकर एवढा विस्तारलेला आहे. हया महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बारावीला ४५ टक्के इतक्या गुणांची अर्हता ठेवण्यात आली आहे.
ह्या महाविद्यालयात एम एच टी सीईटी,जेईई मेन्स दोघांदवारे प्रवेश दिला जातो.पण काऊन्सिलिंग आपणास एम एचटी सीईटीचे भरणे आवश्यक आहे.कारण याचदवारे आपणास हे महाविद्यालय अलाॅट करण्यात येते.
एम एचटी सीईटीचे काऊन्सिलिंग भरल्यावर विद्यार्थ्यांना जेईई मेन्स मध्ये किती टक्केवारी असायला हवी हे आपण जाणून घेऊया.
कंप्यूटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ९६.९९ टक्के म्हणजे ९७ टक्के जेईई मेन्स मध्ये असणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांला कंप्यूटर सायन्स मध्ये प्रवेश प्राप्त होईल.
संगणकाशी संलग्न इतर शाखेत देखील विद्यार्थ्यांना कमीत कमी ९५ टक्के जेईई मेन्स मध्ये प्राप्त करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील एकुण फी - college total fees
पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग ह्या महाविद्यालयात एका वर्षाची फी एक ते दीड लाखापर्यंत लागु शकते. एका वर्षाला दीड लाख प्रमाणे चार वर्षांचे एकुण ६ लाख इतकी फी विद्यार्थ्यांना भरावी लागेल.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages
येथील सरासरी पॅकेज ७ लाख प्रती वर्ष इतके आहे. तर सर्वात जास्त पॅकेज ३२ लाख प्रती वर्ष इतके आहे.
2) पीआयसीटी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन पुणे -
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे १९८३ मध्ये स्थापित करण्यात आलेले एक खासगी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील कॅम्पस पाच एकर इतके आहे.
महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के प्राप्त करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इथे एम एचटी सीईटी तसेच जेईई मेन्स दोघांदवारे प्रवेश दिला जातो. पण इथे एम एचटी सीईटी दवारे काऊन्सिलिंग केले जाते.
काऊन्सिलिंग मध्ये जेईई मेन्स दवारे गेल्यावर आपणास किती टक्केवारी हवे ते पाहुया. समजा आपण आर्टिफिशियल इंटलिजन्स किंवा डेटा सायन्स घेतले असेल तर ९८.६ टक्के असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी कंप्यूटर सायन्स घेत असल्यास ९८.९८ इतकी टक्केवारी म्हणजे जवळपास ९९ टक्के असणे आवश्यक आहे.
एवढया टक्केवारीत कुठलाही विद्यार्थी एन आयटी किंवा पुण्यामध्ये देखील अभियांत्रिकीला प्रवेश प्राप्त करू शकतो.
महाविद्यालयातील एकुण फी - total fees in college
पीआयसीटी महाविद्यालयात एका वर्षाची फी एक लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजे एकुण वर्षांची फी चार लाखापर्यंत लागु शकते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages
पीआयसीटी महाविद्यालयातील सरासरी पॅकेज ४.८३ इतके आहे. तसेच सर्वोत्तम पॅकेज १२.३३ लाख प्रती वर्ष इतके आहे.
3) सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पुणे
सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुणे शहरातील २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेले एक खासगी महाविद्यालय आहे.
सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे महाविद्यालय जवळपास १६ एकर एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे.
महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ घेऊन किमान ४५ टक्के मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याअगोदर त्यांची एक प्रवेश परीक्षा entrance exam SITEEE घेतली जाते.मग त्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.
इथे जेईई मेन्स किंवा एम एचटी सीईटी दवारे परीक्षा घेतली जात नाही.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college
सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एका वर्षाची फी तीन ते साडे तीन लाख इतकी आकारली जाते. म्हणजे संपूर्ण वर्षभरात विद्यार्थ्यांना 14 लाखापर्यंतचे फी आकारली जाते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages
सिंबाॅसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन पुणेचे सरासरी पॅकेज 9 लाख प्रती वर्ष इतके आहे. तसेच सर्वोत्तम पॅकेज 50 लाख प्रती वर्ष इतके आहे.
4) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे -
ट्रीपल आयटी महाविद्यालय हे खासगी तसेच सार्वजनिक दोघे पद्धतीने पार्टनरशिप मध्ये स्थापण करण्यात आलेले महाविद्यालय आहे.
हे महाविद्यालय 2016 मध्ये स्थापित करण्यात आले होते.महाविदयालयाचे कॅम्पस दहा एकर एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांला बारावी मध्ये 75 टक्के इतके गुण असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात जेईई मेन्स परीक्षेदवारे प्रवेश दिला जातो.विदयार्थ्यांना जोसा काऊन्सिलिंग द्वारे महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.
जेईई मेन्स मध्ये कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये एकुण रॅक 17 हजार अणि इलेक्ट्रॉनिक अँड कंप्यूटर इंजिनिअरिंग मध्ये 22 हजार इतकी असते.म्हणजेच जेईई मेन्स मध्ये 99.5 टक्के असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college -
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे ह्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी एका वर्षाला आपणास अडीच लाख रुपये इतकी फी भरावी लागते.म्हणजे संपूर्ण कोर्सची एकुण फी 10 लाखापर्यंत असते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधुन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला दरवर्षी 17 लाखाच्या आसपास सरासरी वेतन पॅकेजच्या स्वरूपात प्राप्त होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधुन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला 53 लाख प्रती वर्ष इतके सर्वोत्तम पॅकेज प्राप्त होते.
5) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे -
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पुणे हे एक खासगी महाविद्यालय आहे.हया महाविद्यालयाची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयातील एकुण परिसर ६.५ एकर इतके आहे.
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे ह्या महाविद्यालयाची रॅकिंग १५१-२०० इतकी आहे.व्ही आयटी पुणे मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांला बारावी मध्ये किमान ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात प्रवेश एम एचटी सीईटी किंवा जेईई मेन्स दोघांपैकी कुठल्याही एका पद्धतीने प्रवेश घेता येतो. पण एम एचटी सीईटीची काऊन्सिलिंग भरणे आवश्यक आहे.
आर्टिफिशियल इंटलिजन्स अँड डेटा सायन्स मध्ये ९६, कंप्यूटर इंजिनिअरिंग तसेच आयटी मध्ये ९७, कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये ९२,केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ९२, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये ९५ इतकी टक्केवारी असणे आवश्यक आहे.
साधारणतः ९५ ते ९७ टक्के दरम्यान टक्केवारी असणे आवश्यक आहे तेव्हाच आपल्याला इथे प्रवेश दिला जातो.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college -
महाविद्यालयातील एका वर्षाची फी २ लाख रुपये इतकी आहे म्हणजे संपूर्ण वर्षांची फी ८ लाख इतकी आकारली जाते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
महाविद्यालयातील विद्यार्थीना उत्तीर्ण झाल्यानंतर सरासरी पॅकेज ९.७२ लाख प्रती वर्ष इतके दिले जाते.अणि सर्वोत्तम पॅकेज ५१ लाख प्रती वर्ष इतके दिले जाते.
6) डी वाय पाटील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे -
डी वाय पाटील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक स्वायत्त महाविद्यालय आहे.
डी वाय पाटील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापणा १९८४ मध्ये करण्यात आली होती.महाविदयालयातील कॅम्पस दहा एकर इतके आहे. ह्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बारावीला विद्यार्थ्यांला किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी महाविद्यालयात जेईई मेन्स किंवा एम एचटी सीईटी दवारे देखील प्रवेश प्राप्त करू शकतात.
डी वाय पाटील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये लागणारी संपूर्ण भारतातील रॅकिंग -
बीई आर्टिफिशियल इंटलिजन्स अँड डेटा सायन्स मध्ये एक लाखाच्या आसपास अणि कंप्यूटर सायन्स मध्ये जवळपास ६० हजाराच्या आसपास रॅकिंग संपूर्ण भारतात आहे.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college -
डी वाय पाटील महाविद्यालयाची महाराष्ट्र बोर्डासाठीची एका वर्षाची फी १ लाख ३४ हजार इतकी आहे.तसेच इतर बोर्डासाठीची फी १ लाख ३४ हजार इतकी आहे.
म्हणजे विद्यार्थ्याकडुन चार वर्षांसाठी सहा लाख रुपये इतकी फी आकारली जाते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
महाविद्यालयातुन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला ४ लाख प्रती वर्ष इतके सरासरी पॅकेज दिले जाते.ज्यात सर्वोत्तम पॅकेज ४१.३० लाख प्रती वर्ष इतके आहे.
7) डॉ विश्वनाथ कराड एम आयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टी -
डाॅ विश्वनाथ कराड एम आयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टी हे पुण्यातील एक खाजगी महाविद्यालय आहे.
डाॅ विश्वनाथ कराड एम आयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टी ह्या महाविद्यालयाची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली होती.
महाविद्यालयातील परिसर ६५ एकर एवढ्या परिसरात विस्तारलेला आहे.महाविदयालयाची एन आय आर एफ रॅकिंग १०१-१५० इतकी आहे.
महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेऊन किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात एम एच टी सीईटी तसेच जेईई मेन्स दोघांदवारे प्रवेश दिला जातो.पण प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयाचे एक काऊन्सिलिंग आहे एम आयटी डबलयु पीयु भरणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील एकुण फी - college total fees
डाॅ विश्वनाथ कराड एम आयटी वर्ड पीस युनिव्हसिर्टी मध्ये बीटेक कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरींगची एका वर्षाची फी जवळपास साडेतीन लाख इतकी आकारली जाते.म्हणजे संपूर्ण कोर्सची फी १५ लाखांपर्यंत भरावी लागते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
डाॅ विश्वनाथ कराड एम आयटी वर्ड पीस युनिव्हसिर्टी मधुन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला ७ लाख प्रती वर्ष इतके सरासरी पॅकेज दिले जाईल.तसेच सर्वोत्तम पॅकेज ५१ लाख प्रती वर्ष इतके दिले जाईल.
8) भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे -
भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग हे खासगी महाविद्यालय आहे ज्याची स्थापणा १९८३ मध्ये करण्यात आली होती.
महाविद्यालयातील एकुण परिसर ३०० एकर इतका आहे.महाविदयालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांला किमान बारावी उत्तीर्ण होताना ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाकडून त्यांची एक बीव्ही बीटेक नावाची प्रवेश परीक्षा घेतली जाते.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college -
भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील पहिल्या वर्षांची टयुशन फी जवळपास एक लाख रुपये इतकी आहे.म्हणजे पाच लाखांपर्यंत विद्यार्थ्यांला इथे आपली इंजिनिअरिंग पुर्ण करता येईल.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
महाविद्यालयातुन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला सरासरी ३ ते ४ लाख प्रती वर्ष इतके पॅकेज दिले जाते.तसेच येथील सर्वोत्तम पॅकेज एका वर्षाचे १२ लाख इतके आहे.
९) सीओईपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हसिर्टी पुणे -
सीईओपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हसिर्टी हे पुणे शहरात असलेले महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम महाविद्यालय आहे. म्हणुन इथे प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.
सीईओपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हसिर्टी हे एक सरकारी महाविद्यालय आहे ज्याची स्थापणा १८५४ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयातील परिसर ३६.८१ एकर इतका आहे.
सीईओपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हसिर्टी महाविद्यालयाची एकुण एन आय आर एफ रॅकिंग ७३ आहे. महाविदयालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी बारावी मध्ये किमान ४५ टक्के असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात एम एच टी सीईटी तसेच जेईई मेन्स दोघांदवारे प्रवेश दिला जातो.पण एम एच टी सीईटीची काऊन्सिलिंग भरणे आवश्यक आहे.
जेईई मध्ये कंप्यूटर सायन्स इंजिनिअरिंग मधुन ९९.२७ टक्के प्राप्त करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील एकुण फी - total fees of college -
महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी एका वर्षाला ९० हजार ६०० रूपये घेतले जातील.
विद्यार्थ्यांना आपली चार वर्षांची इंजिनिअरिंग इथे अवघ्या साडेतीन लाख रुपये मध्ये पुर्ण करता येते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
महाविद्यालयातील विद्यार्थीना उत्तीर्ण झाल्यानंतर सरासरी ११ लाख प्रती वर्ष इतके पॅकेज दिले जाते.ज्यात सर्वोत्तम पॅकेज प्रति वर्ष ५० लाख इतके आहे.
10) कमिन्स काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग फाॅर वुमन,पुणे
कमिन्स काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग फाॅर वुमन हे फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेले इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे.
हे एक खासगी महाविद्यालय आहे ह्या महाविद्यालयाची स्थापना १९९१ मध्ये करण्यात आली होती. महाविदयालयाचा परिसर ४ एकर एवढ्या परिसरात विस्तारलेला आहे.
महाविद्यालयाची एन आय आर एफ रॅकिंग २०१ ते २५० इतकी आहे. महाविदयालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला किमान ४५ टक्के असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात एम एच टी सीईटी तसेच जेईई मेन्स दोघांदवारे प्रवेश दिला जातो पण एम एच टी सीईटी काऊन्सिलिंग घेणे आवश्यक असते.
महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स मध्ये ९६ टक्के असल्यास कंप्यूटर इंजिनिअरिंगला प्रवेश दिला जातो.
महाविद्यालयातील एकुण फी -total fees of college -
महाविद्यालयाची एका वर्षाची फी पावणेदोन लाख इतकी आहे.म्हणजे पुर्ण इंजिनिअरिंग पुर्ण करण्यासाठी सात लाख रुपये इतकी फी आकारली जाते.
सरासरी पॅकेज तसेच सर्वोत्तम पॅकेज - average package and highest packages -
विद्यार्थ्यांना प्रती वर्ष ७.५२ लाख रुपये इतके पॅकेज दिले जाते.ज्यात सर्वोत्तम पॅकेज ५५.७५ लाख प्रती वर्ष इतके आहे.
'अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील उत्तमोत्तम कॉलेजेस best colleges in Pune for engineering admission' सदर माहीती इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे घेतली आहे, आणि पहिले दहा कॉलेज म्हणून ह्याचं कॉलेजेसला प्राधान्य दिले पाहिजे असाही आमचा उद्देश नाही.
तुमच्या अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा !