SEO म्हणजे काय? - SEOचा व्यवसायासाठी कसा उपयोग होतो?

SEO म्हणजे काय?  - What does Search Engine Optimization Mean? SEOचा व्यवसायासाठी कसा उपयोग होतो?

Search engine optimization in Marathi, किंवा SEO -:
आपल्या वेबसाइटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी किंवा उत्तम करण्याची क्रिया! 
Search Engine Optimization

शोध इंजिन Search Engines, SEO केलेल्या संकेतस्थळाला विशिष्ट विषयांशी संबंधित relevant content  आणि उपयुक्त असल्याचे समजते. तुम्ही अचूक कीवर्ड्सच्या वापराने सर्वात योग्य विषय निवडण्यास सक्षम होता. कीवर्डच्या अचूक placement आणि संबंधित विषयाने search engine वर तुमचे संकेतस्थळ रँक व्हायला मदत होते.
What Does SEO Mean
माझ्या दृष्टीने, विपणनातील सर्वात प्रभावी आणि कमी खर्चिक मार्ग! जो की तुमच्या व्यवसायाला पुढच्या पायरीवर नेऊन ठेऊ शकतो. अशी काही वैशिष्टये तुम्हाला माहीत असली पाहिजे, Search Engine ऑप्टिमिझशन (SEO)तीन गोष्टी किंवा पायऱ्यांमध्ये विभागले आहेत. 
        1) Keyword Research किवर्ड शोध 
        2) Optimization
        3) Build Authority 

1) सर्वप्रथम, Keyword ( तो शब्द जो अद्वितीय (Unique) किल्ली आहे) त्या शब्दाचा शोध घेणे. तर, कीवर्डचा शोध कसा घेणार? How to search for keywords?
    
कीवर्डस् आपण अशाप्रकारे वर्गीकृत करू शकतो. 
    अ) शब्द ( फक्त एक शब्द उदाहरणार्थ. 'book') ह्याला 'Head' प्रकारचे कीवर्ड असेही म्हंटले जाते.
    ब) २ ते ३ शब्दांचा समूह ( उदाहरणार्थ 'order books Online') ह्याला किवर्ड शोधामध्ये 'Body' असेही म्हंटले जाते. 
    क) ४ - ५ किंवा ५हुन अधिक वर्णनात्मक अर्थपूर्ण शब्दसमूह ( उदाहरणार्थ 'order wings of fire book online' or 'online book selling company mumbai' ) ह्याला 'Long Tail Keywords' म्हणून ओळखले जाते.

आपल्या Content साठी कोणत्या प्रकारच्या किवर्डची निवड करणार? What kind of keywords to choose for your content?

       --->  Head, Body की Long Tail keywords
 
       ---> हे सर्वस्वी दोन महत्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. 
'Competition' स्पर्धा ( किवर्ड साठी असलेल्या स्पर्धेत वरचढ ठरणे)आणि 'Search Frequency' ( तो किवर्ड शोधल्याची वारंवारता) 
                   
   i ) सर्वात मूलभूत (basic) अशी गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे की 'Head' प्रकारच्या किवर्डमध्ये केवळ एक शद्ब असतो. आणि त्यासाठी अर्थातचं खूप स्पर्धा असणार. त्यामुळे किवर्ड ला रँक होण्यासाठी खूप झगडावे लागते. 'Search Frequency' त्या किवर्डसाठी खूप जास्त असते म्हणजे तो वारंवार search केला गेलेला असतो.
      
    ii ) 'Body' ह्या प्रकारात कीवर्ड ची लांबी २ ते ३ शद्ब इतकी असणे म्हणजे थोडे कमी स्पर्धात्मक असतात. 'Head' कीवर्ड च्या तुलनेत 'Search Frequency' किंवा 'Volume' कमी असते. 
      
    iii) 'Long Tail keywords' ह्यामध्ये किवर्ड लांबी ४ ते ५ शब्दांपर्यंत किंवा त्याहून अधिक लांबीचे ( शब्दसमूह) असतात. यासाठी 'Search Frequency' कमी आणि स्पर्धाही कमी असते. कमी स्पर्धा ह्याचा अर्थ रँकही वरती होऊ शकते. 

How does SEO work? SEO कसे कार्य करते?
SEO - Content Relevancy


जेव्हा सर्फर Google, Microsoft Bing, Yahoo यांसारख्या Search Engines वर शोध घेतात तेव्हा त्या शब्दसंज्ञे संबंधित परिणामाची यादी दाखवली जाते. या परिणाम किंवा shown results ला Search Engine Results Page ( SERPs )म्हणतात. What does Search Engine Results Page Mean? 

आणि अर्थातच जी संकेतस्थळे SERPs वर सर्वाधिक वरती मिळतात किंवा सर्च इंजिनद्वारे Search Engine दाखवली जातात त्या संकेतस्थळांना searchers शोधणाऱ्यांकडून भरपूर traffic मिळू शकतो.

SERPs वर तुमची position दर्शवण्यासाठी किंवा स्थान प्रस्थापित करण्यासाठी, शोध इंजिन Search Engine यासाठी त्यांचे स्वतःचे प्रमेय (SEO Rank Algorithms) वापरतात. हे प्रमेय algorithms काय आहेत? हे कोणालाही शोधणे, कोणालाही माहीत करून घेणे खूप कठिण असते.

पण आपल्या संकेतस्थळावर ( Website) रहदारी ( traffic) आणणे किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वरून आपल्या संकेतस्थळावर navigate करणे सोपे आहे. आणि त्यातही आपला मजकूर ( content )सध्य काळात जर लोकप्रिय असणे आणि त्यासंबंधीत ( Relevant)असणे महत्वाचे!

सोपे navigate करू शकता याचा अर्थ असा की, दुवांद्वारे ( Links) अतिशय सहजपणे थेट त्या page ( पानावर ) पोहचले जाऊ शकता.

तुमच्या वेबसाईटचा आढावा घेण्यासाठी, Search Engine ला किंवा वापरकर्त्यांना एक sitemap तयार दाखवणे गरजेचे आहे.

2) Optimization -: 

a) Off - Page Optimization

तुमची वेबसाइट ( संकेतस्थळ) लोकप्रिय बनविण्यासाठी तुम्हाला थेट संकेतस्थळावर दुवा मिळणे गरजेचे आहे. ह्यालाचं 'backlinks' देणे असेही म्हंटले जाते. हा 'Off Page Optimization' चाही भाग समजला जातो. परस्परसंबंधित दुवे ( Reciprocal Links) म्हणजे दुसऱ्यांच्या साइटच्या दुव्याच्या बदल्यात तुमच्या वेबसाइटवरील दुवे. 

b)On - Page Optimization 

तुमच्या मजकुरावरून (content ) प्रासंगिकतेचा ( Relevancy ) समतोल राखला जातो. किवर्ड्स चा योग्य त्या ठिकाणी वापर करून Search Engine च्या नजरेत येऊ शकता. केवळ वेबसाईटच्या मजकुरात केलेला फेरबदल किंवा त्यात किवर्ड्स जोडणे. ह्यालाचं ' On - Page Optimization' म्हणतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तीन भागांत कीवर्ड place करू शकता.

     A) Title 
   B) Meta- Tags किंवा Meta - Description 
     C) Meta - Slugs किंवा URL 

काही ठिकाणी 'Focus Keyphrase' ही विचारले जाते. शीर्षकासाठी (Title) ५५ अक्षरांपर्यंत (characters) केलेला वापर कधीही उत्तम!
On-Page Optimization in SEO


Meta-tags किंवा Meta-Description मध्ये १५० ते १५५ अक्षरांपर्यंत वापर केलेला उत्तमच! 
आणि Meta - Slugs किंवा URL देखील तुमच्या मजकुराच्या संबंधित असणे आवश्यक आहे. त्याचीही अक्षर ( characters) मर्यादा ७५ च्या आसपास असणे चांगलेच!

ह्यात केलेला किवर्ड्स चा वापर search engine ला relevant content( संबंधित मजकूर) असल्याचे सुचवितात.

ह्यासर्व गोष्टी एकत्र केल्या की तुम्ही Search इंजिन्स ना यशस्वीरीत्या पटवू शकता की तुमची वेबसाईट SERPs ( Search Engine Results Page) च्या अग्रस्थानी असायला पात्र आहे. 
यासर्व गोष्टींना वेळ हा लागतोच, ते सर्वस्वी तुमच्या मजकुरावर अवलंबून आहे.

त्या सोबत सर्व लहान मोठ्या ( Keywords Research to Meta Description) गोष्टींवर आणि घेतलेल्या कष्टांवरही अवलंबून आहे. SEO म्हणजे काय?  - What does SEO mean in Marathi

लेख - अनिकेत कुंदे