नमस्कार मित्रांनो,
ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi मागील काही वर्षांपासून आपण सर्वच जण “ ईडी " हे नाव जरूर ऐकत असाल, आणि बातम्यामध्ये देखील ईडी विषयी बऱ्याच चर्चा आणि बातम्या येताना आपल्याला दिसतात. ईडीने भल्याभल्यांना चांगलाचं घाम फोडलाय. हे ईडी म्हणजे नेमकं काय हे आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
ED म्हणजे काय ? Ed full form marathi !!
मित्रांनो ईडी( ED )म्हणजेच Enforcement Directorate. यालाच मराठीमध्ये अंमलबजावणी / प्रवर्तन संचलनालय असे संबोधले जाते.
ED काय काम करते? ED work in marathi
ईडी मुख्यतः भारतातील आर्थिक घोटाळ्यांचा तपास करते. भारतातील आर्थिक घोटाळे शोधून काढणे व त्यांच्यावर कारवाई करणे हे ईडी चे प्रमुख काम आहे. आणि या ईडी ची स्थापना दिल्ली येथे 1 में 1956 साली झाली. या ईडी ची प्रमुख 5 प्रादेशिक कार्यालये आहेत, जी मुंबई, चेन्नई, चंदीगड, कोलकाता आणि दिल्ली येथे स्थीत आहेत. भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाअंतर्गत ईडी काम करते. ईडी चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. FEMA ( foreign exchange management act ) आणि PMLA ( prevention of money laundering act) या दोन कायद्याअंतर्गत जे काही गुन्हे दाखल होतात त्यांचा तपास करण्याचे काम प्रामुख्याने ईडी करत असते.
FEMA ( foreign exchange management act) :-
फेमा म्हणजे, भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी व्यापार केला जातो, आणि यामुळेच परदेशी चलन भारतीय बाजारपेठामध्ये येत असते, अशा वेळेस त्या चलनाचा विनिमय योग्यरीत्या राहावा, यासाठीच “ परकीय चलन विनिमय कायदा " म्हणजेच “फेमा" ची स्थापना करण्यात आली. परकीय चलनाचे रॅकेटइंग करणे, निर्यात प्रक्रिया पूर्ण न करणे किंवा बऱ्याच वेळेस परकीय चलन परत न करणे, अशा अनेक गुन्ह्यांसाठी फेमा अंतर्गत कारवाई केली जाते. फेमा अंतर्गत घोटाळा केलेल्या गुन्ह्यांच्या तीन पट दंड ईडी आकारू शकते.
फेमाचा उद्देश भारत या देशामध्ये फॉरेन ट्रेड आणि पेमेंट ला Promote करणे हा आहे. फेमा भारतातल्या सर्व व्यक्तींना हे स्वातंत्र्य देते की ती व्यक्ती विदेशामध्ये स्वतःची प्रॉपर्टी खरेदी करू शकते, किंवा खरेदी केली प्रॉपर्टी विकू देखील शकते. पण ही गोष्ट करत असताना जर यात कोणी घोटाळा केला तर यावर ईडी एक्शन घेते.
अधिक वाचा : कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | Power of Attorney meaning in marathi
PMLA ( prevention of money laundering act ):-
मराठीमध्ये याला मुद्रा रूपांतरण प्रतिबंध असे म्हटले जाते. व या कायद्याची स्थापना 2002 साली झाली. हा कायदा फौजदारी गुन्ह्यांसंबंधातील आहे म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार, संपत्ती जप्त करणे, संपत्ती हस्तांतरित करणे, इत्यादी कारवाई ईडी करू शकते. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे अवैध मार्गाने कमावलेला काळा पैसा वैध दाखवणे. बऱ्याच वेळा मनी लॉन्ड्रिंग केलेला हा काळा पैसा हा अशा ठिकाणी इन्वेस्ट केला जातो की इन्व्हेस्टिंग एजन्सिज ला देखील या पैशाचे स्त्रोत समजून येत नाही. मग अशावेळी हा काळा पैसा शोधून काढणे, जप्त करणे व गुन्हेगार व्यक्तींविरोधात खटला भरण्याचे काम ED करत असते.
Read About: What Is Money Mindset?
PMLA अंतर्गत ईडी काय करू शकते?
1) या गुन्ह्या अंतर्गातील प्रकरणे PML कोर्टामध्ये चालवली जातात.
2) ईडी अधिकाऱ्यासमोर केलेलं स्टेटमेंट कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं.
3) FIR नसतानाही ED अटक करू शकते.
4) ED ने अटक केल्यानंतर जामीन मिळणे देखील फार कठीण असते.
5) आरोपीची संपत्ती जप्त किंवा अटॅच करु शकते.
6) ईडीने जप्त केलेली संपत्ती पुन्हा परत मिळणे कायद्याच्या दृष्टीने देखील फार अवघड असते.
एकंदरीत म्हणायचं झालं तर PMLA या कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगार असलेल्या व्यक्तीवर खटला भरणे, केस चालवणे, अटक करणे व संबंधित गुन्हेगार व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार ईडीला असतात.
• ईडी स्वतःहून केस दाखल करू शकत नाही, म्हणजेच एखादी तपास यंत्रणा जसे की सीआयडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, यांनी एखादी केस त्यांच्याकडे आल्यानंतर ईडी कडे सोपवावी असे सुचवावे लागते. त्यानंतरच ईडी इन्फोर्मेशन केस रिपोर्ट तयार करू शकते.
अधिक वाचा : Rich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश
ईडी ने आतापर्यंत कोणा-कोणाची चौकशी केलेली आहे?
पुण्यातील बिझनेसमन हसन अली खान याची ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आलेली होती. ईडीच्या रडारवर आलेली ही सर्वात पहिली हायप्रोफाईल केस होती.
यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात मोठी केस होती ती छगन भुजबळ यांची. दिल्लीतील महाराष्ट्र सदन निर्माणाच्या कार्यात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली होती. यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा देखील झाली. आणि त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. ईडी कडे स्वतःची कोठडी नसल्याकारणाने अशा आरोपींना सामान्य तुरुंगातच ठेवलं जातं. छगन भुजबळ यांची अवस्था बघितल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ईडी ची धास्तीच घेतलेली आहे. ईडीने अटक केल्यानंतर नक्की काय होऊ शकतं हे भुजबळ यांच्या अटकेनंतर प्रकर्षानं सर्वांना जाणवलं आहे.
यानंतर एकनाथ खडसे, शरद पवार, राज ठाकरे, वर्षा राऊत, प्रताप सरनाईक इत्यादी लोकांनादेखील ईडीने नोटीस पाठवली होती.
याच बरोबर नीरव मोदी, विजय मल्ल्या, रॉबर्ट वाड्रा इ. यांच्यावर देखील ईडी ने कारवाई केलेली आहे.
अधिक वाचा : म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ? | mutual fund investment in marathi
तर मित्रांनो आम्ही अशी आशा करतो की, ED full form in marathi | ईडी म्हणजेच ( Enforcement Directorate ) अंमलबजावणी संचलनालय या संस्थेबद्दल ची आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद !!