नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market information in marathi | share market marathi information आजच्या जगामध्ये तुम्हाला क्वचितच असा कोणी माणूस सापडेल ज्याला श्रीमंत व्हायचे नाही. स्वतः जवळ पैसे असले की माणूस सर्व काही करू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी सतत धडपडत असतो, कष्ट करत असतो. पण जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर इन्व्हेस्टमेंट करणे फार गरजेचे असते. काहीजण स्वतःच्या उद्योगधंद्यांमधून पैसे कमावतात तर काहीजण, तर काही जण विविध कंपन्यानंमध्ये नोकरी करून पैसे कमवत असतात. आणि मग त्यातून मिळणार्या तुटपुंज्या पगारातून मध्यमवर्गीय माणसं इन्वेस्ट तर नाही पण फक्त सेविंग करत असतात. पण ती सेविंग तुम्हाला कधीही श्रीमंत बनवू शकत नाही.
ह्या जगामध्ये दोन प्रकारची लोकं असतात, एक म्हणजे जॉब देणारे व दुसरे म्हणजे जॉब घेणारे. जॉब देणारे लोक मुख्यतः उद्योगपती असतात, बऱ्याच वेळेला ते जॉब घेणाऱ्यांपेक्षा म्हणजेच नोकरी करणाऱ्या वर्गापेक्षा अधिक श्रीमंत असतात. आणि त्याचबरोबर त्यांचे Capital (भांडवल ) देखील अधिक असते. जर तुम्ही स्वतः कुठला बिजनेस करू शकत नाही तर तुम्ही एखाद्या चांगल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून बक्कळ पैसे कमावू शकता. आपण विविध कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स विकत घेत असतो. तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये शेअर मार्केट म्हणजे काय? या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये शेअर मार्केट चे नाव तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये वाचले ऐकले असेल. बऱ्याच लोकांना शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार वाटतो. पण मित्रांनो असे काहीही नसून शेअर मार्केट हे अभ्यास करून वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे क्षेत्र आहे.
शेअर मार्केट म्हणजे काय? share market guide in marathi
मित्रानो शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, आणि इक्विटी मार्केट हे सर्व एकच आहे. शेअर मार्केट म्हणजे असं मार्केट जिथे तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता किंवा विकत असता. शेअर्स खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीची काही प्रमाणात मालकी ( Ownership ) खरेदी करणे. म्हणजे एखाद्या कंपनीला जर प्रॉफिट झाला, तर त्या प्रॉफिट मधील काही हिस्सा हा तुम्हाला देखील मिळणार किंवा जर कंपनीला तोटा (loss ) झाला तर तो देखील तुम्हाला सहन करावा लागणार असतो.
आता एक उदाहरण घेऊन आपण हे आणखी समजून घेऊ... समजा तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे व त्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपयांची गरज आहे. पण तुमच्याकडे आत्ता फक्त दहा हजार रुपये भांडवल शिल्लक आहे, आणि म्हणून तुम्ही तुमच्या मित्राकडे पैसे मागायला जाता, व त्याला तुमच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी दहा हजार रुपये मागता व 50:50 भागीदारी म्हणजेच partnership देऊ करता. तर आता तुमचा तो मित्र तुमच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवूण बरोबरीचा हिस्सेदार झाला आहे. म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये पुढे पाच हजार रुपयाचा नफा झाला तर पन्नास टक्के प्रमाणे अडीच हजार रुपये, तुमच्या मित्राला देणे तुम्हाला भाग आहे. अगदी असेच शेअर मार्केटमध्ये देखील होते, फक्त त्याचे प्रमाण मोठे असते.
ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi - माहिती वाचा
स्टॉक एक्सचेंज ( Stock Exchange ) म्हणजे काय?
मित्रांनो स्टॉक एक्सचेंज ही एक अशी जागा आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी व विक्री केले जातात. जसे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ही बिल्डिंग मुंबई येथे स्थित आहे. मित्रांनो आता आपण ऑनलाइन शेअर्स खरेदी विक्री करू शकतो पण जेव्हा इंटरनेट आणि लोकांकडे फोन देखील नव्हते त्यावेळेस, लोकं या ठिकाणी जाऊन शेअर्स खरेदी- विक्री करत असत.
शेअर मार्केट मध्ये कंपनीकडे किती शेअर्स असू शकतात?
मित्रांनो जर समजा एखाद्या कंपनीला त्यांचा बिझनेस Expand करण्यासाठी एक लाख रुपयांची गरज असेल, तर ती कंपनी स्वतःचे शेअर्स लोकांना issue करते. हे पूर्णतः कंपनी वर डिपेंड असते की ते त्यांच्या एका शेअर्सची किंमत किती ठेवू शकतात. जसे की वरील कंपनी एक रुपयाचे एक लाख शेअर्स इशू करू शकते, किंवा 0.50 पैशाचे दोन लाख shares देखील इशू करू शकते.
एक गोष्ट इकडे लक्ष देण्यासारखी ही आहे की कंपनीच्या सर्व शेअर्सची किंमत सर्वांसाठी एकच असते.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की कोणतीही कंपनी आपले सर्वच्या सर्व शेअर्स लोकांना देऊ करत नाही. Shares मधील जास्तीत जास्त टक्के कंपनीचे मालक स्वतः hold करतात. या टक्क्यांचे प्रमाण 100 पैकी 51% किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते. असे केल्यामुळे कंपनीच्या मालकाकडे कंपनीचे डिसिजन घेण्याची power टिकून राहते.
उदा :- फेसबुक कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे फेसबुक कंपनीचे साठ टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. त्यामुळे कंपनीसाठी चे सर्व निर्णय ते स्वतः घेऊ शकतात.
आता जे तुम्ही शेअर्स खरेदी केलेले आहेत, ते इतरांनाही विकू शकता, आणि यालाच Secondary Market असे संबोधले जाते. यामध्ये सर्व कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री, ट्रेडिंग केली जाते. व आता कंपनीने Issue केलेल्या शेअर्सची किंमत नेहमी वर खाली होत असते, व हे सर्व त्या कंपनीच्या शेअर्सचा Demand आणि Supply वर अवलंबून असते.
भारतातील स्टॉक एक्सचेंज
bombay stock exchange information in marathi
सर्व मोठमोठ्या देशांमध्ये जसे की अमेरिका,चीन, रशिया, इंग्लंड, इत्यादीमध्ये आपले stock exchnage असतात. तसेच भारतात देखील दोन सर्वात प्रसिद्ध Stock Exchange आहेत. त्यातील पहिले आहे Bombay Stock Exchange. ज्यामध्ये जवळपास 5400 पेक्षा अधिक कंपन्यानी आपली नावे नोंदवून आपल्या कंपनीचे शेअर्स Issue केलेले आहेत.
National Stock Exchange
तर दुसरे आहे National Stock Exchange आणि यामध्ये जवळपास 1700 कंपन्यांनी आपली नावे नोंदवून आपले शेअर्स बाजारात ISSUE केलेले आहेत.
पण जर आता तुम्हाला कोणी विचारले की या सर्व कंपन्यांचे शेअर्स Overall वाढत आहेत की खाली जात आहेत? तर तुम्हाला कसे समजणार?आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यासाठी सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty) ही मेजरमेंट तयार करण्यात आलेली आहेत.
What Is Sensex? सेन्सेक्स म्हणजे काय? bse sensex
मित्रांनो सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला Registered असणाऱ्या Top 30 कंपन्यांचा एक Average Trend काढून या सर्व कंपन्यांचे शेअर्सची किंमत वाढत आहे की खाली जात आहे हे दर्शवते. जसे की आज sensex 54 हजारावर गेलेला आहे, ( sensex index ) तर मागच्या दोन वर्षांपूर्वी आज सेन्सेक्स 40 हजारांवर होता. तर 40 ते 50 वर्षांपूर्वी याच सेन्सेक्सची किंमत जवळपास 500 ते 1000 होती.
याचा अर्थ असा की जर चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही सेन्सेक्समध्ये पाचशे रुपये गुंतवले असते तर आज त्याचे तब्बल 54 हजार रुपये झाले असते. जर तुम्ही या नंबरला भूतकाळ आणि वर्तमान काळ असे Compare करून बघितले तर तुमच्या लक्षात येईल कि सेन्सेक्स हा नेहमी वाढतच गेला आहे. म्हणजेच सेन्सेक्स मधील टॉप 30 कंपन्या या नेहमीच Grow होत राहिल्या आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला असाच आपला निफ्टी इंडेक्स आहे, जो (nifty50) National + 50 म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ला, Registered असणाऱ्या कंपन्यांपैकी टॉप 50 कंपन्यांचा overall performance या आकड्या स्वरूपात दर्शवते.
अधिक वाचा : कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | Power of Attorney meaning in marathi
एखादी कंपनी आपले शेअर्स कसे बाजारात आणते? IPO | Initial Public Offering म्हणजे काय ?
जर एखाद्या कंपनीला आपले शेअर्स एखाद्या स्टॉक एक्सचेंज कडे जाऊन विकायचे असतील तर याला Public Listing असे संबोधले जाते. जर कोणती कंपनी हे पहिल्यांदा करत असेल तर याला आयपीओ (IPO ) असे संबोधले जाते याचा अर्थ असा की “ इनिशियल पब्लिक ऑफरिंग ".
पूर्वीच्या काळामध्ये आपले शेअर्स बाजारात आणून विकणे हे फार सोपे होते, पण आता तसे राहिले नाही. आताच्या वेळेस ही procedure खूपच कॉम्प्लिकेटेड आणि मोठी बनवली गेलेली आहे, जे करने गरजेचे होते, कारण उद्या कोणीही आपली स्वतःची खोटी कंपनी बनवून, आपले shares बाजारात Issue करून लोकांचे पैसे घेऊन पळून जाऊ शकते. आणि भारतामध्ये यापूर्वी असे मोठ मोठे घोटाळे घडले देखील आहेत, जसे की हर्षद मेहता स्कॅम किंवा सत्यम कम्प्युटर स्कॅम.
या सर्व गोष्टींमुळेच रेगुलेशन्स आणि रुल्स खूपच मजबूत करण्यात आलेले आहेत जेणेकरून भविष्यात कोणतेही घोटाळे घडू नयेत. भारतामध्ये SEBI ( securities and exchange Board of India) एक रेग्युलेटरी बॉडी आहे जी भारतातील कोणत्या कंपनीचे शेअर्स बाजारामध्ये Issue करायचे व नाही ते ठरवते. त्याचबरोबर जर तुमच्या कंपनीला पब्लिकली लिस्टिंग करायचे असेल, तर 50 हून अधिक शेअरं होल्डर असले पाहिजेत. त्याचबरोबर जर मार्केटमध्ये तुमच्या शेअर्सची डिमांड नसेल तर सेबी तुमच्या कंपनीला शेअर बाजारातून हटवू देखील शकते.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? शेअर मार्केट अभ्यास
मित्रांनो जेव्हा लोकांकडे फोन्स आणि इंटरनेटची सुविधा नव्हती त्यावेळेस लोक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज च्या इमारतीमध्ये जाऊन शेअरची खरेदी विक्री करत असत. परंतु आता तुम्ही घर बसल्या देखील शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. आणि यासाठी तुम्हाला पुढील तीन गोष्टींची गरज आहे.
1) बँक अकाउंट.
2) ट्रेडिंग अकाउंट.
3) डिमॅट अकाउंट
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत, त्यामुळे तुमचे कोणत्याही बँकेत अकाऊंट असायला हवे. यानंतर ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. आणि
डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? | demat account meaning in marathi
डिमॅट अकाउंट एक असे अकाउंट असते जिथे तुम्ही खरेदी केलेले शेअर्स, Digitally Stored होतात.
आज-काल खूप साऱ्या अशा बँक देखील उपलब्ध आहेत ज्या थ्री इन वन, अकाउंट ची सुविधा आपल्या ग्राहकांना पुरवत आहेत. आपल्यासारखी सामान्य माणसे जेव्हा शेअर्स खरेदी करतात तेव्हा त्यांना रिटेल इन्वेस्टर असे म्हटले जाते. व ह्या सर्व Retail Investers ला एका Broker/Agent ची गरज असते, Broker म्हणजे एक अशी व्यक्ती जी, शेअर्स विकणार्याला व विकत घेणाऱ्याला जोडत असते. व या बदल्यात ते आपले Commission घेतात ज्यालाच brokerage rate असे म्हटले जाते.
आपल्यासाठी आपला ब्रोकर कोणीही असू शकते जसे की तुमची बँक, एखादे एप्लीकेशन, किंवा एखादा प्लॅटफॉर्म जिथे शेअर्स खरेदी व विक्री केले जाऊ शकतात. ब्रोकरेज रेट मुख्यतः बँक 1 % पर्यंत आकारतात. जे की जास्त आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये इतर Sources बघितले तर काहीजण 0.05 ते 0.1 एवढा कमी ब्रोकरेज रेट देखील आकारात असतात.
Investing आणि Trading यात काय फरक आहे? | share market trading information in marathi
अधिक वाचा : म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ? | mutual fund investment in marathi
Share market दररोज सकाळी 9.10 ला सुरु होते ते 3.30 ला बंद होते. जे लोक विविध कंपन्यांचे शेअर्स सकाळी घेऊन त्याच दिवशी विकतात, किंवा एकाच दिवशी विकत घेऊन त्याच दिवशी विकतात अशांना ट्रेडर्स म्हटले जाते. असे ट्रेडर्स दररोज हेच काम करत असतात आणि पैसे कमावत असतात.
तर दुसर्या बाजूला जे लोक शेअर्स खरेदी करून, दीर्घकाळासाठी त्यांना hold करून ठेवतात म्हणजेच लवकर विकत नाही , अशांना इन्वेस्टर असे म्हटले जाते. असे लोकं shares कमी किमतीत विकत घेऊन दीर्घकाळासाठी hold करून ठेवतात व नफा कमवत असतात.
बरेच लोक शेअर मार्केटला सट्टा बाजार समजतात, पण असे कदापि नसून शेअर मार्केट हे नफा मिळविण्याचे उत्तम साधन आहे. फक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम कंपन्या शोधून त्यामध्ये इन्व्हेस्ट करणे जर तुम्हाला जमले तर तुम्ही देखील उत्तम पैसे कमवू शकता. तर मित्रांनो शेअर मार्केट बद्दल ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद !! "शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market information in marathi" वाचल्याबद्दल !!