विनायक दामोदर सावरकर यांची माहिती | Savarkar | Veer Savarkar information in Marathi
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.....
-- स्वातंत्र्यवीर सावरकर.
वीर सावरकर | swatantra veer savarkar information in marathi
अनेक क्रांतिवीरांनी आयुष्यात फक्त एकदाच मिळणारा मानव जन्म यासाठी खर्ची घातला, आपला सुखी संसार त्यागला, रात्रंदिवस फक्त आणि फक्त देशाचाच विचार केला. आज आपण अशा एका महान, आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या क्रांतिवीरा बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने ब्रिटिश सरकारच्या पायावरच घाव घालून, ते मातीत मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, नंतर आलेल्या कित्येक मोठ्या क्रांतिवीरांनी सुद्धा ज्यांचा आदर्श घेतला, असे या भारतभूमीला लाभलेले विरपुत्र " विनायक दामोदर सावरकर " vinayak damodar savarkar अर्थात " वीर सावरकर ". veer savarkar
सावरकरांचा जन्म आणि शिक्षण
28 मे 1883 रोजी नाशिक मधल्या भगुर गावात, एका ब्राह्मण कुटुंबात " विनायक दामोदर सावरकर " यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव दामोदर सावरकर, तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांना अजून दोन भाऊ व एक बहीण सुद्धा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालयात झाले. सावरकर अगदी लहानपणापासूनच अत्यंत प्रभावशाली, हुशार आणि चौकस बुद्धीचे होते. त्यांची आई नेहमी त्यांना महाभारतातील, रामायणातील, शिवाजी महाराजांच्या कथा सांगायची. जेव्हा त्यांचं वय वर्षं नऊ होतं, तेव्हाच नियतीने त्यांच्यावर पहिला घाला घातला आणि त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर सात वर्षांनी त्यांच्या वडिलांचे सुद्धा प्लेगमुळे निधन झाले. आता सर्व भावंडांची जबाबदारी विनायक सावरकर यांचे थोरले भाऊ म्हणजेच गणेश सावरकर ganesh damodar savarkar यांच्यावर आली होती.
सावरकर माहिती मराठी
सावरकर लहानपणापासूनच उत्तम नेतृत्व करायचे, शिवाजी विद्यालयातून 1901 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि याच वर्षी त्यांचं लग्न यमुनाबाई यांच्यासोबत झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यामध्ये आले, आणि प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1902 साली त्यांनी प्रवेश घेतला. ते BA चे शिक्षण घेत असतानाच देशामध्ये स्वदेशी चळवळीने जोर धरला होता. लोकमान्य टिळकांनी चालु केलेल्या या चळवळीमध्ये विदेशी वस्तूंची, कपड्यांची, अक्षरशः सर्वत्र होळी जळत होती आणि याच कार्यामध्ये वीर सावरकरांनी सुद्धा भाग घेतला होता. 1904 साली त्यांनी "अभिनव भारत" ची स्थापना केली. लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आशा पल्लवीत करण्याचा मुख्य हेतू या संस्थेचा होता. BA ची पदवी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते शिष्यवृत्ती मिळवून लंडनला गेले.
अधिक वाचा : नेल्सन मंडेला मराठी माहिती | Nelson Mandela Information in Marathi
लंडनला गेल्या नंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बांधलेल्या इंडिया हाऊसमध्ये ते राहिले, व पूर्णतः अभ्यासामध्ये गुंतून गेले, इंग्रजांनी लिहून ठेवलेली 1857 च्या उठावाची सर्व माहिती त्यांनी पुराव्यासकट गोळा केली, त्याच्यावर सखोल अभ्यास केला आणि 1909 साली स्वतः एक पुस्तक लिहिले ज्याचं नाव होतं " 1857 चे स्वातंत्र्यसमर " म्हणजेच " 1857 ची पहिली स्वातंत्र्याची लढाई ". सैनिकांनी सरकारविरोधात केलेले बंड या इंग्रजांच्या म्हणण्याला छेद देत ती स्वातंत्र्यासाठी ची पहिली लढाई होती हे त्यांनी या पुस्तका मार्फत सर्वसामान्यांना सांगितलं.
इंग्रज सरकारच्या डोळ्यात धूळ घालून घराघरात हे पुस्तक वाटले गेले. या पुस्तकाच्या छपाईसाठी सुद्धा त्यांना अथक प्रयत्न करावे लागले, थोर क्रांतिकारक ' भिकाजी कामा ' यांनी सावरकरांची यात भरपूर मदत केली. काही वर्षानंतर हेच पुस्तक कित्येक स्वातंत्र्य वीरांसाठी एक " भगवदगीताच " ठरली , हे पुस्तक वाचणे जणू काही सर्वांसाठी सक्तीचे झाले. अनेक स्वातंत्र्यवीर हे पुस्तक वाचून प्रेरित व्हायला लागले.
अधिक वाचा : भगत सिंग माहिती मराठी | Bhagat Singh Information in Marathi
आतापर्यंत ब्रिटिशांना त्यांच्या पुस्तकाबद्दल माहिती झाले होते, आणि ते फक्त वाटच बघत होते की कधी सावरकर आता त्यांच्या तावडीत सापडत आहेत, सावरकरांच्या विरुद्ध त्यांना पुरावे कधीच मिळायचे नाहीत, पण याला जर लवकर पकडले नाही तर ब्रिटिश तख्त उधळून लावायला याला वेळ लागणार नाही एवढी प्रचंड भीती इंग्रजांना बसली होती. पुढे जुलै 1909 सालीच सावरकरांच्या आणि स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित झालेले, सावरकरांचे मित्र मदन लाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी " कर्जन वायली " याची हत्या केली. ज्या पिस्तूल ने कर्जन वायली चा खून होतो ती पिस्तूल मदन लाल धिंग्रा यांना सावरकरच उपलब्ध करून देतात हे इंग्रजांना समजते. तसेच या सर्व सुनियोजीत कटामागे मुख्य Master Mind हे सावरकरच असतात.
सावरकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन याच वर्षी 17 वर्षांचे क्रांतिकारी " अनंत लक्ष्मण कान्हेरे " यांनी नाशिक मधल्या " AMT जॅक्सन " जो की त्यावेळस चा नाशिक जिल्ह्याचा ब्रिटिश जिल्हाधिकारी होता त्याची गोळ्या झाडून हत्या केली. आणि या सर्वामुळे सावरकर पोलिसांच्या नजरेत आले आणि 13 मार्च 1910 साली त्यांना पोलिसांनी लंडन येथून अटक केली. जेव्हा त्यांना पकडून भारतामध्ये आणण्यात येत होतं, त्या वेळेस जहाजामधील बाथरूमची खिडकी तोडून त्यांनी खवळलेल्या समुद्रामध्ये उडी टाकली, सुरक्षारक्षकांना समजताच त्यांनी सावरकरांवर गोळ्या झाडल्या, पण सावरकर त्यातून सुद्धा बचावले, थंड पाण्यामध्ये पोहत पोहत ते कसेबसे किनार्यापर्यंत आले पण स्थानिक पोलीसांनी पुन्हा एकदा त्यांना पकडले आणि ब्रिटीशांच्या हवाली केले.
सावरकरांना शिक्षा
पुढे त्यांना भारतामध्ये आणण्यात आले व त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला, आणि इथेच त्यांना इतिहासातील सुप्रसिद्ध " काळ्या पाण्याची " शिक्षा होते, म्हणजेच 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात येते.
अधिक वाचा : 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
4 जुलै 1911 साली त्यांना कुप्रसिद्ध असलेल्या अंदमान निकोबार या बेटावरील सेल्युलर जेल याठिकाणी पाठवण्यात आले. असं म्हटलं जायचं की जर तुम्हाला जीवंतपणी नर्क बघायचा असेल, तर या जेल ला भेट द्या. या जेलमध्ये खास करून क्रांतिकारी, व ज्यांनी इंग्रजांचे जगणे मुश्किल केले आहे अशांना इथे ठेवण्यात येत असत. सावरकरांवर सुद्धा या जेलमध्ये अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांना अवघ्या 7 बाय 11 च्या खोली मध्ये ठेवण्यात आले होते.
दिवसभर कष्ट, हाल, अपेक्षा सोसल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोक्यात फक्त देशाचेच क्रांतिकारी विचार चालत असत, आणि म्हणूनच ते इंग्रजांना नेहमी एका लेखणी साठी व कागदासाठी विनवणी करायचे, पण प्रत्येक वेळी इंग्रजांनी या गोष्टीला नकार दिला, मग सावरकरांनी यावर एक उपाय काढला व ते स्वतःच्या हातांची नखे वाढवून भिंतीवर कोरुन लिहायला लागले. ते भरपूर कवीता लिहायचे मग पाठ करायचे आणि त्या पुसून, नष्ट करून पुन्हा नवीन कवीता लिहायचे.
अधिक वाचा : बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
इंग्रजांच्या अमानुष अत्याचारामुळे ते फार हतबल झाले होते, आणि म्हणूनच त्यांनी 1911, 1913 व 1917 साली इंग्रजांना अनेक माफीनामे लिहून पाठवले. व इंग्रज सरकारविरुद्ध मी आता परत काही कुरघोड्या करणार नाही, त्याचबरोबर एका वकिला सोबत तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन अत्याचार नाही करू शकत अशी ब्रिटिशांना आव्हान करणारी पत्रे देखील त्यांनी लिहिली. ही सावरकरांची एक वेगळी रणनीती होती आणि यामधून त्यांचं चातुर्य आपल्या लक्षात येते.
शेवटी त्यांचे बरेच माफीनामे मिळाल्या नंतर, तसेच भारतातून सुद्धा त्यांना सोडायची मागणी तीव्र झाल्यानंतर अखेर 2 मे 1921 साली बाबाराव व विनायक सावरकर यांची रवानगी भारतात होते. पुढे त्यांना बंगाल मधील अलिपूर आणि रत्नागिरीतील बंदिवसात ठेवण्यात येते. तिथून त्यांना पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात येते. आणि अखेर राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जायचे नाही या दोन अटींसह त्यांची येरवडा जेल मधून सुटका करण्यात आली.
Books written by savarkar in marathi | सावरकरांनी मराठीत लिहिलेली पुस्तके
1925 मध्ये " राष्ट्रीय स्वयंसेवक संघ " ची स्थापना 5 लोकांनी मिळून केली होती, त्यात वीर सावरकरांचे मोठे बंधू " गणेश सावरकर " देखील होते. पण त्यांना अटक झाल्यानंतर ते काम वीर सावरकर बघू लागले. जेल मधून सुटून आल्यानंतर सुद्धा सावरकरांनी बरीच पुस्तके लिहिली. ज्यामध्ये प्रामुख्याने हिंदू पदपादशाही, माझी जन्मठेप, काळ्यापाण्याची शिक्षा, सहा सोनेरी पाने, हिंदुत्व, हिंदुत्वाचे पंचप्राण, मोपल्यांचे बंड, शत्रूच्या शिबिरात, जातीभेद,इ. बरीच पुस्तके लिहिली.
एप्रिल 1946 मध्ये संपूर्ण सावरकर साहित्यावरील बंदी मुंबई सरकारद्वारे उठवण्यात आली .
14 जानेवारी 1961 साली मृत्युन्जय दिनानिमित्त ते पुण्यातील विराट विशाल गर्दीसमोर भाषाण देतात पण दुर्दैवाने हेच त्यांचे अखेरचे भाषण ठरते.
1 फेब्रुवारी 1966 पासून ते स्वतःहून अन्न पाणी वर्ज्य करतात आणि अखेर 26 फेब्रुवारी 1966 ला आपला देह त्याग करून अनंतात विलीन होतात. savarkar punyatithi in marathi
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सावरकरांबद्दल पुढील शब्द बोलतात " सावरकर म्हणजे तेज, तप, त्याग, तिर, आणि तलवार !! ".
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना " स्वातंत्र्यसूर्य " ही उपमाच अधिक शोभून दिसेल.
अशा या क्रांतिसुर्य, वीर पुत्र, " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना " आमच्याकडून कोटी कोटी अभिवादन !!
" विनायक दामोदर सावरकर यांची माहिती | Savarkar | Veer Savarkar information in Marathi " वाचल्याबद्दल धन्यवाद !!