गुरुपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | guru purnima in marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः !!
नमस्कार मित्रांनो,
एखादं बाळ जेंव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला कोणत्याही गोष्टीची माहिती नसते, आजूबाजूला बघत, ऐकत ते सर्व काही आत्मसात करत असते. हळू हळू त्याची आई त्या लहान बाळाला बोलायला शिकवते, बोट धरून चालायला शिकवते, आणि त्याच्यावर योग्य ते संस्कार करते, आणि म्हणूनच ती "आई" त्या बाळाची पहिली गुरु ठरते.
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे गुरु आपल्याला भेटत असतात, शाळेत गेल्यावर शाळेतले शिक्षक, किंवा मग महाविद्यालयात गेल्यावर त्या कॉलेजचे प्राध्यापक आपले गुरु बनतात. आपल्या आयुष्यामध्ये जो कोणी व्यक्ती आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतो, ती व्यक्ती ही आपली गुरूच असते, आणि अशा सर्व गुरूंच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
आजच्या लेखामध्ये आपण याच गुरुपौर्णिमेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
गुरुपौर्णिमा माहिती मराठी | guru purnima in marathi speech
मानवी जीवनामध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. "गु" म्हणजे अज्ञान आणि "रु " म्हणजे प्रकाश! अज्ञानाच्या अंधारापासून जो व्यक्ती आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो त्यालाच गुरु म्हटलं जातं.
भारतामध्ये आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु आणि शिष्य यांची फार मोठी परंपरा भारताला पुरातन काळापासून लाभलेली आहे. या दिवशी गुरु बद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केलं जातं प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमा फार मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या पौर्णिमेला "व्यास पौर्णिमा" म्हणून देखील ओळखलं जातं, कारण याच दिवशी ऋषी व्यास यांचा जन्म झाला होता, पुढे जाऊन याच व्यास ऋषींनी महाभारत, ब्रह्मसूत्र, मिमांसा, श्रीमद्भागवत, इत्यादी पवित्र ग्रंथांचे लेखन केलं. निस्वार्थपणे ज्ञान देणाऱ्या गुरुंसाठी या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी श्रेष्ठ समजला जातो, याचं एक मुख्य कारण म्हणजे मनुष्याकडे विद्या आत्मसात करण्याची बुद्धी आहे, आणि ही विद्या देण्याचं काम हे गुरूच करत असतात. आपल्याला जन्म देणारी आपली आई ही पहिला गुरु असते, लहानपणापासून आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींचे ज्ञान ती देत असते. त्यानंतर आपल्या शाळेतील शिक्षक हे आपले दुसरा गुरु असतात. जसा एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतो अगदी तसेच कार्य गुरु देखील करतात, वडिलांमुळे आपल्याला देह प्राप्त होतो पण शाश्वत ज्ञान, कीर्ती, महानता आणि यश हे गुरूंमुळेच साध्य होते.
guru purnima quotes in marathi
आई प्रमाणेच गुरु या शब्दाला देखील मर्यादा नाही. सागरामध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या जहाजाला दिशा दाखवण्यासाठी होकायंत्राची गरज भासते, अगदी याप्रमाणेच या मायावी जगात वावरणाऱ्या मनुष्याला योग्य ती दिशा दर्शवण्यासाठी गुरूंची गरज भासतेच. अन्यथा या मतलबी जगामध्ये मनुष्य कुठल्या कुठे भरकटला जाईल, आणि लाखमोलाचं मनुष्याचं हे जीवन असेच वाया जाईल.
या महान राष्ट्राला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला, संत महात्म्यांचा देश म्हणून ओळखले जाते. आणि या संतांनी आपल्या कार्याचं सर्व श्रेय हे आपल्या गुरूंना समर्पित केलेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत गोराकुंभार, संत तुकाराम, संत कबीर, संत मुक्ताबाई या व यांसारखे अनेक थोर संतांनी आपल्या कार्याचं सर्व श्रेय आपल्या गुरूंना समर्पित केलेलं आहे, आणि म्हणूनच वाल्मिकींचा आदर्शवाद, गुरु व्यासांचा व्यवहारवाद, गुरु द्रोणाचार्य यांची कर्तव्यनिष्ठा आजही गौरवली जाते.
महाभारताच्या वेळी गुरु द्रोणाचार्य यांच्या पुतळ्याला गुरु मानून धनुर्विद्येमध्ये निपुणता प्राप्त करणारा " एकलव्य " याची त्याच्या गुरुंवरती असलेली अपार श्रद्धा आणि निष्ठा आजही आपण विसरू शकत नाही. याच द्रोणाचार्यांनी गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा म्हणून एकलव्य ला उजव्या हाताचा अंगठा मागितला, आणि क्षणाचाही विचार न करता एकलव्यने आपला अंगठा काढून गुरूंना दिला, त्याला हे माहिती होतं की यानंतर तो धनुष्य-बाण चालवू शकत नाही, तरीसुद्धा हे धाडस त्यांने केलं ते केवळ आणि केवळ त्याच्या गुरूंवर असलेल्या प्रेमापोटी आणि श्रद्धेपोटी आणि आपल्या गुरूंनी फक्त अंगठाचं मागितला म्हणून एकलव्य ने रडायला सुरुवात केली, आपल्या गुरूंनी आपल्याला स्वतःचे शिष देखील मागितले असते तरी काढून पायावर ठेवले असते, असे त्याने बोलून दाखवले.
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांचे गुरु माँ जिजाऊ होत्या, लहानपनापासून त्यांनी शिवरायांना अध्यात्म, महाभारत, रामायण इत्यादींच्या कथा ऐकवल्या, आणि या हिंदुस्थानाला या राक्षसांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्याचबरोबर शिवरायांना शस्त्राचे शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव हे दुसरे गुरू ठरले. त्यांनी शिवरायांना अनेक शस्त्रे चालवण्यामध्ये पारंगत केले. आणि त्यानंतर युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला तो आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.
आपल्या क्षेत्रात आपल्याला सर्वोच्च ठिकाणी पोहचवण्याचं काम हे आपले गुरूच करत असतात. अलीकडच्या काळात बघितलं तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर, भारतरत्न लता मंगेशकर यांचे गुरु पंडित दीनानाथ मंगेशकर, इत्यादी अनेक दिग्गज लोकांनी आपल्या सर्व आयुष्यचं श्रेय हे आपल्या गुरूंना समर्पित केलेलं आहे.
guru purnima quotes marathi | guru purnima speech in marathi
भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य या नात्याला खूपच पवित्र मानले गेले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना गुरुदक्षिणा दिली जाते. पुरातन काळामध्ये शिष्य हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुंकडे वास्तव्यास असत. स्वतःचे घर सोडून सुख, सोयीसुविधा सोडून ज्ञानप्राप्तीसाठी पूर्वीचे शिष्य गुरुकुल मध्ये राहत असत. भारतामध्ये पूर्वीच्या काळी अनेक गुरुकुल होते, भारतातूनच नव्हे तर विदेशातून देखील, लोकं ज्ञानप्राप्तीसाठी भारतामध्ये यायचे. आज जरी ही गुरुकुल परंपरा कमी झालेली असली तरी देखील गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून घेणे ही परंपरा आजही चालू आहे आणि यापुढेही अविरत चालू राहील यात शंका नाही.
भारतीय गुरु-शिष्य परंपरेत अनेक जोड्या सुप्रसिद्ध आहेत, जसे की विश्वामित्र आणि राम, शुक्राचार्य आणि जनक, द्रोणाचार्य आणि अर्जुन इत्यादी. तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर एक चांगला गुरु हा तुम्हाला शोधावा लागेल, आणि त्यानंतर त्या गुरुच्या आज्ञेचे पालन तुम्ही केलं पाहिजे. गुरूला वयाचं, रूपाचं, जाती धर्माचं बंधन नसतं.
गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे प्रेरणा, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे आदर्श, आणि गुरु म्हणजेच ज्ञान, वं हेच ज्ञान योग्यरीत्या आत्मसात करून आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे, आणि आपल्या गुरूंसाठी तीच खरी गुरुदक्षिणा ठरेल...!!
शेवटी आयुष्यात कितीही मोठे व्हा परंतु आपल्या गुरूंना कधीही विसरू नका, त्यांनी दिलेल्या ज्ञान मार्गावर आयुष्यभर चालत राहा तर आणि तरच तुमचा आणि संबंध समाजाचा उद्धार होईल..! guru purnima marathi
आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे,
गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार,
गुरु म्हणजेच माय-बाप,
गुरू-शरणी जाता हरतील सारे व्याप !!
गुरूपौर्णिमेंवरील 'गुरुपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | guru purnima in marathi' हा विशेष लेख आपल्याला कसा वाटला, हे कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद!!