नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ? | mutual fund investment in marathi
आपल्यापैकी बऱ्याच जणांना stock मार्केट किंवा share मार्केट बद्दल माहिती असेल. 2020 साली आलेल्या कोरोना महामारीमुळे शेअर मार्केटमध्ये अविश्वसनिय घसरण झाली होती, आणि याचाच फटका बऱ्याच गुंतवणूकदारांना बसला. पण काही जणांनी धैर्य दाखवून आपले शेअर्स न विकण्याचा निर्णय घेतला व काही महिन्यातच त्यांच्या शेअर्सची किंमत दुपटी-तीपटीने वाढली. म्युच्युअल फंड मराठी माहिती
ज्या गुंतवणूकदारांना चांगल्या कंपन्याची माहिती असते व मोठमोठ्या कंपन्यानंबद्दल ज्यांचा सखोल अभ्यास असतो, त्यांच्यासाठी शेअर मार्केट मधून पैसे कमावणे नक्कीच अवघड नसते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल भारतामध्ये अशी लाखो लोक आहेत ज्यांचे उत्पन्नाचे साधन शेअर मार्केट मधून पैसे कमावणे हेच आहे.
पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना जर , शेअर मार्केटचा अभ्यास करून त्यामध्ये पैसे गुंतवणे व नफा मिळवणे जमत नसेल, तर आपल्यासाठी एक उत्तम असा पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे “म्युच्युअल फंड ". आणि आजच्या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंड बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. mutual fund investment in marathi
अधिक वाचा : शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market information in marathi
म्युच्युअल फंड म्हणजे काय ? | what is mutual fund in marathi
भारतामध्ये अधिकांश लोक त्यांचे दर महिन्याला जॉब मधून किंवा बिजनेस मधून येत असलेले पैसे, मुख्यतः चार ठिकाणी Invest करतात. जसे की बँकेत ठेवणे, FD करणे, सोनं खरेदी करणे किंवा मग एखादी प्रॉपर्टी विकत घेणे.
यातील बँकेमध्ये पैसे ठेवणे हा सर्वातं बेकार आणि नुकसानदायक प्रकार आहे. याचे कारण असे की एकाच ठिकाणी ठेवलेले पैसे काळानुसार आपली व्हॅल्यू कमी करत असतात. त्याचबरोबर दरवर्षाला महागाई 6-7 टक्क्यांनी वाढते तर बँकेमध्ये तुम्हाला जेमतेम 4 ते 5 टक्के व्याज मिळत असते आणि म्हणूनच बँकेमध्ये पडून राहिलेल्या तुमच्या पैशांची value वेळेनुसार कमी होत असते. त्याचबरोबर सोनं खरेदी करने आणि प्रॉपर्टी विकत घेणे यासाठी खूप जास्त पैशांची गरज असते. त्यामुळे हे ऑप्शन देखील चांगले नाहीत.
पण ज्या लोकांना रिस्क घ्यायला आवडते व ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल माहिती आहे असे बरेच जण स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतात. पण ज्यांना शेअर मार्केटचे जास्त ज्ञान नाही अशांसाठी एक सर्वात उत्तम असा पर्याय आहे तो म्हणजे “म्युच्युअल फंड " .
म्युच्युअल फंड म्हणजे, सर्वसामान्य लोकांकडून गोळा केलेला पैसा. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमचे पैसे एखाद्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला देत असता. ही कंपनी तुमच्या सारख्या हजारो लोकांचे पैसे घेऊन, विविध कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असते. या कंपन्यांनी त्यांचा एक फंड मॅनेजर नेमलेला असतो, हा फंड मॅनेजर त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती असतो, जसे की कोणती कंपनी व कोणते शेअर्स भविष्यात चांगले परफॉर्म करणार आहे, फक्त अशाच कंपन्यांमध्ये तुमचे पैसे लावले जातात. जेव्हा या कंपन्या चांगल्या परफॉर्म करतात व नफा होतो, त्या वेळेस हा नफा सर्व म्युचअल फंड धारकांमध्ये विभागून दिला जातो. या बदल्यात हे म्युचल फंड तुमच्याकडून अगदी 1-2% एवढे कमिशन आकारत असतात.
म्युच्युअल फंड्स मध्ये किती टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात ?
म्युच्युअल फंड हे बऱ्याच प्रकारचे असतात, तुम्हाला किती टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात हे सर्वस्वी तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करणार आहात यावर अवलंबून असते. तसे पाहायला गेले तर कमीत कमी 4 % ते जास्तीत जास्त 30 टक्क्यांहून अधिक Return म्युच्युअल फंड तुम्हाला एका वर्षामध्ये देऊ शकतात.
तुमची जेवढी जास्त रिस्क घेण्याची तयारी असेल तेवढे जास्त रिटन्स तुम्ही यामध्ये मिळवू शकता.
ईडी म्हणजे काय ? ED full form in marathi - माहिती वाचा
म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात ? mutual fund types | What are the different types of mutual funds? | types of mutual funds in india
मुख्यतः म्युच्युअल फंड्स चे तीन प्रकार पडतात, ते खालील प्रमाणे :-
1) Equity Mutual Fund.
2) Debt Mutual Fund.
3) Hybrid Mutual Fund.
1) Equity Mutual Fund :-
इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले जातात. आणि यामुळेच तुमची रिस्क त्याचबरोबर मिळणारे रिटर्न सुद्धा अधिक असतात. आता या प्रकारामध्ये सुद्धा तीन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे :-
A) Large Cap Fund :-
लार्ज कॅप फंड म्हणजे ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायजेशन दहा हजार करोडहून अधिक आहे अशा कंपन्यांमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. स्मॉल कॅप फंड आणि मिड कॅप फंडपेक्षा या लार्ज कॅप फंडचा ग्रोथ रेट कमी असतो. ICICI Prudential Bluechip Fund आणि Kotak Bluechip fund हे लार्ज कॅप फंडचे उदाहरण आहेत.
B) Mid Cap Fund :-
मिडकॅप फंड मध्ये अशा कंपन्या येतात ज्यांचे मार्केट कॅपिटलायजेशन दोन हजार ते दहा हजार करोडच्या मध्ये आहे. या म्युच्युअल फंड चे Return प्रामुख्याने लार्ज कॅप फंड पेक्षा जास्त असतात. Axis midcap fund आणि HDFC midcap opportunities fund ही मिडकॅप फंडची उदाहरणे आहेत.
C) Small Cap fund :-
स्मॉल कॅप फंड मध्ये अशा कंपन्या असतात ज्यांचे मार्केट कॅपिटलायजेशन दोन हजार करोड पेक्षा कमी आहे. प्रामुख्याने यात सर्वात जास्त रिस्क असते त्याचबरोबर सगळ्यात जास्त रिटर्न भेटण्याचे चान्सेस देखील याच फंडमध्ये असतात. Kotak small cap fund, Axis small cap fund ही याची उदाहरणे आहेत.
त्याचबरोबर इक्वीटी म्युच्युअल फंड मध्ये अजूनही बरेच प्रकार येतात जसे की, Tax सेवर म्युचल फंड, इंडेक्स फंड, सेक्टर म्युचल फंड. Etc.
2) Debt Mutual Fund :-
Debt म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे Debt Instruments मध्ये इन्व्हेस्ट केले जातात जसे की Goverment bonds, Debentures, etc. Debt म्युच्युअल फंड मध्ये देखील बरेच प्रकार पडतात जसे की, लिक्विड फंड, गिल्ट फंड, फिक्स मॅच्युरिटी प्लॅन etc.
यातील सर्वच प्रकार हे कमी जोखमीचे असतात, त्याचबरोबर यातून मिळणारा रिटर्न रेट सुद्धा काहीसा कमीच असतो.
3) Hybrid Mutual Fund | hybrid fund meaning in marathi :-
इक्वीटी म्युच्युअल फंड आणि डेट म्युच्युअल फंड यांचे मिश्रण असलेल्या या फंडला हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणतात. बऱ्याच लोकांना जर आपले पैसे फक्त इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करायचे नसतील, तर असे लोक हायब्रीड म्युचल फंड मध्ये आपले पैसे गुंतवू शकतात, जेणेकरून तुमचे पैसे इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये विभागले जातील व रिस्क अजून कमी होईल.
म्युच्युअल फंड फायदे :-
1) म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्वेस्ट केल्यामुळे, तुमचे पैसे बुडण्याची जोखीम ( Risk ) कमी होते.
2) म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणे खूपच सोपे असल्यामुळे तुमच्या वेळेची बचत होते.
3) जर तुम्ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच बँकांपेक्षा जास्त टक्के परतावा तुम्ही मिळवू शकता.
4) तुम्ही अगदी शंभर रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकता.
5) इंटरनेट व मोबाईल फोनमुळे तुम्ही घर बसल्या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.
चला तर आता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊ.
म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ? | mutual fund investment in marathi
सर्वसामान्यतः म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते, एक म्हणजे SIP (Systematic Investment Plan ) आणि दुसरी म्हणजे Lump-sum Amount.
SIP म्हणजे काय? sip mutual fund in marathi
( Systematic investment plan ) म्हणजेच SIP हा म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्टमेंट करण्याचा लोकांमध्ये सर्वात प्रचलित असलेला आणि आवडता पर्याय आहे. यामध्ये दर महिन्याला तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढी एक ठराविक अमाऊंट, इनवेस्ट करत असता, ही amount 500 रु पासून 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एखाद्या महिन्यात जर तुम्ही पैसे भरू शकला नाहीत, तरी चालू शकते. त्याचबरोबर तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मधून पैसे काढून घेऊ शकता.
SIP मध्ये दीर्घकाळासाठी केलेली इन्वेस्टमेंट चांगले रिटर्न्स देते.
Lump sum amount म्हणजे काय?
म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादी ठराविक घाऊक रक्कम इन्व्हेस्ट करता, त्यालाच लम सम अमाऊंट इन्वेस्ट करणे असे म्हणतात. ही रक्कम अगदी 5 पाच हजारापासून ते पाच लाखापर्यंत किंवा त्याहून जास्त असू शकते.
घरबसल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट कशी करावी ?
मित्रांनो इंटरनेट व मोबाईलमुळे म्युचल फंड मध्ये घरबसल्या इन्व्हेस्टमेंट करणे शक्य झाले आहे. यासाठी बरेच एप्लिकेशन्स देखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यातीलच एक सर्वात लोकप्रिय एप्लीकेशन म्हणजे GROWW App या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही चुटकीसरशी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.
या App च्या माध्यमातून तुम्ही दहा हजारांहून अधिक म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर यामध्ये Autopay ची देखील सुविधा उपलब्ध आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही यांच्या कस्टमर केअरला कॉल करून सर्व माहिती मिळवू शकता.
निष्कर्ष :-
आम्ही अशी आशा करतो की या लेखामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल बरीच माहिती मिळाली असेल. तरीसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट करण्या अगोदर तुम्ही तुमच्या Financial Advisor ला नक्की विचारू शकता, बिनधास्त म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करून नफा देखील मिळवू शकता.
धन्यवाद 'म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | mutual fund investment in marathi' वाचल्याबद्दल !!